Palkhi live location

  1. Ashadhi Wari 2023 LIVE Palkhi Tracking: पुण्यात दोन दिवस संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी; इथे करा लाईव्ह ट्रॅकिंग, पहा वाहतुकीचे डायव्हर्जन
  2. सोमवारी पुण्यात येताय, पालख्यांच्या आगमनामुळे रस्ते आहेत बंद; पोलिसांकडून लाईव्ह लोकेशनची सुविधा


Download: Palkhi live location
Size: 16.42 MB

Ashadhi Wari 2023 LIVE Palkhi Tracking: पुण्यात दोन दिवस संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी; इथे करा लाईव्ह ट्रॅकिंग, पहा वाहतुकीचे डायव्हर्जन

काल देहू तून संत तुकाराम आणि आज आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पुढील 2 दिवस पुण्यामध्ये वैष्णवांचा मेळा येणार आहे. हजारो वारकरी आणि लाखो भाविक पुण्यात या पालखींचं दर्शन घेणार आहेत. त्या दृष्टीने पुण्यात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पुणेकरांना पालखीचं लाईव्ह ट्रॅकिंग, त्यानुसार दिलेले डायव्हर्जन आणि पार्किंगची व्यवस्था पाहता येणार आहे. पहा ट्वीट 🚨उद्या पालखी लाईव्ह GPS ट्रॅकिंग,पालखी मार्ग,बंद रस्ते,पार्किंग इत्यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇🏼 त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करा — पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

सोमवारी पुण्यात येताय, पालख्यांच्या आगमनामुळे रस्ते आहेत बंद; पोलिसांकडून लाईव्ह लोकेशनची सुविधा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी (१२ जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी साेहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराममहाराज यांच्या पालखीचे आगमन, तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल, तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. वाहतुकीस बंद असणारे रस्ते (कंसात पर्यायी मार्ग) • गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता • फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स • शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन र...