लिहिलेला हरिपाठ

  1. हरी पाठ


Download: लिहिलेला हरिपाठ
Size: 37.80 MB

हरी पाठ

हरी पाठ (Hari Paath) – Read and Download for 2023 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवून या ॥१॥ तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ (Complete Lyrics) ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ ॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ॥ पाच ॥ योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण द...