Lokmat epaper kolhapur today

  1. चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासुन पर्यटकांसाठी बंद
  2. Kolhapur News: गर्भलिंग चाचणीतील रिपोर्ट कोडवर्डमध्ये, स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर


Download: Lokmat epaper kolhapur today
Size: 48.29 MB

चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासुन पर्यटकांसाठी बंद

सरुड : अलिकडच्या काळात चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या वाढत्या पर्यटनामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झोतात आले आहे . या उद्यानातील पर्यटनासाठी गेल्या जानेवारी महिन्या पासुन आजपर्यंत सुमारे पाच हजार पर्यटकांनी या उद्यानास भेट देऊन येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद लुटल्याची नोंद या विभागाच्या कार्यालयाकडे झाली आहे. सुट्टीमुळे मे महिन्यात सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली. प्रशासनाच्यावतीने दरवर्षी १५ जुन पासुन हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. पावसाळा संपल्यानंतर १५ ऑक्टोंबर पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पुन्हा पर्यटनासाठी खुले केले जाते. विशेषता जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत या उद्यानामध्ये पर्यटकांची गर्दी असते .

Kolhapur News: गर्भलिंग चाचणीतील रिपोर्ट कोडवर्डमध्ये, स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर

Kolhapur News: गर्भलिंग चाचणीतील रिपोर्ट कोडवर्डमध्ये, स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर By June 13, 2023 05:26 PM 2023-06-13T17:26:01+5:30 2023-06-13T17:28:42+5:30 कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध असले तरी, छुप्या पद्धतीने हे प्रकार सुरूच आहेत. यातून लाखो ... सहा महिन्यांपूर्वीच राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील दोन रॅकेटचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अवैध गर्भलिंग निदान करण्याचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणांची दिशाभूल करून बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्याचे प्रकार सुरूच आहेत. राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्या तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक मुलगी आहे. आठ दिवसांपूर्वी नियमित तपासणीसाठी गेल्यानंतर हॉस्पिटलमधील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी त्यांना गर्भलिंग निदान करण्याचा पर्याय सूचवला. त्यासाठी १५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तसेच मुलगी झाली तर २० हजार रुपयांत गर्भपाताचीही सोय असल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर तक्रारदार महिलेने प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीच्या सदस्य गीता हासूरकर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली. हासूरकर यांनी तक्रारदार महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करून श्री हॉस्पिटलचा भंडाफोड केला. हॉस्पिटलचे पॉझिटिव्ह, निगेटिव्हचे कोडवर्डही समोर आले. महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान श्री हॉस्पिटलच्या दैनंदिन कामात अनेक त्रुटी आढळल्या. तक्रारदार महिलेचा केसपेपर तयार केला नव्हता. अनेक रुग्णांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत. रुग्णांची माहिती देण्यास कर्मचाऱ्यांनी चालढकल केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद ह...