Sant tukaram maharaj palkhi sohala 2022

  1. Palkhi Sohala : भक्तीमय वातावरणात तुकोबांची पालखी मुक्कामासाठी पुण्याकडे रवाना
  2. संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूमध्ये 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
  3. Pandharpur Ashadhi Wari 2022 Tukaram Maharaj Palkhi Sohala


Download: Sant tukaram maharaj palkhi sohala 2022
Size: 74.62 MB

Palkhi Sohala : भक्तीमय वातावरणात तुकोबांची पालखी मुक्कामासाठी पुण्याकडे रवाना

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी देहूनगरीतून प्रस्थान झाले. आजोळी मुक्काम आटोपल्यानंतर मंगळवारी पालखी उद्योग नगरीत दाखल झाली. मोठ्या भक्तीभावाने पिंपरी चिंचवड महानगरपालीकेतर्फे पालखी सोहळ्याचे आकुर्डीत स्वागत करण्यात आले. यानंतर रात्रीचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा हा पुण्याकडे रवाना झाला आहे. वाटेत अनेक सामाजिक संस्थांतर्फे वारक -यांना विविध साहित्याचे वाटप केले जात आहे. मंगळवारी सकाळी श्रीक्षेत्र देहूतून पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दुपारी चारनंतर पालखीचे आगमन झाले. यावेळी शहरवासियांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. आमदार महेश लांडगे, पालिका आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर माई ढोरे, राहुल जाधव, नितीन काळजे, नामदेव ढाके, राजू मिसाळ, सचिन चिखले, सुरेश भोईर, बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याकडे रवाना झाला आहे. सायंकाळच्या सुमारास पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकत्र येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वारीवर पोलिसांतर्फे ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे. रात्रीच्या सुमारास दोन्ही पालख्या मुक्काम करणार असून गुरुवारी पुढच्या प्रवासाठी त्या मार्गस्थ होणार आहेत.

संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूमध्ये 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

• • Maharashtra • संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूमध्ये 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूमध्ये 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी Sant Tukaram Maharaj Palkhi Updates: आज पहाटेपासून देहू येथील मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक संपन्न झाला आणि नंतर पहाटे पाच वाजताअभिषेक महापुजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. Photo : Sant Tukaram Maharaj Sansthan Shri Shketra Dehu twitter Sant Tukaram Maharaj Palkhi Updates: जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यार आहे. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थानकडून (Dehu Sansthan) जय्यत तयारी करण्यात आली आहे. तुकोबांच्या पालखीचा यंदा 337 वा पालखी सोहळा (337th Palkhi Sohala) आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. Also Read: • दरम्यान, आज पहाटेपासून देहू येथील मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक संपन्न झाला आणि नंतर पहाटे पाच वाजताअभिषेक महापुजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. यावेळी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती पार पडली. यानंतर संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक आणि विधिवत पूजा करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज ३३७ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमीत्त संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. — Sant Tukaram Maharaj Sansthan Shri Shketra Dehu (@SantTukaramDehu) असे आहेत आजचे देहूतील कार्यक...

Pandharpur Ashadhi Wari 2022 Tukaram Maharaj Palkhi Sohala

CLOSE येत्या २० तारखेला संत तुकोबारायांती पालखीचं प्रस्थान होणार आहे... आणि या पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झालेली आहे... पालखी प्रस्थानच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली आहेत, त्यामुळे पालखी मार्ग रुंद झाले आहेत, तर इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नगरपंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. सध्या विविध दिंड्या आळंदी आणि देहूत दाखल व्हायला लागल्या आहेत.. आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन सध्या झटतंय.