संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ

  1. संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ.
  2. नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल


Download: संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ
Size: 75.47 MB

संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ.

संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ. तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसेचि खळ ॥१॥ संत तुकाराम महाराज म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ.... कामं क्रोधे तैसेची खळ... तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पोटी होम हवन करत असतात त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकतं असतात. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नी मध्ये तीळ तांदूळ टाकतात तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तसाच तुमच्या कडे ठेवतात.तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा होमाला तीळ तांदूळ आहुती देऊन राग देऊन टाका होमाला आहुती देऊन राग कधीही आपल्याकडे नसावा. कां रे सिणलासी वाउगा। न भजतां पांडुरंगा॥ध्रु.॥ होम हवन करून स्वतःला तुम्ही किती प्रमाणात नेहमीच त्रास करून घेणार आहेत तुम्ही होम हवन करून स्वतःला नेहमीच शिन येऊन देऊ नका.. होम हवन करतात, पांडुरंगाला विसरून करतातं सर्व त्यापेक्षा तुम्ही पांडुरंगाला शरण जा त्यांची सेवा करा तुम्हांला कोणताही कधीही शिन येणारं नाही. मान दंभ पोटासाठीं। केली अक्षरांची आटी॥२॥ वरील कडव्यात संत तुकाराम महाराज म्हणतात,तुम्ही तुमच्या पोटाला दोन घास मिळावेत म्हणून तुम्ही जर तसेच समाजात तुमचा मान सन्मान वाढावा म्हणून तुम्ही ग्रंथ वाचन करतं असाल. तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥ संत तुकाराम महाराज म्हणतात तीर्थ क्षेत्र मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कार्याचा तसेच तुमच्या सेवेसाठी तुम्ही तिर्थ स्थानी जाऊन तुमचा अभिमान तुम्ही वाढविला आहे. वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥ जर कां कार्य करत असताना धन वाटतं राहिला तर तुंम्ही तुमचा जो आनंदी जिवणाचा अंहता आहे तो जतन करता येईल. तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघाचि अधर्म तुकाराम महाराज म्हणतात.. चुकलेलं वर्म केला अवघाची अधर्म. आपले कर्म चुकले त...

नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल

नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल – संत तुकाराम महाराज अभंग – 1808 नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥ मज मूढा शक्ती कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबड्या उत्तरीं हेंचि ध्यान ॥३॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥ अर्थ हे संतजन हो मी जे काही बोलत आहे ते माझे शब्द नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ देखील मला कळत नाही आणि जरी बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही माझ्यावर रागवू नका ही विनंती मी तुम्हाला करत आहे. हे माझे शब्द नसून माझ्या संपूर्ण अंगामध्ये व्यापून उरलेला जो पांडुरंग आहे त्याचे हे शब्द आहेत. मी तर मुर्ख आहे आणि वेदाचा विचार करण्या एवढी शक्ती माझ्या मध्ये कशी असणार. मी तर माझ्या मुखाने केवळ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी असे बोबडे शब्दाने बोलत असतो आणि त्याचे चिंतन मी नेहमी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मला तर केवळ गुरुकृपेचा आधार आहे आणि पांडुरंगाने माझा योगक्षेमाचा भार घेतला आहे. वाचा : अभंग विडिओ स्वरूपात पहा .