पंढरीसी जारे आल्यानो संसारा अभंग

  1. अवघाचि संसार......'पायी वारी ते ऑनलाइन वारी'
  2. काही निवडक अभंग
  3. पंढरीसी जा रे आल्यानो


Download: पंढरीसी जारे आल्यानो संसारा अभंग
Size: 47.64 MB

अवघाचि संसार......'पायी वारी ते ऑनलाइन वारी'

आषाढीचा आनंद सोहळा संपन्न होतो तेव्हा पंढरपुरी भक्तीची पेठ फुलते. पण सध्याचं दृश्य काही वेगळंच सांगतंय…. चहू बाजूंनी निर्बंधाच्या विळख्यात अडकलेली वारी पंढरीच्या राजापासून भक्तांना दूर लोटतेय असं वाटू लागलं असतानाच काही वारकरी मंडळींनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्यामुळे त्यांच्या ‘वारी’मध्ये कसलीही बाधा न येता ते विठुरायाचे दर्शन घेऊ शकणार आहेत……. आषाढी वारी () रद्द केल्यामुळे कोरोना वाढत असून ​आषाढी वारीला परवानगी द्या म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी आणि इतर वादग्रस्त विधाने करताना आपण अनेक लोकांना बघतोय, ऐकतोय. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा सुवर्णमध्य काढणारे तुरळकच. अशाच काही वारकऱ्यांची शक्कल आपण जाणून घेतल्यावर त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद वाटतो एवढं नक्की. आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनमुळे वारीवर अनिश्चिततेचं सावट आहे अशातच ही ‘ऑनलाइन वारी’ यातल्या सुवर्णमध्याची पावती देते. वारकऱ्यांच्या काही गटांनी काढलेला हा सुवर्णमध्य….. ‘संगीतवर्षा’ प्रस्तुत ही ‘ऑनलाइन आषाढी वारी’ संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानापासून विठुरायाच्या चरणापर्यंत पोहोचवणारी आहे. आषाढी वारीचा परिपूर्ण आनंद देणारी आणि भक्तिभावाने भरलेली ही वारी कोरोनाच्या सगळ्या नियमांच्या संकल्पनेच्या पलीकडची आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही आषाढीकच्या पायी वारी सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले असले तरी काही मानाच्या पालख्यांसोबत आषाढी पायी वारीचा हा सोहळा पार पडणारच आहे. पण सगळ्यांना याचा आनंद घेता येणार नाही. म्हणूनच ऑनलाइन वारीचा पर्याय या वारकऱ्यांना सर्वोत्तम वाटला. आत्तापर्यंत आपण ऑनल...

काही निवडक अभंग

• · ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥ मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥ • · अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥ पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोवा ॥२॥ तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर ॥४॥ • · अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥ • · अबीर गुलाल उधळीत रंग | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥ • · अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥ • · अर्थ इतकाचि साधिला । वेद अनंत बोलिला॥१॥ विठोबासी शरण जाव...

पंढरीसी जा रे आल्यानो

पंढरीसी जा रे आल्यानो – पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तोचित्तीं निवडेना ॥३॥ अर्थ हे संसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग भक्तांच्या भेटी करता फार उतावीळ आहे आणि भक्तांची वाट तो सारखी पाहत असतो. तो कृपाळू आहे आणि भेट घेण्याकरता तो तातडी करतो त्या पांडुरंगाचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे संचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागणार नाहीत .तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देत नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा की एकरूप झाला की काही केल्या वेगळा होत नाही तो भक्तांच्या चित्तात चिद्रुप होतो. अभंग विडिओ स्वरूपात पहा .