कोरोना ठळक बातम्या

  1. Tata Steel Plant Accident: ओडिशात टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी
  2. पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्तविभाग कायमचा बंद होणार
  3. # भारतातील कोरोनामुक्तांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा. – Maharashtra Today


Download: कोरोना ठळक बातम्या
Size: 54.17 MB

Tata Steel Plant Accident: ओडिशात टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी

ओडिशामधील (Odisha) टाटा स्टील पॉवर प्लांटमध्ये (Tata Steel Plant) स्टीम लीक झाले आहे. या अपघातात काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडलीमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात ब्लास्ट फर्नेसची पाहणी करणारे कामगार आणि अभियंते जखमी झाले आहेत. गंभीर भाजलेल्या जखमींना तातडीने कटक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीचे काम सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला, असे टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे. साइटवर काम करणाऱ्या काही लोकांवर त्याचा परिणाम झाला, असे त्यात म्हटले आहे. (हेही वाचा - खबरदारीचा उपाय म्हणून जखमींना ताबडतोब प्लांटच्या आवारातील व्यावसायिक आरोग्य केंद्रात आणि नंतर कटक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की, जखमींना डॉक्टर आणि पॅरामेडिक्स सोबत होते. सर्व आणीबाणी प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले होते आणि परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती, असे स्टील जायंटने सांगितले. "आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहोत आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत तपास सुरू केला आहे," असे निवेदनात म्हटले आहे, सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. टाटा स्टील कंपनीने म्हटले की, या अपघातानंतर त्यांनी पीडित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. कंपनीकडून त्यांना सर्वतोपरी मदत, सहकार्य केले जात आहेय कंपनी अपघाताचे कारण शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली.

पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्तविभाग कायमचा बंद होणार

पुणे : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. या संबंधीचा लेखी आदेश देखील काढण्यात आला आहेत. त्यामुळे 19 जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणी वरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील आता बंद होणार आहेत. या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगरला सोपवण्यात येत असल्याचे यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे. पुणे वृत्त विभागात भारतीय माहिती सेवेतील अधिकार्‍यांची दोन पदे होती, ती अन्य केंद्रांवर स्थानांतरित केल्यानंतर या विभागाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि कालांतराने हा विभाग बंद करुन इथली बातमीपत्रे अन्यत्र हलवण्याचा निर्णयही पूर्वीच झाला होता. परंतु त्यावेळी या निर्णयाला सर्वच स्तरातून जोरदार विरोध झाल्याने तो निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. पण आता या ताज्या आदेशानुसार आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग कायमचा बंद होणार आहे. 1 मे 1970 रोजी सुरु झालेल्या पुणे वृत्त विभागावरील बातमीपत्रांची लोकप्रियता संपूर्ण राज्यभरात आहे. आता युट्युबवरील या विभागाचे चॅनेल आणि सोशल मीडियाद्वारे ही बातमीपत्र जगभरात पोहोचतात. विविध भारतीवरील ठळक बातम्या आणि पुणे वृत्तांत या विशेष बातमीपत्राद्वारे श्रोत्यांना ताज्या बातम्या मिळत होत्या. श्रोतेही स...

# भारतातील कोरोनामुक्तांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा. – Maharashtra Today

गेल्या 11 दिवसांत 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त; बरे होणारे रूग्ण उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत 5 पटींपेक्षा अधिक नवी दिल्ली: भारतातील कोरोनामुक्तांच्या संख्येने आज 50 लाखांचा महत्त्वाचा टप्पा पार केला (50,16,520). कोविडमधून बरे होणाऱ्या रुग्णांची रोजची संख्या मोठी असल्याने, कोरोनामुक्त व्यक्तींची दररोज मोठ्या संख्येने नोंद करण्याचा भारताचा शिरस्ता कायम आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 74,893 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तीचे प्रमाण अतिशय उच्च असून, एका दिवसात 90,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची कामगिरीही भारताने नोंदविली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत 5 पटींपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात होणाऱ्या वाढीचे प्रमाणही सातत्याने वाढत असल्याने, बरे झालेल्यांच्या संख्येत एका महिन्यात जवळपास 100% इतकी वाढ नोंदविली गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा देशातील दर आणखी वाढून 82.58% इतका झाला आहे. 15 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुक्तीचा दर राष्ट्रीय पातळीवरील सरासरी दरापेक्षा अधिक आहे. नव्याने कोरोनामुक्त झालेल्यांपैकी 73% व्यक्ती, पुढील दहा राज्यांमधील आहेत- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पंजाब. कोरोनातून नव्याने बरे झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 13,000 इतकी आहे. जून 2020 मध्ये कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख होती, त्यानंतर हे प्रमाण वेगाने वाढत गेले आहे. गेल्या फक्त 11 दिवसांत 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांपैकी 78% व्यक्तींची नोंद 10 राज्ये/ ...