शरद पवार यांची संपत्ती

  1. जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!! – InMarathi
  2. शरद पवार यांची माहिती Sharad Pawar Information in Marathi इनमराठी
  3. पवारांची संपत्ती ५ वर्षात ४ पट वाढली
  4. शरद पवारांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रात माहिती उघड
  5. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वर्धापन दिन; शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन
  6. शरद पवार यांचा ‘कात्रजचा घाट’?


Download: शरद पवार यांची संपत्ती
Size: 45.50 MB

जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!! – InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल === शरद पवार हे नाव सध्या फार चर्चेत आहे, ते त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात भरती केलं या कारणासाठी. मात्र, आज राज्याचं अथवा देशाचं राजकारण बघायला गेलं, तर शरद पवार या नावाशिवाय ना ते सुरु होऊ शकत ना संपू शकत. अगदी आजही पहा ना, देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट झाली असल्याची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कार्यरत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटीविषयी उलटसुलट चर्चा सुद्धा सुरु आहेत. थोडक्यात काय, तर जिथे राजकारण आहे, राजकारणातील उत्तम हुशारी आणि चलाखी आहे तिथे शरद पवार हे नाव आलंच पाहिजे, असा जणू काही अलिखित नियमच असावा. म्हणूनच शरद पवार हे नाव राजकारणात खूप मोठं आहे. त्यांचं राजकारणातील चातुर्य दिसून येतं ते मुख्यत्वे करून त्यांच्या बोलण्यातून… एक अत्यंत मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचं राजकारणातील कौशल्य आणि वाक्चातुर्य अफलातून आहे, असंच म्हणावं लागेल. मग ते इंदिरा गांधींविरुद्ध उभं ठाकाणं असो किंवा सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या सरकारची निर्मिती करणं असो, त्यांचं कौशल्य दिसून आलं आहे. === हे ही वाचा – === त्यांचं जबरदस्त बोलणं आणि मुत्सद्दी असणं याची प्रचिती त्यांच्या तरुण वयापासूनच आलेली आहे. त्यांच्या या अफाट वाक्चातुर्याचे उदाहरण असणारे हे दोन किस्से तर तुम्हाला माहित असायलाच हवेत. त्यादिवशी विधानभवनात नेमकं काय घडलं? ही घटना आहे साधारणपणे ६० च्या दशकातली! शरद पवार त्यांच्या मित्रांसह मुंबईत फिरायला आले होते. कॉलेजच्या मित्रांसोबत मुंबईत फिरत असताना ते थ...

शरद पवार यांची माहिती Sharad Pawar Information in Marathi इनमराठी

Sharad Pawar Information in Marathi – Sharad Pawar Essay in Marathi शरद पवार यांची माहिती “काटेवाडी ते मंत्रालय” हा सर्वात मोठा प्रवास शरद पवार यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर पार केला. शरद पवार हे एका छोट्याशा गावातून जन्माला आलेले भारतीय राजकारणी आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. “पद्मविभूषण” पुरस्काराचे मानकरी असणारे, शरद पवार यांचा जीवनपट पाहणार आहोत. sharad pawar information in marathi शरद पवार यांची माहिती – Sharad Pawar Information in Marathi पूर्ण नाव शरद पवार जन्म १२ डिसेंबर १९४० राष्ट्रीयत्व भारतीय वडील गोविंदराव पवार आई शारदाबाई पवार जन्मगाव पुणे जिल्ह्यातील बारामती जन्म शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती येथील आहे. शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० मध्ये झाला. शरद यांच संपूर्ण नाव शरदचंद्र गोविंदराव पवार असं आहे. एका गरीब शिक्षण शरद पवार यांना त्यांच्या आईकडून राजकारणा विषयी ची शिकवण मिळायची. त्यासोबतच राजकीय व सामाजिक विचार करण्याची क्षमता शरद पवार यांच्याकडे होती. शरद पवार यांनी आपल्या राहत्या ठिकाणावरून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हे बारामती येथील विद्यालय येथे शरद पवार यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यामध्ये पवारांचं बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण चालू होतं, त्यावेळेला पवार यांनी जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालय व विद्यापीठ लेवलवर नेतृत्व केलं होतं. शिक्षण चालू असतानाच शरद पवार यांचा परिचय युवक काँग्रेसशी झाला. आणि तिथूनच त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. जसे राजकारणामध्ये शरद पवार यांचे अनेक चाहते आहेत तसेच, शरद पवार क्रिकेटचे चाहते आहेत. शरद पवार यांना वैयक्तिक आयुष्य शरद...

पवारांची संपत्ती ५ वर्षात ४ पट वाढली

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संपत्तीत ५ वर्षात एक नाही, दोन नाही, तर चार पटींनी वाढ झाली आहे. शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली. शरद पवार यांची संपत्ती दहा वर्षात जवळजवळ दहापटीनं वाढली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी आज शरद पवार आणि माजिद मेमन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतिज्ञापत्रानुसार पवारांच्या संपत्तीचा आकडा २००४ साली , ३ कोटी २७ लाख १७ हजार, २००९ साली, ८ कोटी ७२ लाख ३८ हजार वर्ष, २०१४ साली, ३२ कोटी ९० लाख वर्ष शरद पवारांनी २००९ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ८ कोटी ७२ एवढी संपती नमूद केली. ही संपत्ती २००४ च्या निवडणुकीच्या वेळी ३ कोटी २७ लाख रूपये दाखवण्यात आली होती. यानंतर आज शरद पवारांनी आपली संपत्ती ३२ कोटी ९० लाख रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं. • इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. • झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

शरद पवारांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रात माहिती उघड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत शरद पवारांनी त्यांच्या संपत्तीविषयी विवरणपत्रात माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या संपत्तीत गेल्या ६ वर्षात ६० लाख रूपयांची वाढ झाली आहे. पवारांची संपत्ती ३२.७३ कोटी रूपये एवढी आहे. २०१४ च्या विवरणपत्रात पवारांनी ३२.१३ कोटी रूपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. पवारांनी १ कोटी रूपयांचं कर्ज काढलं आहे. तसंच पत्नी प्रतिभा पवार यांना अॅडव्हान्स डिपॉझिट म्हणून ५० लाख रूपये मिळाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. शरद पवारांची जंगम मालमत्ता २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता ७ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपये एवढी आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांवर १ कोटी रुपयांचं कर्ज आहे. यातले ५० लाख रुपये शरद पवारांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून आणि ५० लाख रुपये पार्थ पवार यांच्याकडून घेतले आहेत. ही रक्कम शेयर ट्रान्सफरच्या बदली घेतलेलं ऍडव्हान्स डिपॉझिट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वर्धापन दिन; शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा आज पंचविसावा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त ध्वजारोहन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. पक्षाचे सर्व मोठे नेते या वेळी उपस्थित आहेत. नगर मधील मेळावा झाला होता रद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, वेधशाळेने वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे हा मेळावा लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, हा मेळावा लांबणीवर टाकण्यामागे केवळ हे नव्हे तर वेगळे कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे याची चांगली चर्चा रंगली होती होती. अजित पवारांची उपस्थिती दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रीय मेळाव्याला शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, तटकरे, जितेंद्र आव्हाड तसेच अजित पवार यांची उपस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीची देखील चांगली चर्चा रंगली आहे. नागालँड मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार नुकत्याच नागालँड मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांनाही पारंपारिक वेशभूषा परिधान करून सत्कार करण्यात आला.

शरद पवार यांचा ‘कात्रजचा घाट’?

• सुरेश पवार ‘लोक माझे सांगाती’ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे आत्मचरित्र. ‘कात्रजचा घाट’ या शब्दप्रयोगाबद्दल त्यांनी आपले मत त्यात नोंदवले आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचाचा थांगपत्ता लागू न देणे ही हातोटी राजकारणात असावी लागते. माझ्याकडे ती आहे आणि मी तिचा वापर खुबीने करत आलो आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या ज्या काही घडामोडी होत आहेत, चर्चा, तर्क होत आहेत, त्यामागे बोलविते धनी तेच असल्याचे म्हटले जाते. आता ते कोणाला कात्रजचा घाट दाखवणार, हे लवकरच स्पष्ट होईल. शरद पवार यांचे पुतणे विरोधी पक्षनेते अजित पवार गेला आठवडाभर चर्चेत आहेत. आधी ते अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आणि सोमवारी त्यांनी मुंबईतील आपले सारे कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या अशा कोणत्याही कृतीवर यापूर्वी शरद पवारांनी अंकुश ठेवलेला आहे. पण यावेळी मात्र ते ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये दिसत नाहीत. त्यामुळे बदलत्या संदर्भात शरद पवार यांच्या इशार्‍यावरच काही नवी खेळी सुरू झाली असावी, अशी जोरदार चर्चा आहे. 1978 सालच्या ‘पुलोद’च्या प्रयोगातून शरद पवार आपले रंग कसे झटक्यात बदलतात, हे दिसून आले आहे. 1980 मध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आय काँग्रेस प्रवेशाच्या तयारीत असताना, पवार आपल्यासमवेत यावेत, अशी त्यांची इच्छा होती. आपण पवारांसमवेत आय काँग्रेस पक्षात गेल्यास आपल्याला चांगले पद, मंत्रिपद मिळेल, ही त्यांची अपेक्षा होती. पण शरद पवारांनी ऐनवेळी घूमजाव केले. चव्हाणांसोबत त्यांनी आय काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही आणि चव्हाण यांना त्याची किंमत भोगावी लागली. त्यांची अवहेलना झाली. त्यांना वित्त आयोगासारखे पद देऊन ...