संत सावता माळी अभंग

  1. संत सावता माळी
  2. संत सावतामाळी अभंग
  3. सांवता माळी (Sawta Mali) – मराठी विश्वकोश
  4. ऐकावे विठ्ठल धुरे
  5. Sant Savatamali information in Marathi language


Download: संत सावता माळी अभंग
Size: 26.48 MB

संत सावता माळी

sant savata mali information in marathi 2021 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते. या थोर संतांच्या कामगिरीनेच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा बनला आहे. महाराष्ट्रातील अशा अनेक संतांपैकी सावता माळी हे एक थोर संत महाराष्ट्रात होवून गेले.आजच्या या लेखात आपण संत सावता माळी यांच्याबद्दल माहिती घेऊ या. संत सावता माळी यांचा अल्प परिचय : संत सावता माळी यांचा जन्म इ. स. 1250 ला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुरसोबा माळी तर त्यांच्या आईचे नाव नंगिताबाई माळी हे होते. सावता माळी यांचा मृत्यू इ.स. 1295 अरण येथे झाला सावता माळी यांचे घराणे मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थान मधील औसे येथील होते. सावता माळी यांचे आजोबा देवू माळी हे अरण येथे स्थायिक झाले. नंगिताबाई आणि पुरसोबा हे दोघेही विठ्ठल भक्त होते. ते शेतकरी होते. शेती करीतच त्यांनी विठ्ठल भक्ती केली. त्यांचेच संस्कार सावता माळी यांच्या वर झाले. ते लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीत रममाण झाले. त्यांचे घराणे भगवादभक्ताचे घराणे म्हणून प्रसिद्ध होते. सावता माळी यांचे लग्न भेंड गावच्या भानवसे रुपमाळी या घराण्यातील जनाबाई यांच्याशी झाले. त्या सुद्धा विठ्ठल भक्त होत्या. विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये सावता माळी आणि जनाबाई या दाम्पत्याला झाली. सावता माळी भक्ती आणि संसार यांची योग्य सांगड घातली होती. आपले दैनंदिन कामकाज करीत त्यांनी विठ्ठल भक्ती जोपासली. ईश्वर भक्तीसाठी संसाराचा त्याग करणे, जप, योग आणि तीर्थयात्रा अशी कशाचीही आवश्यकता नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. सावता माळी यांचे अभंग साधे ...

संत सावतामाळी अभंग

माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥ २. कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥ दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥ आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥ सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥ ३. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥ मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥ सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥ ४. आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥ आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥ शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥ सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥ ५. नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥ नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥ चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥ ६ पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥ काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥ आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥ सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥ योगियां ह्रदयमकळींचें हें निधान । दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥ सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥ ७. मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥ पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥ सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥ ३ ॥ ८. भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥ जरी असतां ब्राह्मण ज...

सांवता माळी (Sawta Mali) – मराठी विश्वकोश

सांवता माळी : (१२५०–१२९५). एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव-नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत. वडिलांचे नाव परसूबा व आईचे नाव नांगिताबाई. त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. भेंड गावातील रूपामाळी भानवसे ह्यांची मुलगी जनाबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई. गृहस्थाश्रमी असूनही ते विरक्त वृत्तीचे होते. सांवता माळी : काल्पनिक चित्र संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व नामदेव ह्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातीतल्या संतांनी अभंगांद्वारे विठ्ठलाचा व भक्तीचा महिमा गायिला. सांवता महाराज हे निस्सीम विठ्ठलभक्त होते. वारकरी संप्रदाया तील तत्कालीन संतसज्जनांमध्ये त्यांचा मोठा लौकिक होता. विठ्ठलभक्तीने भारलेल्या त्यांच्या अभंगरचनांनी काव्यामध्ये भक्तिभावनेचा मळा फुलविला. त्यांचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. श्रीसकलसंतगाथे च्या पहिल्या खंडामध्ये (आवृ. २) त्यांचे काही अभंग प्रसिद्घ झाले आहेत. काशीबा गुरव नावाचे एक गृहस्थ त्यांचे अभंग लिहून ठेवीत. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांनी विठ्ठलाचे रूप पाहिले. उदा., कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ सांवता माळी यांनी विठ्ठलाच्या दृष्टिगोचररूपाचे भावस्पर्शी वर्णन पुढील एका अभंगामध्ये केले आहे : ‘विठ्ठलाचें रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्घ॥ दिगंबर मूर्ती गोजरी सांवळीं । तोडे पायीं वाळी मनगटीं ॥ कटीवरी हात, हातीं पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलींत ॥ सांवता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें । नाम विठ्ठलाचें कलियुगीं ॥’ परब्रह्मभेटीचे वर्णनही सावता माळी यांनी एका अभंगामध्ये केले असून त्यांच्या...

ऐकावे विठ्ठल धुरे

ऐ ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥ करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥ कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥ माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. संत सावतामाळी अँप डाउनलोड करा. ऐकावे विठ्ठल धुरे अभंग समाप्त. Post navigation

Sant Savatamali information in Marathi language

1.4 संत सावता महाराज यांचे राहते घर Sant Savatamali information in Marathi language संत सावता माळी संत सावता माळी हे एक संत कवी आहेत. ते संत नामदेव, ज्ञानदेव यांचे समकालीन असून पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे ते रहिवाशी होते. त्यांचे वारकरी संप्रदायातील संत जनांमुळेच अभंगरचना करायचे. आपल्या दिवसभराच्या कामात देव असतो व आपल्या भाजीपाल्यामध्ये देव शोधणारा संत सावता माळी हा आहे. त्याच्या विषयी आपण माहिती पाहूया. जन्म संत सावतामाळी हे पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव परसूबा आणि आईचे नाव नांगीताबाई होते. त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगायचे झाले, तर ते अरणभेंडी गावातील रूपमाळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरचे विठ्ठल यांचे अभंगाद्वारे व भक्ती द्वारे महिमा गायत असत. त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दनमध्येही मोठा लौकिक होता. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनांनी काव्यामध्ये भक्तिभावानेचा मळा ते फुलवीत असतात. त्यांचे अभंग काही प्रमाणात उपलब्ध आहे. व्यवसाय आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावता हे आपल्या शेतात दिवसभर कष्ट करीत असत. तसेच त्याचबरोबर ते ईश्वरभक्ती सुद्धा करत असत आणि ईश्वरभक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे. “न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची” असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता. काशीबा गुरव नावाचे व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवत असत आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्ये ही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसते. आमची माळीयाची जात | शेत लावू बागाईत | कांदा...