पुढारी पेपर

  1. कुरुंदवाड मधील पेपर विक्रेत्याच्या मुलाचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश; रौप्य पदकावर मोहोर


Download: पुढारी पेपर
Size: 77.17 MB

कुरुंदवाड मधील पेपर विक्रेत्याच्या मुलाचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश; रौप्य पदकावर मोहोर

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © पुढारी द्वारे प्रदान केलेले कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील पेपर विक्रेत्याच्या मुलाने दिल्लीतील वेटलिफ्टिंग स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे. हर्षवर्धन दिगंबर कदम असे याचे नाव आहे. त्याने १०२ किलो वजनी गटात १९ वर्षाखालील स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. या यशाने त्याने आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक केल्याचा आनंद व्यक्त होत आहे. कुरुंदवाड येथील दिगंबर कदम हे वृत्तपत्र विक्रेता असून दररोज सकाळी ते सायकलने घरोघरी फिरून कुरुंदवाडसह ग्रामीण भागातील गावात पेपर टाकण्याचे काम करतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांचा मुलगा हर्षवर्धन कदम याने यापूर्वी रावेर (ता. जळगाव) येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ ज्युनियर, सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 110 किलो स्नॅच आणि 125 किलो क्लिन आणि जर्क असे एकूण 235 किलो वजन उचलून सुवर्ण पदक तर 19 वर्षाखालील गटात सिल्व्हर पदक प्राप्त केले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 110 किलो स्नाच आणि 134 किलो क्लिन आणि जर्क असे एकूण 244 किलो वजन उचलून रौप्यपदकाची भरारी घेतली आहे. एस के पाटील महाविद्यालयाचा तो विद्यार्थी असून संस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष जयराम पाटील हर्षवर्धनला हर्क्युलस जिमचे प्रशिक्षक प्रदीप पाटील, विजय टारे, वडील दिगंबर कदम, आजोबा बापूसाहेब कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.हर्षवर्धनच्या या यशाबद्दल कुरूंदवाड व परिसरातून कौतुक होत आहे. शेतमजुरी करणे आणि पेपर टाकणे हा आमचा रोजगार आहे.आजपर्यंत आमच्या कुटुंबातील व्यक्ती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याबाहेर कधी गेले नाहीत.आमच्या कुटुंबातील मुलगा मोठ्या शहरात आणि परदेशात जा...