नातं

  1. नातं …
  2. काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..
  3. Relationship : पतीची पहिली पत्नी आणि मी...; आमचं नातं पाहून अनेकांना बसतो आश्चर्याचा धक्का!
  4. नातं
  5. नातं' म्हणजे काय???
  6. अतूट नातं! बहिणीच्या मृत्यूने भावाला धक्का, जळत्या चितेत मारली उडी; 30 तासांत घेतला जगाचा निरोप


Download: नातं
Size: 41.3 MB

नातं …

नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू दे,ते सहज असावे . नात्यातील सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या कदाचित आपल्याकडून ही हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि … अशी हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव ,श्रीमंतीचा बडेजाव,उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं ,नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज - गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही . एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग...

काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..

काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं.. काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं.. Shameema Akhtar Kashmiri Singer : काश्मिरी गायिका शमिमा अख्तर मराठी भजनं अतिशय तल्लीनेतेनं गाते आणि सांगते सुरांची शब्द-भाषा-जात-धर्मापलिकडची गोष्ट. By June 14, 2023 01:44 PM 2023-06-14T13:44:56+5:30 2023-06-14T17:14:06+5:30 Shameema Akhtar Kashmiri Singer : काश्मिरी गायिका शमिमा अख्तर मराठी भजनं अतिशय तल्लीनेतेनं गाते आणि सांगते सुरांची शब्द-भाषा-जात-धर्मापलिकडची गोष्ट. काश्मिरच्या बांदिपुरा भागात ‘ती’ लहानाची मोठी झाली. अगदी ६ महिन्याची होती, आईच्या कुशीतच तेव्हा एकदा त्यांच्या बसला दहशतवाद्यांनी घेरलं. आईच्या हाताला गोळी लागली आणि ती बेशुद्ध पडली. त्यावेळी साधारण तीन तास हे लहानसं बाळ- शमिमा त्या बसमध्येच होतं. याच हल्ल्यात तिची सख्खी आत्या मारली गेली. आजुबाजूला काय सुरू आहे हे समजण्याचं वय नव्हतंच, पण विखार पाहतच ती मोठी झाली. आज ही तरुणी धर्म, जात, भाषा या सगळ्याच्या पलिकडे जात आपल्या आवाजाने शांतता आणि एकतेचा संदेश देते. एकीकडे धर्मावरुन इतकी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना ही तरुणी आपल्या गोड आवाजाने ‘आता विश्वात्मके देवे’...म्हणते. माझे माहेर पंढरी म्हणत विठ्ठलाची आळवणी करताना तिच्या गळ्यातच नाही तर मनातही ते भाव किती ओतप्रोत भरलेले आहेत याचा अनुभव आपल्याला येतो (Shameema Akhtar Kashmiri Singer). मूळची काश्मिरची असलेली शमिमा अख्तर. तिथेच लहानाची मोठी झाली. आई-वडीलांच्या घरातून लखनऊ विद्यापीठातून गाण्याची रितसर पदवी घेतल्यानंतर शमिमाने पुण्यातील सरदह (Sarha...

Relationship : पतीची पहिली पत्नी आणि मी...; आमचं नातं पाहून अनेकांना बसतो आश्चर्याचा धक्का!

पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांमुळे तर अनेकदा अन्य काही कारणांमुळे तुमचा पतीच्या पहिल्या पत्नीशी संबंध येत असतो. तेव्हा तुमच्या पतीच्या भूतकाळातील नात्याचा आपल्या वर्तमानातील नात्यावर परिणाम होऊ नये, म्हणून पतीच्या पहिल्या पत्नी सोबत मैत्रीपूर्ण नातं असणं महत्वाचं ठरत. • • Last Updated : May 22, 2023, 16:45 IST • Mumbai, India • • • • • • • सध्या जगभरात घटस्फोट होण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पती पत्नीचे एकमेकांसोबत न पटणे, सतत वादविवाद होणे, घरगुती हिंसाचार, सासरच्यांकडून होणारा जाच अशा अनेक गोष्टी घटस्फोट होण्याला कारणीभूत असतात. पूर्वी घटस्फोट हा विषय समाजात फारच गंभीर समजला जायचा. परंतु आता घटस्फोटित मुलगा मुलगी दोघेही भविष्याचा विचार करून दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र पहिल्या लग्नात आलेल्या वाईट अनुभवातून सावरत दुसरं लग्न करताना पती पत्नी दोघांनाही बऱ्याच गोष्टी समजुतीने घ्याव्या लागतात. बऱ्याचदा दुसर लग्न करताना पती पत्नी दोघेही घटस्फोटित असतात. तेव्हा काहीवेळा पतीला पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांमुळे तर अनेकदा अन्य काही कारणांमुळे तुमचा पतीच्या पहिल्या पत्नीशी संबंध येत असतो. तेव्हा तुमच्या पतीच्या भूतकाळातील नात्याचा आपल्या वर्तमानातील नात्यावर परिणाम होऊ नये, म्हणून पतीच्या पहिल्या पत्नी सोबत मैत्रीपूर्ण नातं असणं महत्वाचं ठरत. पतीच्या पहिल्या पत्नी सोबत मैत्रीचं नातं कस निर्माण करावं हे जाणून घेऊयात, मैत्रीण म्हणून संवाद साधा : पतीच्या पूर्व पत्नीशी समारंभात अथवा कामाच्या ठिकाणी तुमची भेट होऊ शकते. यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा माणुसकी आणि मैत्रिणीच्या नात्याने तिच्याशी संवाद साधा, तिची विचारपूस करा. परंतु असे करताना संवादाद...

नातं

आयुष्य जगताना कधी कळतच नाही की आपण पुढे जाताना कधी कुठे कोणी दुखावले तर नाही ना? खुप काही बोलताना कोणाला शब्दानी लागलं तर नाही ना ? की नातं टिकवताना दुसरा कोणी रूसला तर नाही ना ? कित्येक गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण कधी विचारच करत नाहीत. सुटतात काही गोष्टी ज्या पुन्हा कधी भेटतही नाहीत. खुप पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आल्या तरी वेळ निघुन गेलेली असते. मग उरतो काय तर फक्त तिरस्कार. पण असं होतं ना!! जवळच्या व्यक्तीने कितीही दुखावलं तरी तिरस्कार मात्र आपण कधी करुच शकत नाहीत, हेही तितकंच खरं असतं. पण नातं पुन्हा जुळायला वाट थोडीच पहावी लागते. ते तर कधीही जुळु शकतं. फक्त आपली भावना निर्मळ हवी. दुखावलो , रागवलो , चिडलो तरी नातं मात्र तसंच हव अगदी कधीही न तुटण्या सारखं. त्यात स्वार्थ नसावा, खोटेपणा नसावा . फक्त असाव ते एक गोड नातं. खुप विचार करावा असंही नातं काय उपयोगाचा!! नाही का?? आपल्यामुळे कोणाला त्रास तर होतं नाही ना याचाही विचार करायला हवा. कारण कित्येक गोष्टी या आपण कोणावर लादत तर नाहीत ना याचाही विचार केला पाहिजे. उगाच बळजबरी म्हणुन नातं कधीच टिकु नये त्यात समजुदारपणा हवाचं. शिवाय नातं हे एका बाजुने कधीच टिकत नाही. त्यासाठी दोन्ही बाजुने तेवढाच समतोल हवा. कारण एकाचाही तोल गेला तर नातं हे ताणलं जातं आणि त्रास दोघांनाही होतो. पण नातं जुळवायचं म्हणजे समोरचाही नातं पुन्हा सुरू करायला तयार असावा. कारण आयुष्यात पुढे गेल्यानंतर काहींना आपला भूतकाळ नको असतो. तो खोडता तर येतं नाही पण पुन्हा समोर यावा अस नको असतं मग कराव तरी काय? जुन्या या नात्याला असंच सोडुन द्याव? तर अजीबात नाही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलत नसलो किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ आजही नसली तरी नातं हे संपत नाह...

नातं' म्हणजे काय???

रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे. अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फॅशन गेममुळे चर्चेत आहे. आधी कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि आता सिडनी फिल्म फेस्टिवल तिच्या फॅशन च्या अनोख्या अदा बघून सगळेच अवाक आहेत. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये केनेडी चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकल्या नंतर आता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन पोहचला आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फॅशन आणि फिल्म दोन्हीच्या चर्चांना उधाण आलं असल्याचं समजतंय !

अतूट नातं! बहिणीच्या मृत्यूने भावाला धक्का, जळत्या चितेत मारली उडी; 30 तासांत घेतला जगाचा निरोप

भिलवाडा जिल्ह्यातील बागोर पोलीस स्टेशन क्षेत्रातील हे प्रकरण आहे. मृत हिरालाल भिलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सुखदेवच्या काकांची मुलीच निधन झालं. त्याचा धक्का सुखदेवला बसला. तो अचानक शांत झाला. गुरुवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोक्षधाममध्ये चिता प्रज्वलित केल्यानंतर कुटुंबीय व इतर नातेवाईक तेथे बसले होते. दरम्यान, सुखदेव प्रथम बाथरूममध्ये गेला. त्यानंतर अचानक त्याने बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतली. उपचारादरम्यान मृत्यू हे पाहून तेथे उपस्थित असलेले लोक घाबरले. लोकांनी घाईघाईने सुखदेव भीलला जळत्या चितेतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत सुखदेव खूप भाजला होता. त्यानंतर त्यांना तातडीने भिलवाडा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची प्रकृती चिंताजनक पाहून प्राथमिक उपचार करून त्याला उदयपूरला रेफर करण्यात आले. सुखदेव भीलचा शुक्रवारी रात्री उदयपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला दोन्ही भावंडांमध्ये खूप प्रेम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच सुखदेवने मौन पाळले. मुलीच्या मृत्यूतून कुटुंब सावरू शकले नाही, कुटुंबातील तरुण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांची अवस्था बिकट झाली. या अपघातानंतर गावात शोककळा पसरली. पोलिसांनी सुखदेवचा मृतदेह पोस्टमार्टम करून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. गावकरी कुटुंबाचे सांत्वन करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.