Mauli palkhi 2022 time table

  1. हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल
  2. वारकऱ्यांसाठी १ लाख वडापावची सेवा
  3. Ashadhi Wari 2022 Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Horse Greeted Pune Dagadusheth Halwai Ganpati
  4. Ashadhi Wari 2023: आषाढी वारी सोहळा! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची घोषणा; 'या' दिवशी होईल पंढरपूरकडे प्रस्थान ashadhi wari 2023 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi start on 11 june


Download: Mauli palkhi 2022 time table
Size: 51.69 MB

हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल

वाल्हे : आल्हाददायक वातावरणात झालेली दुपारपर्यंतची वाटचाल आणि हिरव्यागार वनराईतून हरिनामाचे गोडवे गात माऊलींचा पालखी सोहळा दुपारी वाल्हे मुक्कामी पोचला. वाल्हे तळावरील समाजआरतीचे विश्वरूप दर्शन लाखो भाविकांनी आज नयनात साठवले. सोमवारी भल्या पहाटे माऊलींच्या चलपादुकावर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. साडेसहा वाजता सोहळा जेजुरीतील मुक्काम उरकून वाल्हेचे दिशेने मार्गस्थ झाला. ढगाच्या छायेत सोहळा वाटचाल करीत असताना मध्ये हलक्याशा पावसाचा शिडकावा वारकऱ्यांच्या पायाला बळ देत होता. दोंडज खिंडीत बघावे तिथे वारकरी विसावा घेताना दिसत होते, तर काही वारकऱ्यांनी टेकडीवर जाऊन हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. परिसरातील ग्रामस्थांनी आणलेली न्याहारी घेऊन पालखी सोहळा वाल्ह्याच्या दिशेने सरकला. कमी वाटचाल असल्याने वारकऱ्यांनी दुपारच्या टप्प्यापर्यंतच मुक्कामाचे ठिकाण गाठले. शेताशिवारातून चालताना अभंगांना रंग चढला होता. संपूर्ण वाटचाल वारकऱ्यांनी लिलया पूर्ण केली. पुढे दौंडज ग्रामस्थांनी रांगोळ्यांच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत केले. तेथे फुलांचा वर्षाव करण्यात आला. पावणे दोनच्या दरम्यान सोहळा वाल्हे गावात आल्यावर वाल्हेकरांनी बेलफुलांची उधळण आणि माउलीनामाचा गजर करीत स्वागत केले. नंतर सोहळा वाल्हेपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुकलवाडीत पोचला. सोहळ्यातील एकमेव दुपारच्या समाजआरतीची तयारी सुरू झाली. पालखी तळावर बाळासाहेब चोपदार यांनी गोलाकार रचनेनुसार एकेक दिंड्या क्रमाने सोडल्या. दरम्यान, माउलींची पालखी खांद्यावर घेत तळावर मधोमध ठेवली. यावेळी दिंड्यामध्ये भजन सुरू होते. चोपदारांनी चोप उंचावताच दिंड्यामध्ये शांतता झाली आणि समाजआरतीस सुरुवात झाली. तीनच्या सुमारा...

वारकऱ्यांसाठी १ लाख वडापावची सेवा

कात्रज : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद आणि फलटण येथे १ लाख वडापावचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. गुजर-निंबाळकरवाडी परिसरातील स्व. विठ्ठलदास जगन्नाथ धूत यांनी ४१ वर्षापुर्वी चालू केलेली वारकरी संप्रदायाची सेवा आज त्यांचा तिसर्‍या पिढीने अखंड चालू ठेवली आहे. महेश धूत परिवाराकडूनकडून बरड तालुका फलटण येथे नाश्ट्याला एकूण ५० हजार वारकऱ्यांना १ लाख वडापावचे वाटप करण्यात आले. जेजुरीच्या पुढे वारकर्‍यांच्या खाण्याची पिण्याची सोय पुणे शहराच्या तुलनेत कमी असते. ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धूत व गजराज इन्फ्रा मित्रपरिवार यांनी आर्यन मंगल कार्यालय येथे केली होती. वडापाव बनविण्यासाठी ३ टन बटाटे, ५०० किलो बेसन, ३० तेलाचे डबे व इतर साहित्याचा वापर करण्यात आला. एकूण १०० महिला आणि ७५ स्वंयसेसेवकांनी २४ तास सेवा देत हा उपक्रम राबविला. वारकर्‍यांनी आवडीने आस्वाद घेतला व मनापासून सर्व सेवकांना आशीर्वाद दिल्याची माहिती यावेळी महेश धूत यांनी दिली. या कार्यात ओमप्रकाश धूत, नंदलाल धूत, प्रसाद बांदल, कानयलाल धूत, सचिन धुत, व्यंकोजी खोपडे, निखिल सुराणा यांनी सहकार्य केले.

Ashadhi Wari 2022 Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Horse Greeted Pune Dagadusheth Halwai Ganpati

Ashadhi Wari 2022 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन केले. यावेळी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. बेळगवच्या अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आज पुण्यात आगमन झाले. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दोन्ही अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर, राजाभाऊ थोरात, मारुती महाराज कोकाटे, बाळासाहेब वांजळे, योगेश गोंधळे यांसह वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. कोरोना संकटापूर्वी सलग दोन वर्षे अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली. यंदा तिसऱ्या वर्षी गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात, अशी माहिती शितोळे सरकार यांनी दिली. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील तिसऱ्या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त...

Ashadhi Wari 2023: आषाढी वारी सोहळा! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची घोषणा; 'या' दिवशी होईल पंढरपूरकडे प्रस्थान ashadhi wari 2023 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi start on 11 june

याबाबत अधिक माहिती अशी की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ( शेतीच्या मशागतीची कामे अटपुन कष्टकरी बळीराजा माऊलींच्या सोबतीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणा-या सोहळ्यात सहभागी होत असतो. हा वारकरी लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थित माऊलींचा पालखी सोहळा आळंदीत रंगणार आहे. यासाठी आळंदी देवस्थान आणि पालखी प्रमुखांच्या उपस्थित पहिली बैठक पार पडली. यावेळी पालखी प्रस्थान ते पंढरीपर्यतच्या मुक्कामाचे नियोजन आणि अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.