Sant namdev mahiti

  1. संत नामदेव गाथा श्रीविठ्ठलमाहात्म्य
  2. Sant Janabai Information in Marathi


Download: Sant namdev mahiti
Size: 21.55 MB

संत नामदेव गाथा श्रीविठ्ठलमाहात्म्य

संत नामदेव १. निर्गुणींचें वैभव आलें भक्तिमिषें । तें हेम विठ्ठलवेषें ठसावलें ॥१॥ बरविया बरवें पाहतां नित्य नवें । ह्लदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥२॥ चोविसांवेगळे सहस्रां आगळें । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध ॥३॥ वेदां मौन पडे श्रुतींसी कां नडे । वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥४॥ भावाचें आळुक भुललें भक्तिसुखें । दिधलें पुंडलीकें सांधूनियां ॥५॥ नामा ह्मणे आह्मां अनाथां लागुनी । निडारले नयनीं वाट पाहें ॥६॥ २. निर्विकल्प निराकारू । नि:शून्य निराधारू । निर्गुण अपरंपारु । चिदानंद सांबळें ॥१॥ तया पुंडलिकासाठीं । येऊनि उभें वाळवंटीं । दोन्ही कर ठेवुनि कटीं । प्रसन्न दृष्टि पाहातसे ॥२॥ ह्मणऊनि उठा घ्यारे वाट । ठाका पंढरी वैकुंठ । येर वावगे काय रे कष्ट । ब्रह्मी भेट पंढरीये ॥३॥ मूळप्राम मायापुर । पडिले भूत ग्रामा-चार । ह्मणऊनि कर जघनावर । उभा राहूनि दावितसे ॥४॥ वि-ठ्ठल नाम ह्लदयीं धरा । हाचि उतार पैलपारा । मग नाहीं येरझारा । शंभु कुमार सांगतसे ॥५॥ भेटी चौघे मुरडले । अठरा धांवतां भागले । पंथीं साहि भांडले । ते अद्यापि बुझले नाहीं ॥६॥ जो सहस्त्रा माजी न दिसे । चोविसांत न भासे । दो सहस्र अनारिसे । पाहतां अरे न दिसेचि ॥७॥ लयलक्ष लावूनि समाधि । योगियां होचि उपाधि । उघडा डोळा प्रेमपदीं । रे विठोजी न्याहाळा ॥८॥ येर वाउगि खटपट । ठाका पंढरी वाळुवंट । हरूनि मनुष्यपण दृष्ट । चतुर्भुज करिल ॥९॥ जना ऐहिक पाहारे हित । हें पंढरीचें कुळदैवत । येर वाउगे खेचर भूत । रे संगीत चित्रिंचें ॥१०॥ पूर्वज उद्धरावयाचि चाडु । तरी वेणुनादीं जेवण करा गोडु । कोटि-कुळें उद्धरती तुमच्या सुरवाडु । रे पावाल कैवल्य ॥११॥ धन्य धन्य तो संसारीं । जेणें देखिली पंढरी । जेणें सप्रेम होऊनि महाद्वारीं । लोटांगण घातलें ॥१२॥ केलें चं...

Sant Janabai Information in Marathi

• तो तेराव्या शतकाचा काळ होता. धर्माला ग्लानि आली होती आणि कर्मकांडाचे महत्व वाढले होते. त्यातच मुसलमानी अंमलामुळे धर्मावर संकट आले होते. • अशावेळी सर्व जातीतील सात्विक आणि थोर संतांनी भागवत धर्माचा प्रसार करून तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामान्य जनांना परत निर्मल, विशुद्ध आणि पूर्ण निष्काम भक्तीचा मार्ग दाखविला. • संत ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, विसोबा, गोरा कुंभार, चोखामेळा, निवृत्ति सोपान मुक्ताबाई असे सर्व जातीतील संत महात्मे, फक्त विठ्ठलाच्या भक्तीने एक झाले आणि ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत नामदेवाचे बोट धरून आली जनाबाई! तिची ओतप्रोत वत्सलता, प्रेम, सख्य, आणि समर्पण तिच्या ओव्यातून प्रकट झाले आहे. • नवविधा भक्तीचे नावही माहित नसलेली जनाबाई श्रवण, किर्तन, अहोरात्र स्मरण, अतिशय लीनतेने केलेले पाद सेवन, वंदन, अर्चन, दास्य आणि सख्य तसेच आत्मनिवेदन ह्या सगळ्या पायऱ्या ती सहजतेने पार पडते. • “दळीता कांडिता तुज गाईन अनंता” असे म्हणत काबाडकष्ट करताना अखंड नामाचा जप करून तिने विठ्ठलाला आपलेसे केले. • काबाडकष्टाचे तिला काहीच वैषम्य नव्हते. कारण तिला माहित होते की ती नामदेवाकडे आश्रित म्हणून राहिलेली होतो. जीवन आणि बालपण: • तिचा जन्म गंगाखेड येथे एका अस्पृश्य दलित कुटुंबात झाला. आईचे नाव करंद आणि वडीलांचे नाव दमा (रंड ) असे होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते. • त्यांनी पुत्र व्हावा म्हणून विठोबाला साकडे घातले .पण विठोबाने त्याला सांगीतले की त्याला गुणवान मुलगी होईल आणि तिला दामाशेटकडे ठेव. • लवकरच त्यांना मुलगी झाली आणि थोड्याच दिवसात तिची आई वारली. • रंड ने त्या मुलीला पंढरपूरच्या दामा शेट कडे सोडले. दामा शेटचे मोठे 14 माणसांचे कुटुंब होते आणि ते सर्वजण सात्वि...