केतकी चितळे पोस्ट शरद पवार

  1. केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे पाथरवट कविता चर्चेत! शरद पवारांनी पाथरवटचा काय दाखला दिला? जाणून घ्या
  2. Raj Thackeray : केतकी चितळेची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; राज ठाकरेंनी झापलं
  3. 'ब्राह्मणांचा तुला मत्सर! कोण रे तू?' अभिनेत्री केतकी चितळे हीची वादग्रस्त पोस्ट! केतकीविरोधात गुन्हा
  4. अभिनेत्री केतकी चितळेची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी, शरद पवारांबद्दलची वादग्रस्त पोस्ट भोवली!
  5. केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट
  6. '....मग माझा खून झाला तरी चालेल' केतकी चितळेची खळबळजनक पोस्ट
  7. केतकी चितळेला ओळखत नाही! 'त्या' आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवार मोजकंच बोलले
  8. केतकी चितळे प्रकरणावर शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले..
  9. केतकी चितळेवरील सर्व गुन्हे कोर्टाने केले एकत्र; शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण


Download: केतकी चितळे पोस्ट शरद पवार
Size: 22.53 MB

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे पाथरवट कविता चर्चेत! शरद पवारांनी पाथरवटचा काय दाखला दिला? जाणून घ्या

मुंबई : अभिनेत्री Ketaki Chitale) वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आता तर तिनं थेट शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर रचलेली एक कविता फेसबुकवरुन शेअर केली. या कवितेमुळे तिची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवली. शरद पवारांचा अपमान करणारी ही कविता असल्याचं म्हणत पवार समर्थकांनी तिच्यावर टीकाही केली. वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे ( Ketali Chitale Facebook post) नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ज्या कारणामुळे तिनं पवारांना उद्देशून कविता शेअर केली आहे, त्याचा संदर्भ हा आणखी एका कवितेशी आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेचा दाखला देत शरद पवारांनी साताऱ्यात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. पाथरवट या कवितेवर शरद पवारांनी असं नेमकं काय म्हटलं? की ज्यामुळे केतकी चितळे हीनं फेसबुकवर पोस्ट केली, याची चर्चा आता रंगली आहे. म्हणूनच शरद पवारांनी साताऱ्यात केलेलं वक्तव्य जाणून घेणं गरजेचं आहे. हिंदू देव-देवतांबाबत पवार यांनी पाथरवट कवितेचा संदर्भ देत महत्त्वाचं विधान केलं होतं. — NCP (@NCPspeaks) पाहा व्हिडीओ : शरद पवार नेमकं काय म्हणाले होते? 9 मे रोजी शरद पवार यांनी साताऱ्यातील भाषणातील शब्दान शब्द काय होता तेही जाणून घेऊयात. शरद पवार यांनी म्हटलं होतं की,… मी बघतो हल्ली, समाजातील लहान घटकातील, ज्यांना सहन करावं लागलं, ज्यांच्यावर अत्याचार झाले, अन्याय झाले, असे अनेक लोक आज आपल्या कार्याने पुढे येतात. मला आठवतंय मी नेहमी औरंगाबदला जायचो, तिथं मिलिंद कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं आहे. तिथं महाराष्ट्रातल्या उपेक्षित समाजातली मुलं मुली शिकायची आणि त्याठिकाणी ती अतिशय ज्यांना शैक्षण पार्श्वभूमी नाही, अशा कुटुंबातील मुलं उत्तम लिखाण करायची. मला आठवतंय जवाहर राठोड...

Raj Thackeray : केतकी चितळेची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; राज ठाकरेंनी झापलं

अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या भाषेचा राज ठाकरेंनी एक निवेदन प्रसिद्ध करत समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी एका निवेदनातून या प्रकारवर भूमिका मांडली आहे. ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वैगरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,’ असं राज यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वैगरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशी टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरुर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवार घालायला पाहिजे,’ असं भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे. कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! — Raj Thackeray (@RajThackeray) ‘चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये ह...

'ब्राह्मणांचा तुला मत्सर! कोण रे तू?' अभिनेत्री केतकी चितळे हीची वादग्रस्त पोस्ट! केतकीविरोधात गुन्हा

ठाणे : आपल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री Ketaki Chitale Post) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकी चितळेविरोधात शरद पवारांबाबत ( Sharad Pawar) वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केल्यावरुन केतकी चितळेला ट्रोलही केलं जात होतं. फेसबुकवर अभिनेत्री केतकी चितळे हीनं शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. याआधीही वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे चर्चेत आली होती. दरम्यान, आता केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात ( Kalva Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील नितीन भावे यांनी लिहिलेले कविता केतकी चितळे यांनी फेसबुकवरुन शेअर केली आहे. हजारो लोकांनी या पोस्टवर कमेंट केल्यात. कवितेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती. त्याचा संदर्भ केतकीच्या पोस्टला आहे. नेमकी ती पोस्ट काय? अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की.. तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड || -Advocate Nitin Bhave भाजपकडूनही पवारांवर टीका साताऱ्यामध्ये परवा शरद पवारांनी जवाहर राठोड यांची `डोंगराचे ढोल` या संग्रहातील `पाथरवट` ही कविता लोकांसमोर आणली होती...

अभिनेत्री केतकी चितळेची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी, शरद पवारांबद्दलची वादग्रस्त पोस्ट भोवली!

Ketaki Chitale Judicial Custody : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. केतकीच्या पोस्टनंतर सर्वच पक्षांकडून निषेध केतकी चितळेनं दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर त्यावर सर्वत स्तरातून आणि पक्षांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. राज्यात १० विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला रविवारी दुपारी चौकशीनंतर ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली होती. त्यानंतर तिची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला कळंबोलीमधून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी देखील धाड टाकून तपास केला होता. यामध्ये केतकीचा लॅपटॉप आणि इतर काही वस्तू पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून ताब्यात घेतल्या आहेत. केतकीच्या अटकेनंतर तिच्या विरोधात जशा प्रतिक्रिया उमटत आहेत, तशाच काही तिच्या समर्थनार्थ देखील येत आहेत. केतकीच्या अटकेसाठी पोलीस वेटिंगवर! दरम्यान, केतकी चितळेला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या भागातील...

केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट

मुंबई : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही अधुनमधून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. (Ketaki Chitale made offensive post about Sharad Pawar) केतकीच्या पोस्टचा जवाहर राठोडांच्या कवीतेशी संदर्भ नुकतीच शरद पवार यांनी साताऱ्यात भाषणादरम्यान, कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती. कष्टकऱ्यांची व्यथा सांगणाऱ्या या कवितेत हिंदू देवदेवतांवर टीकात्मक भाष्य करण्यात आलं आहे. यावरुन शरद पवारांनी देव-देवतांचे बाप काढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यावरुनच केतकीनं शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केतकी चितळे ही मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री असून बऱ्याच काळापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती आपल्या सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधानं करताना दिसून आली आहे. त्यामुळं तिला अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलही व्हावं लागलं आहे.

'....मग माझा खून झाला तरी चालेल' केतकी चितळेची खळबळजनक पोस्ट

मुंबई, 2 एप्रिल- सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या केतकी चितळेनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिनं तिचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की,मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली 7 वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल' अशी पोस्ट केतकीने केली आहे. वाचा- केतकी एवढ्यावर थांबलेली नाही ती पुढे या पोस्टाला कॅप्शन देत म्हणते की, 'सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही. सत्य आणि खोटेपणा लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत.एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझ्या मृत्यू झाला, किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेतल्याचं असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल.मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे यावेळी आत्महत्या केल्याने माझा मृत्यू होणार नाही.त्यामुळे माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊक असेल.जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!'केतकीच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा आता रंगली आहे. तिची ही पोस्ट नेमकी कशासाठी आहे, या प्रश्न सगळ्यांना पडला आहे. केतकी कायम वादात केतकी चितळे हिने अनेकदा वादग्रस्त टिप्पण्या करून वाद ओढवून घेतले आहेत. नवबौद्धांसंदर्भातील टिप्पणीप्रकरणी तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार ...

केतकी चितळेला ओळखत नाही! 'त्या' आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवार मोजकंच बोलले

केतकी चितळे नावाची व्यक्ती माहीत नाही आणि तिनं काय केलं आहे याचीदेखील मला कल्पना नाही. तिनं काय केलं हेच माहीत नसताना त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका सभेत कवी जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा संदर्भ दिला. त्याबद्दल वेगळं चित्र काहींकडून मांडलं गेल्याचं पवारांनी सांगितलं. राज ठाकरेंकडून केतकी चितळेचा समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष 'कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,' असं राज यांनी पत्रकात म्हटलं आहे.

केतकी चितळे प्रकरणावर शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले..

नांदेड : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केली आहे. याचे तीव्र पडसात राज्यात पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकी विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले. दरम्यान केतकीला ही पोस्ट महागात पडली आहे. तिच्याविरूद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ठाणे पोलिसांनी तिला अटक केली आहे. दररम्यान, शरद पवारांना केतकी चितळे प्रकरणावर मौन सोडले आहे. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना केतकी चितळे हीच्या पोस्टवरून प्रश्न विचारला. यावर उत्तर देतांना पवार म्हणाले, त्या पोस्टबद्दल आपल्याला काही माहिती नाही, मी केतकी चितळेला ओळखत नाही, त्यामुळे नेमकं काय झालं ते कळल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांनीही केतकी चितळे हिच्या पोस्टवर प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवार म्हणाले, केतकी चितळे हिचे मानसिक संतूलन बिघडले आहे. तिला उपचाराची गरज आहे. तिने चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज आहे. राज्यात अनेक प्रश्न आहे. त्यामुळे केतकी चितळे पेक्षा माध्यमांनी त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे असेही पवार म्हणाले. केतकी चितळे हीने फेसबूकवर केलेल्या पोस्टनंतर तीच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेल्या या पोस्टमध्ये शरद पवारांवर, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यामुळे केतकी विरोधात पुण्याच्या कळवा पोलिस ठाण्यामध्ये कलम ५००, ५०५ (२), ५०१ आणि १५३ ह्यअह्ण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केल...

केतकी चितळेवरील सर्व गुन्हे कोर्टाने केले एकत्र; शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यासंदर्भात अभिनेत्री केतकीविरोधात २२ गुन्हे नोंदविण्यात आले असून निखिल भामरेवर सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. न्या. नितीन जामदार व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने केतकीविरोधातील सर्व गुन्हे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात तर निखिलविरोधातील गुन्हे नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले. दरम्यान , चितळे व भामरे यांनी आपल्याला चुकीने अटक केल्याबद्दल नुकसानभरपाई देण्यात यावी व आपली अटक बेकायदेशीर असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. त्यांच्या या मागण्यांवर उच्च न्यायालयाने राज्य सरकार व सर्व तक्रारदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिककर्त्यांच्या या मागण्यांवर राज्य सरकारची काय भूमिका आहे? याबाबत सरकार व तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे म्हणत न्यायालयाने या दोघांच्या याचिकांवरील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी ठेवली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला सर्व गुन्हे वर्ग करण्याचे निर्देश देताना उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला दिला. जेव्हा एकापेक्षा जास्त गुन्हे नोंदवले जातात, तेव्हा दाखल केलेला पहिला गुन्हा हा मुख्य गुन्हा म्हणून मानण्यात यावा आणि उर्वरित गुन्हे पहिल्या गुन्ह्यामध्ये साक्षीदारांची साक्ष म्हणून मानले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. Web Title: All the crimes against Ketaki Chitale were combined by the court Offensive post case against Sharad Pawar Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal...