रिफायनरी प्रकल्प

  1. बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात । Ratnagiri Barsu Refinery Project : Re
  2. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पात मोठं राजकीय ट्विस्ट, अनेक शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार
  3. Refinery Project : रिफायनरी प्रकल्पाचा सर्व्हे सुरू, निलेश राणे येताच महिला आंदोलकांनी ताफा अडवला; बारसूत तणाव
  4. Kokan Refinery : कोकण रिफायनरी प्रकरण चिघळणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात रिफायनरी प्रकल्प होणारच, आता माघार नाही
  5. कोकणातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्प काय आहे ? स्थानिकांचा का आहे विरोध; सविस्तर जाणून घ्या
  6. जनविरोध, भूसंपादनासारखे अडथळे टाळण्यासाठी छोटे पेट्रो
  7. बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा
  8. बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी


Download: रिफायनरी प्रकल्प
Size: 19.57 MB

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात । Ratnagiri Barsu Refinery Project : Re

Ratnagiri News : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात Ratnagiri Barsu Refinery Project : रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली. Ratnagiri Barsu Refinery Project : रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू रिफायनरीसाठी सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु होण्याची शक्यता आहे. रखडलेला सर्व्हे पुन्हा सुरु होणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. जिल्हा प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. विरोध पाहता अंदाजे 1500 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य सरकार सर्व्हे करण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस आणि जिल्हा प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. हा प्रकल्प व्हावा यासाठी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. त्यांनी याआधी प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाचे काही प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच विरोध करणाऱ्यांना समजवण्यात येईल. ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे स्पष्ट केले होते. आता बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी पुन्हा सर्व्हे सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, होत असलेला विरोध लक्षात घेता बारसू परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याआधी हा प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला विरोध असेल तर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार असताना बारसूबाबत केंद्राला पत्रही पाठविण्यात आले ...

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पात मोठं राजकीय ट्विस्ट, अनेक शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार

भाजपात कोण कोण प्रवेश करणार? काही दिवसांपूर्वी नाणारचे विभागप्रमुख राजा काजवे यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरीला समर्थन दिले होते. त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता राजा काजवे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. तर कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरी आंर्बेरकर हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेला नाणार प्रकल्पाचा विरोध भोवणार नाणार प्रकल्पाला समर्थन करणारे 50 ते 70 शिवसेनेचे कार्यकर्ते हे माजी खासदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे नाणार पंचक्रोशीतले सक्रीय कार्यकर्ते आणि सदस्यांचा यात समावेश असणार आहे. यामुळे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोध शिवसेनेला भोवण्याची चिन्हे आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता? कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या ...

Refinery Project : रिफायनरी प्रकल्पाचा सर्व्हे सुरू, निलेश राणे येताच महिला आंदोलकांनी ताफा अडवला; बारसूत तणाव

रत्नागिरी: बारसू ( barsu) गावात गेल्या दोन दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पाचे ( refinery project) सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण सुरू असलेल्या जागेची भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आज पाहणी केली. nilesh rane) हे पाहणी करून जात असतानाच आंदोलकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकल्पाला विरोध केला. या आंदोलकांनी निलेश राणे यांच्या वाहनांचा ताफा अडवला. या महिला आंदोलकांनी राणे यांना जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी तुमचा विरोध आता देशभरात पोहचला आहे. तुम्ही किती काळ बसणार आहात. तुम्ही सांगा, त्या ठिकाणी येतो. तुमच्याशी संवाद साधतो. आपण चर्चेतून मार्ग काढू, असं निलेश राणे सांगत होते. तर आधी सर्व्हेचं काम बंद करा. तरच आम्ही जागेवरून उठू. हा प्रकल्प आमच्या गावात होताच कामा नये, असा आक्रमक पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला. त्यामुळे निलेश राणे यांचीही काही काळ गोची झाली होती. राज्यात सत्तापालट होताच पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. बारसू गावात गेल्या दोन दिवसापासून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ज्या जागेवर हा सर्व्हे सुरू आहे, त्या जागेची पाहणी करण्यासाठी निलेश राणे आज बारसू गावात आले होते. निलेश राणे आले तेव्हा या ठिकाणी आंदोलक नव्हते. राणे यांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवादही साधला. त्यानंतर निलेश राणे जात असतानाच आंदोलकांनी घटनास्थळी धाव घेऊन निलेश राणे यांचा ताफा अडवला. महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत निलेश राणे यांचाही निषेध नोंदवला. तसेच राज्य सरकारचाही निषेघ नोंदवला. आमच्या गावात रिफायनरी प्रकल्प नकोच. आम्हाला सुखाने जगू द्या. हा प्रकल्प रद्द केल्याशिवया आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सर्व्हेक्षणही होऊ देणार ना...

Kokan Refinery : कोकण रिफायनरी प्रकरण चिघळणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात रिफायनरी प्रकल्प होणारच, आता माघार नाही

Kokan Refinery Project: कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण तापत असून स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांनी रिफायनरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकल्पविरोधात सुरू आंदोलनावर फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रिफायनरी विरोधातील आंदोलनात काही खरे आंदोलक असतीलही मात्र अनेक जण सुपारी घेतलेले दिसतात. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील. राज्यात कोणताही प्रकल्प आला की, त्याला विरोध केला जातो. आरे कारशेडलाही विरोध करण्यात आला. सामान्य लोकांना पुढे करून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या जागेसाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. आता, त्यांची भूमिका विरोधाची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, रिफायनरी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय नाही. तसेच रिफायनरीमुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आंदोलकांच्या मनातील शंका दूर केल्या जातील. बारसूतील जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर तेथे रिफायनरी उभारली जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.

कोकणातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्प काय आहे ? स्थानिकांचा का आहे विरोध; सविस्तर जाणून घ्या

बारसु प्रकल्पमध्ये राज्याचे राजकारण आता प्रचंड तापताना दिसत आहे. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत, विरोधकांनी वातावरण तापवल आहे. त्यातच आता यावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नवीन खुलासा केला असून उद्धव ठाकरे यांच्यासह मविआवर त्यांनी निशाणा साधला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी बारसु रिफायनरी बद्दल खुलासा केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर दडपशाहीचा आरोप करत जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका व्यक्त करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचे उदय सामंत म्हणाले आहेत. कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले असून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा टिकाव्यात ही स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय येथील रहिवाशांचा रोजगार मासेमारी हा असल्याने या तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांमुळे समुद्रात गरम पाणी तसेच आणखी काही घटकांच्या विसर्गामुळे मासे मरतील व जैवविविधतेवर धोका निर्माण होऊन त्याचा रोजगारावर परिणाम होईल यामुळे ऊर्जा, पेट्रोलियम, तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांना कोकणात विरोध होतो. ICC World Cup 2023 Schedule: ...

जनविरोध, भूसंपादनासारखे अडथळे टाळण्यासाठी छोटे पेट्रो

पीटीआय, नवी दिल्ली वार्षिक ४५ कोटी मेट्रिक टन क्षमतेचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी छोट्या पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा सरकार विचार करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय तेलमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी येथे केले. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यांत प्रस्तावित महाकाय रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या स्थानिकांचा विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरते. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे येथे आयोजित ऊर्जा शिखर परिषदेपुढे बोलताना पुरी म्हणाले की, छोट्या रिफायनरीज प्रकल्पांमध्ये भूसंपादन आणि अन्य अडथळे निर्माण होण्याचे प्रमाण कमी असेल. उल्लेखनीय म्हणजे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे वार्षिक सहा कोटी मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी स्थापन करण्याची योजना आहे. प्रथम नाणार येथे प्रस्तावित हा प्रकल्प जनविरोधानंतर, बारसू-सोलगांव येथे हलविण्यात आला, पण तेथेही ग्रामस्थांकडून विरोध आणि अडथळ्यांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… सध्या भारताची तेल शुद्धीकरण क्षमता २५.२ कोटी मेट्रिक टन इतकी आहे, ती ४५ कोटी मेट्रिक टनावर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. नवीन मोठ्या रिफायनरीजची स्थापना करणे जास्त खर्चीकही ठरत आहे. त्यामुळे साधारण २ कोटी मेट्रिक टन वार्षिक क्षमता असणाऱ्या छोट्या रिफायनरी प्रकल्प मोठ्या संख्येने स्थापण्याच्या संधी आम्ही शोधत आहोत. जर आम्ही खूप मोठ्या आकाराचे प्रकल्प आणले तर भूसंपादन आणि इतर समस्या आडव्या येतात, असे आढळून येत असल्याचे पुरी यांनी पुढे बोलताना सांगितले. वार...

बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा

“बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आमचा पहिल्या दिवसापासून विरोध आहे. मुळात ही रिफायनरी ‘ग्रीन’ नसून पर्यावरणाच्या दृष्टीने ‘रेड’ कॅटेगिरीत येत असून प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार, हे उघड आहे. सरकारने आम्हाला विश्वासात न घेता आणि आमच्यावर सत्तेचा वापर करून जमिनी ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यावर माती परीक्षण सुरु आहे. कुणबी समाजाला होणार्‍या नुकसानीसह इतर अनेक मुद्द्यांवर आमचा प्रकल्पाला विरोध असून प्रकल्प रद्द केला, तरच आम्ही सरकारशी बातचीत करू, अन्यथा सरकारशी कुठलाही संवाद होणार नाही,’ अशीही टोकाची भूमिका बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनाचे प्रमुख नेते सत्यजित चव्हाण यांनी दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडली आहे. मुळात बारसूला होणारी रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ नसून प्रदूषण मंडळाच्या सांगण्यानुसार तो ‘रेड कॅटेगिरी’तील प्रकल्प आहे. त्यामुळे बारसूत ‘ग्रीन रिफायनरी’ निर्माण होत आहे, हा समज चुकीचा आहे. या प्रकल्पाला ‘ग्रीन रिफायनरी’ संबोधून सरकार आणि त्यांच्या संस्था जनतेची फसवणूक करत आहेत. कोकणच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आणि कायम आहे. कोकणाची संस्कृती, खाड्या, समुद्र आणि या बाबी कायम राहाव्यात आणि कोकणच्या विकासासाठी वेगळे मॉडेल निर्माण व्हावे, अशी आमची मागणी आहे. गाडगीळ अहवाल येण्यापूर्वीपासून आम्ही हे बोलून दाखवलेले आहे. असे असूनही कोकणात नेहमीच असे प्रदूषणकारी प्रकल्प आणले जात आहेत. लोकांना विश्वासात न घेता, भांडवलदार आणि राजकारण्यांना फायदेशीर असणारे प्रकल्प कोकणात आणले जात असून त्याला ‘ग्रीन रिफायनरी’ म्हणून संबोधले जात आहे. आमचा अशाप्रकारचा प्रकल्पांना विरोधच आहे. बारसू हा केवळ रिफायनरी प्रकल्प नसून त्यात पेट्रोकेमिकलच...

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी By May 16, 2023 01:00 PM 2023-05-16T13:00:20+5:30 2023-05-16T13:01:00+5:30 २० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा हरित असल्याने जगातील बहुतेक रिफायनरीपेक्षा अधिक हरित आणि स्वच्छ असणार आहे. ही रिफायनरी हरित करण्यासाठी विशिष्ट अशी रचना करण्यात आली आहे. या रिफायनरीमध्ये उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून रिफायनरीमध्येच पुनर्वापर होणार आहे. त्यामुळे हे पाणी बाहेर सोडले जाणार नाही. कार्बन उत्सर्जन कमीत कमी असणारी जागतिक दर्जाची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा वापर होणार असून वायू उत्सर्जन करताना ऑनलाइन तपासणी यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यायोगे वायू परिमाण सातत्याने तपासणी नियंत्रित केली जाणार आहे. कमी कार्बन उत्सर्जन असणाऱ्या इंधनांचा वापर करण्यात येणार आहे. कसा असेल प्रकल्प - - दाेन लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित. - भारतातील सार्वजनिक तेल क्षेत्रातील इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या प्रमुख तेल कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे. - साैदी येथील M/S Saudi Aramco आणि यूएई येथील ADNOC दोन जागतिक स्तरावरील कंपन्या गुंतवणुकीसाठी इच्छुक.