संतांचे अभंग मराठी pdf

  1. संत रामदासांचे सार्थ अभंग 1 ते 100
  2. पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/48
  3. Marathi Abhang


Download: संतांचे अभंग मराठी pdf
Size: 44.9 MB

संत रामदासांचे सार्थ अभंग 1 ते 100

संत रामदासांचे सार्थ अभंग १ समुदाय काय सांगों श्रीरामाचा । ‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।‌ सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌। धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ । श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने । धन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण । सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर‌‌ धन्य ते अवतार । विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण‌‌ ‍‌‌अनन्य शरण रामदास । भावार्थ – या अभंगात संत रामदास श्रीरामांच्या निकटवर्तीय समुदाया विषयी बोलत आहेत.राम जेष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार नाकारला जातो हा मोठा अन्याय आहे असे भरताला वाटते.व तो राज्य पदाचा त्याग करतो. असा निष्काम भरत, राजवाड्यातील सर्व सुखांचा ,पत्नीचा त्याग करुन रामांबरोबर वनवासात जाणारा व १४वर्षे अन्नत्याग करून उपोषण करणारा लक्ष्मण,सेवेसाठी सदैव तत्पर असणारा व जन्म सार्थकी लावणारा मारुती, भविष्याचा वेध घेऊन रामचरित्र रचणारे प्रतिभाशाली कवी वाल्मिकी ,भविष्यावर श्रध्दा ठेवून राघवाला शरण जाणारा रावणबंधू बिभिषण,सर्वभावे रामाला शरण जाणारी वानरसेना,ह्या सर्व ईश्र्वराच्या विभुती असून मी त्यांना अनन्य भावे शरण जातो असे संत रामदास म्हणतात. अभंग २ . काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी । जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन। परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ। परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे। आता सावधान होणें। भावार्थ –काळ प्रत्येक क्षणी पुढे जात आ मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही.जोवर काळ दूर आहे तोवरच प्रयत्न केले पाहिजेत.संसाराचे मायाजाल हेच दुःखाचे कारण आहे.संसार सत्य वाटत असला तरी तो क्षणभंगूर आहे.राम...

पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/48

२८ ११०. हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥ १ ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥ मोहरा तोचि अंगें । सूत न जळ ज्याचे संगें ॥ ३ ॥ तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥ १११. काय वाणू आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥ १ ॥ थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे शिवों कैसें लोखंडासी ॥ २ ॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥ ३ ॥ भूतांची दया हें भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥ ४ ॥ तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हे मुखें स्रवतसे ॥ ५ ॥ ११२. संतांचिया गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥ १ ॥ तेथे मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥ २ ॥ संतांचिया गांवीं वैरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ ३ ॥ संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ संतांचा उदीमें उपदेशाची पेंठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥ ५ ॥ तुका ह्मणे तेथे आणिक नाहीं परी । ह्मणोनि भिकारी झालो त्यांचा ॥ ६ ॥ ११३. लेंकराचे हित । वाहे माउलीचे चित्त ॥ १ ॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥ २ ॥ पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥ ३ ॥ तुका ह्मणे माझे । तैसें तुह्मां संतां ओझें ॥ ४ ॥ ११४. देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥ १ ॥ ____________________________________________ १ हातोडा, २ खोट्याचा. ३ अमित, ४ व्यापार, ५ बदला.

Marathi Abhang

नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही काही Marathi Abhang ( मराठी अभंग ) शेयर करणार आहोत, सोबतच मराठी अभंग mp३ आणि pdf देखील शेयर केली आहे आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल, चला तर मग सुरू करूया आणि पाहूया ३० पेक्षा जास्त मराठी अभंग. Marathi Abhang List : चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी Lyrics : चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स विठ्ठल विठ्ठल | Mauli Song Lyrics : विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा,मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनि तुळशी माळा गळा ह्या,पाहसी वाट त्या राऊळा आज हारपलं दे...