शालेय पोषण आहार योजना माहिती 2022

  1. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सुद्धा PFMS पीएफएमएस प्रणालीद्वारे मिळणार
  2. शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत
  3. संचमान्यता 2022
  4. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कार्याबाबत संचालकांचे पत्र
  5. Guru Mitra: NEW MDM SOFTWARE (शालेय पोषण आहार )
  6. MDM Portal


Download: शालेय पोषण आहार योजना माहिती 2022
Size: 66.33 MB

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सुद्धा PFMS पीएफएमएस प्रणालीद्वारे मिळणार

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सुद्धा PFMS पीएफएमएस प्रणालीद्वारे मिळणार - संचालकांचे परिपत्रक. शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान भोजन योजना ही देखील केंद्र शासनाची योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत ज्या ज्या यंत्रणांना किंवा व्यक्तींना अनुदान प्राप्त होते अशा सर्व यंत्रणा व व्यक्ती यांना यानंतर प्राप्त होणारे अनुदान हे पी एफ एम एस प्रणालीद्वारे प्राप्त होणार आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर देवकांची अदागयी 100% पीएफएमएस प्रणालीमार्फत करावयाची असल्याने सदर कामकाजाकरिता आपल्या जिल्ह्यातील योजनेस पात्र व पी एफ एम एस प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळांची सोबत जोडण्यात आलेल्या नमुन्यात माहिती शिक्षण संचालनलायस उपलब्ध करून देण्यात यावी. सदर माहिती जिल्हा लॉगिन वर उपलब्ध आहे. सदर माहिती केवळ इंग्रजीमध्ये तसेच एम एस एक्सेल फॉरमॅटमध्ये पाठवण्यात यावी. सर्व जिल्ह्यांना सूचना आहे की सदरची माहिती शाळांना द्यायचे विहित वेळेत अदा करणे करिता आवश्यक असल्याने याबाबत विलंब होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही अशा जिल्ह्यातील शाळांना अनुदान मिळण्यास विलंब झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधितावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. 💖संचालक परिपत्रक येथे 💢MDM पैसे विभागणी बाबत अपडेट

शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत

✳️ शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 🔰शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ▶️ सांकेतांक क्र- 202111151530003121 ▶️ शासन निर्णय दि .15-11-2021 ✳️ शासन निर्णय :-👇 केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेत उघडण्यास खालील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे हे शालेय पोषण आहार योजनेकरिता सिंगल नोडल एजन्सी म्हणून काम पाहतील. i. कोणतेही अतिरिक्त शुल्क खाजगी बँकेमार्फत आकारण्यात येणार नाही. ii. T+ १ पेक्षा जास्त कालावधीसाठी बँकेमध्ये निधी पडून राहणार नाही. iii. बँकेने महिनाभरात झालेल्या व्यवहारांची माहिती दरमहा शालेय शिक्षण व क्रिडा विभाग तसेच वित्त विभागास सादर करावी. iv. शालेय पोषण आहार योजनेसंबंधित शिक्षण संचालक (प्राथ.). प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधित बँकेशी करारनामा करावा. V. शालेय पोषण आहार या योजनेचे खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँक खात्याचे विभागाच्या चार्टट अकाऊंट मार्फत ऑडीट करुन शिल्लक रक्कम त्वरीत नवीन बँक खात्यात जमा करावी. Vi. प्रस्तुत योजनेच्या संदर्भात शासनाने वेळोवळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे संबंधित बँकेस बंधनकारक राहील. २. शिक्षण संचालक (प्राथ.), यांनी तात्काळ सिंगल नोडल एजन्सी (SNA) बँक खाते उघडून ते PFMS ला जोडण्याची कार्यवाही करावी. तसेच, याबाबत राज्य शासन व केंद्र शासनास अवगत करावे. ३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.८४/कोषा प्रशा-५, दि. १५ सप्टेंबर, २०२१ अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे. ४. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या ...

संचमान्यता 2022

सन २०२२-२३ च्या संच मान्यतेसाठी दि १.१२.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching Post क्लिक करून योग्य 'अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी. 1) सर्वप्रथम School पोर्टलची ही वेबसाईट ओपन करा. 2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर Sanchmanayata Tab वर क्लिक करून आपल्या शाळेचा युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. 3) लॉगिन झाल्यानंतर प्रथम आलेल्या सूचनांचे वाचन करा. व ओके बटनवर क्लिक करा. 4) त्यानंतर Working Post Tab वर क्लिक करून प्रथम Teaching Staffया Tab या Tab वर क्लिक करा. 5) त्यानंतर आपल्या शाळेचे माध्यम निवडून 01/12/2022 रोजी कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती भरून प्रथम अपडेट करावे. 6) माहिती अपडेट झाल्यानंतर फानलाईझ करावी. तथपूर्वी माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. 7) Teaching Staff या Tab ची माहिती भरल्यानंतर Working Staff Non Teaching या टॅब वर क्लिक करून शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती भरावी. 8) माहिती भरून प्रथम ती अपडेट करावी व नंतर फानलाईझ करावी. अशाप्रकारे आपली संचमान्यता माहिती भरून पूर्ण करावी. वाचा 👉 संचमान्यता माहिती कशी भरावी व्हिडिओ पहा.👇👇 ✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र ✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला ✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव ✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण ✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधा...

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कार्याबाबत संचालकांचे पत्र

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कार्याबाबत संचालकांचे पत्र. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या एका परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत पुढील प्रमाणे सविस्तर निर्देश दिले आहे. शालेय पोषण आहार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात येतो. अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करणे व त्या अनुषंगाने इतर कामकाज करणे करिता शाळा स्तरावर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्ती करण्यात येते. तथापि स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांकडून शाळा प्रशासनाकडून इतर कामे उदाहरणार्थ शाळा उघडणे बंद करणे स्वच्छतागृहांची साफसफाई शालेय वर्ग खोल्यांची साफसफाई करणे इत्यादी त्यांच्याकडून करून घेण्यात येत असल्याबाबत निवेदन प्राप्त होत आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संपाची कथा मदतीचा कामाचे स्वरूप विशद करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे. अन्न शिजवण्याचे काम करणे. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे व जेवणाच्या जागेवर करणे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे स्वयंपाक गृहासह तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे. भांड्यांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे. पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे. अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे. वरील प्रमाणे उल्लेखित कामाव्...

Guru Mitra: NEW MDM SOFTWARE (शालेय पोषण आहार )

*!! शालेय पोषण आहार योजना..!!* * NEW (MDM) Software .. !!* * शालेय पोषण आहार योजना अंतर्गत सन- 2023- 2024 साठी ...* सहज व सोप्या भाषेत कमी वेळेत सॉफ्टवेअर मध्ये दैनंदिन जातवार व मेनू नोंदवून अवघ्या काही मिनिटात बनवा मासिक व वार्षिक अहवाल माहिती.. * टीप :- माहे एप्रिल 2023 पासून भरणे आवश्यक.* इयता 1 ली ते 5 वी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील download वर टच करा.

MDM Portal

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना बँक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्याच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन, भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे. फेब्रुवारी या महिन्यात तांत्रिक समस्येमुळे दोन दिवसांची माहिती भरता आलेली नाही. फेब्रुवारी महिन्यातील राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्यासाठीची सुविधा 10 मार्च ते 14 मार्च पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. माहिती अशी भरा. Step by Step Guide. Step 1 - MDM Portal वरुन शाळेचा User ID व Password टाकून लॉगीन करा. Step 2 - I have read all information येथे टच करा. त्यानंतर Menu येथे टच करा. Step 3 - MDM Daily Attendance येथे टच करुन पुन्हा पांढऱ्या रंगातील MDM Daily Attendance येथे टच करा. (वरील image पहा.) Step 4 - माहिती भरावयाचा दिनांक निवडून माहिती भरा. सबमिट करा. कोविड- १९ साथीच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शाळांचे ऑनलाईन उपस्थितीची माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरुपातील धान्यादी मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात आलेली नाही. माहे मार्च २०२२ पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि अनेक शाळा ॲप अद्यावत नसणे. शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याची निवेदने संचालनायास प्राप्त झाली आहेत. पोषण आहार दररोजची माहिती भरण्या कर...