Sakal epaper dhule

  1. Sakal Impact : बिबट्याची दहशत; अखेर वन विभागाची दिघाव्यात धाव
  2. Dhule News : सर्पदंशाने जेसीबीचालकाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


Download: Sakal epaper dhule
Size: 42.49 MB

Sakal Impact : बिबट्याची दहशत; अखेर वन विभागाची दिघाव्यात धाव

गुरुवारी (ता. २) सकाळी ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत पिंपळनेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी शेतकऱ्याची भेट घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला. बिबट्याच्या बंदोबस्तासह बिबट्यापासून सतर्क राहून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले. तथापि, बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतशिवारात जाणे ‘जीव’ झाडाला टांगण्यासारखी परिस्थिती असल्याची‌ रडकथा ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांपुढे मांडली केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धाव दिघावे येथील शेतकऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. गुरुवारी (ता. १) ‘सकाळ’मध्ये ‘दिघाव्यात हल्लेखोर बिबट्याची दहशत कायम’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. शिवाय वन‌ विभागावरही ग्रामस्थांचा रोष असणे स्वाभाविक आहे. हेही वाचा : सकाळी सहाय्यक वनसंरक्षक एस. व्ही. पाटील, उपवनसंरक्षक नितीशकुमार सिंग, वनसंरक्षक डी. बी. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी. आर. अडकिने, वनपाल एस. पी. मंडलिक (दिघावे), पश्चिम घाट वनक्षेत्राचे वनपाल बी. पी. वाघ, वनपाल एस. व्ही. पाटील (डांगशिरवाडे), वनरक्षक टी. एल. गादेचव्हाण (दिघावे), दीपाली बडगुजर (विरखेल) आदींनी जखमी शेतकरी विवेक अहिरराव यांची भेट घेत विचारपूस केली. शेतकरी, ग्रामस्थांची ‘रड’ मात्र रडारवरच! बिबट्या असो वा पट्टेरी वाघ मात्र वन्यपशूंच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे नकोसे झाले आहे. शेतशिवारात बिबट्याने गुरुवारी सकाळी तरुण शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले. तरुण शेतकरी विवेक अहिरराव यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेनंतर कामद शिवारात शेतमजूरही येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा अधिवास शोधत पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी नितीन अहिर...

Dhule News : सर्पदंशाने जेसीबीचालकाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Dhule News : बोडकीखडी (ता. साक्री) येथे सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू झाला. मात्र, दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्ष व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (JCB driver dies of snakebite dhule news) मूळ झारखंडमधील रहिवासी असलेला कृष्णा साव हा तरुण १० ते १२ वर्षांपासून साक्री तालुक्यातील बोडकीखडी येथे जेसीबी व्यवसायानिमित्त वास्तव्यास होता. कृष्णा साव यास कानाला सर्पदंश झाल्याने त्यास दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. बराच वेळ थांबल्यानंतरही उपचार झाला नाही. सर्व कर्मचारी गैरहजर होते. त्यानंतर कृष्णा साव यास साक्री येथे नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे नेण्यास सांगितले. तेथे १०८ दहिवेल व साक्री येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने खासगी वाहनाने धुळे येथे नेत असताना नेर गावादरम्यान कृष्णा साव याचा मृत्यू झाला. धुळे येथे रुग्णालयात त्यास मृत घोषित करून विच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी झारखंडकडे रवाना करण्यात आला. हेही वाचा : कृष्णा साव यास प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी अथवा इतर कोणताही जबाबदार कर्मचारी उपलब्ध झाला नाही. दहिवेल व साक्री येथून रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी विलंब झाला. यामुळे दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, चंद्रकांत ईशी, कल्पेश चौधरी, धनंजय ग...