समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो

  1. समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार, आणखी ३ जिल्ह्यांना मिळणार लाभ
  2. समृद्धी महामार्ग : ही माहिती तुम्हाला असायला हवी
  3. समृद्धी महामार्ग माहिती। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे। नाव काय आहे
  4. समृद्धी महामार्ग कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून जाणार आहे त्याचा रोड मॅप कसा आहे ?
  5. Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर टोल किती असेल?, प्रशासनाकडून आकडेवारीचा खुलासा
  6. आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग; आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
  7. Samruddhi Highway
  8. समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला कसा होणार, राज्यातल्या इतक्या जिल्ह्यांना ठरणार लाभदायी


Download: समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो
Size: 58.26 MB

समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार, आणखी ३ जिल्ह्यांना मिळणार लाभ

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला आहे. यामध्ये नगरविकास विभागासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून रस्ते बांधकामाला गती देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितली. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg Extend) विस्तार करण्यात येणार आहे. नागपूर- मुंबईतील अंतर कमी होण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. यासाठी नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे 60 टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कोणत्या जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग? - नागपूर ते मुंबईमध्ये ७०० किलोमीटर अंतर असून १५० किमी वेगाने हे अंतर पार करता येणार आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. आता हाच महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील या रस्त्यांचा फायदा होणार आहे. यापूर्वी जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार होता. यामध्ये आता भर पडली आहे.

समृद्धी महामार्ग : ही माहिती तुम्हाला असायला हवी

maharashtra samruddhi mahamarg route map आर्थिक वाढ आणि विकासामध्ये रस्त्यांच्या बांधकामाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण सामाजिक फायदे आहेत. देशाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. सामाजिक, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आणि गरिबीविरूद्धच्या लढाईशी संबंधित इतर कारणांसाठी रस्ते नेटवर्क आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनामुळे पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. मुंबईतील JNPT (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि आंतरराष्ट्रीय हब विमानतळ मार्गे, नवीन एक्स्प्रेस वे सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी देईल आणि आम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत नेईल. मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन हायवे हा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग किंवा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र Samruddhi Mahamarg म्हणून ओळखला जातो. हा एक प्रवेश-नियंत्रित, सहा-लेन रुंद आहे (शेवटी तो आठ-लेन रुंद मध्ये बांधला जाईल) महाराष्ट्र, भारतात बांधला गेला आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात लांब ग्रीनफिल्ड रोड प्रकल्पांपैकी एक असेल, जो राज्याची दोन प्रमुख शहरे, राजधानी मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या नागपूरला जोडेल. samruddhi mahamarg information in marathi(EPC) अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीचा वापर प्रकल्पाच्या नियोजनासाठी केला जात आहे, ज्याची देखरेख सरकारच्या पायाभूत सुविधा विभाग MSRDC किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करते. Samruddhi Mahamarg 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून थेट जाण्याबरोबरच, मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग अप्रत्यक्षपणे इतर 14 जिल्ह्यांमधून फीडर...

समृद्धी महामार्ग माहिती। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे। नाव काय आहे

समृद्धी महामार्ग माहिती मुंबई ते नागपूर महामार्ग तयार करण्यात आलेला आहे या महामार्ग ला समृद्धी महामार्ग असे देखील नाव दिलेले आहे. आज आपण समृद्धी महामार्ग माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई ते नागपूर हा 710 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्ग हा दहा जिल्हा मधून जात आहे तसेच समृद्धी महामार्ग 26 तालुक्यांमधून देखील जात आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया समृद्धी महामार्ग माहिती. • • • • • • • • • • समृद्धी महामार्ग माहिती Samruddhi Highway Information in Marathi महाराष्ट्र राज्य मध्ये समृद्धी महामार्गाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा चाललेला आहे. समृद्धी महामार्ग 710 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे तसेच समृद्धी महामार्ग हा सहा पदरी असणार मार्ग आहे. समृद्धी महामार्ग यामुळे अनेक जिल्ह्यांना याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तसेच हा मार्ग चालू झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यांची दळणवळण व्यवस्था ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणार आहे. चार वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाची प्रकल्पाची किंमत हे चाळीस हजार कोटी रुपये होती. आता समृद्धी महामार्गाची प्रकल्पाची किंमत 56 हजार कोटींच्या पुढे गेलेले आहेत. देवेंद्र फडवणीस हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी 7 सप्टेंबर 2016 रोजी समृद्धी महामार्गाची महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढली होती. समृद्धी महामार्ग हा भारत देशातील पहिला आणि जगामधील तिसरा असा सर्वात मोठा असणारा महामार्ग तयार होणार आहे. समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे • समृद्धी महामार्ग हा 710 किलोमीटरचा आहे. • समृद्धी महामार्ग हा 120 मीटर रुंदीचा तसेच सहा पदरी असा असणारा महामार्ग आहे. • समृद्धी महामार्ग हा दहा ...

समृद्धी महामार्ग कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून जाणार आहे त्याचा रोड मॅप कसा आहे ?

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प का आहे, जाणून घ्या! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई – नागपुर ” समृद्धी महामार्ग ” हा मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प म्हणून अलीकडे खुपच चर्चिला जात आहे. mahasamruddhimahamarg.com सध्या स्थितीत मुंबई ते नागपूर अंतर कापवयास जवळपास १४ तास लागतात. जवळपास ८१२ किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर ७०० किमी होईल व फक्त ८ तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. तसेच औरंगाबादहुन दोन्ही ठिकाणी जाण्यास केवळ ४ तास लागणार. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनूसार उभारण्यात येईल हे विशेष! यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एम.एस.आर.डि.सी काम पाहणार आहे. मुंबई येथिल भारताचे सर्वात व्यस्त बंदर जवाहरलाल नेहरु बंदर ते नागपुर स्थित मिहान (multi model international cargo hub and airport nagpur ) यांना देखील जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर प्रवासी वाहतूकीला वेल बचतीचा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे – नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई! तसेच पाच महसुल विभाग येतात. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ ग...

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर टोल किती असेल?, प्रशासनाकडून आकडेवारीचा खुलासा

samruddhi mahamarg inauguration : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. नागपूर ते मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या या मार्गाचं काम जवळपास ८० टक्के पूर्ण झालं आहे. नागपूर ते शिर्डी या दरम्यानच्या ७०१ किलोमीटरच्या मार्गाचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना किती टोल भरावा लागेल, याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी वाहनचालकांकडून आकारण्यात येणार असल्याचं दरपत्रक महामार्गाच्या बाजूला लावण्यात आलं आहे. त्याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पुढील तीन वर्षांसाठी लागू करण्यात आलेल्या टोलचं दरपत्रक देण्यात आलेलं आहे. त्यानुसार, समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपयाप्रमाणे १२०० रुपये आकारण्यात येणार आहे. मोटर, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटर वाहनांसाठीही हाच दर लागू राहणार आहे. हलक्या परंतु मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर २.७९ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर बस आणि ट्रक या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर ५.८५ तर तीन आसनांच्या वाहनांसाठी ६.३८ रुपये अशा दर आकारण्यात येणार आहे. अवजड वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा अनेक आसनांच्या वाहनांसाठी ९.१८ रुपये प्रतिकिलोमीटरचा दर आकारला जाईल. तर अतिअवजड वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर ११.१७ रुपये वसूल केले जाणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्यानंतर महामार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आ...

आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग; आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. नागपूर व मुंबई प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करणार, अशी घोषणा केली होती. दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. या यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 क...

Samruddhi Highway

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us नरेश म्हस्के महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला थेट राजधानी मुंबईशी जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा असाच ‘तेज कदम’ म्हणजे वेगाने प्रगतीकडे नेणारा महामार्ग आहे...जाणून घेऊयात या महामार्गामुळं येऊ घातलेल्या संधी.... ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...’ असे शांताबाई शेळके यांनी त्यांच्या कवितेत म्हटलेले आहे. कारण कुठलीही वाट, कुठलाही रस्ता आपण शोधतो, त्या रस्त्याने जातो, तेव्हा आपल्याला त्या रस्त्याने पुढे जाऊन प्रगतीची (Prosperity) दार उघडावी, असेच वाटत असते; मात्र गुलजार यांनी त्यांच्या गाण्यात म्हटले आहे तसे ‘कुछ सूस्त कदम रस्ते’ असतात आणि ‘कुछ तेज कदम राहे’ असतात. महाराष्ट्राची (Maharashtra) उपराजधानी असलेल्या नागपूरला (Nagpur) थेट राजधानी मुंबईशी जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा असाच ‘तेज कदम’ म्हणजे वेगाने प्रगतीकडे नेणारा महामार्ग आहे. (Know importance of Mumbai Nagpur Samruddhi Highway) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thacekray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या महामार्गाचे मनोगत कुणी विचारले तर तो स्वतःच सांगेल की ‘किती किती काय काय घडून गेले, क्षणाक्षणाला हजारो प्रश्न पडून गेले.’ या सर्व घडण्याचे, प्रश्न पडण्याचे द...

समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला कसा होणार, राज्यातल्या इतक्या जिल्ह्यांना ठरणार लाभदायी

मुंबई : महाराष्ट्राच्या दोन टोकांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु झालाय. येत्या काही महिन्यात दुसरा टप्पाही सुरु होणाराय. हा महामार्ग कसा आहे. यावर किती एक्झिट पाँईट आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांत जायचं असेल,तर समृद्धी महामार्ग कसा फायद्याचा ठरणाराय. महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु झालाय. उपराजधानी आणि राजधानीला जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्रातल्या दोन टोकांचं अंतर निम्म्यानं कमी करणाराय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरु झालाय.समृद्धी महामार्ग एकूण १० जिल्ह्यातून जाणाराय. समृद्धी महामार्ग नागपुरातून सुरु होतो. त्यानंतर वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाण्याला हा रस्ता महामार्गाशी जोडला जाईल. येत्या काही काळात हा मार्ग नागपूरहून भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ३ जिल्ह्यांमध्ये विस्तारला जाणाराय. म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवरचं एक टोक ते मुंबई हे दुसरं टोक एकमेकांशी महामार्गानं कनेक्ट होईल. समृद्धी महामार्ग १० जिल्ह्यांतून जातोय. मात्र याद्वारे महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्ह्यांसाठी महामार्ग लाभदायी ठरणाराय. परभणीहून महामार्गाचं अंतर 102 किमी, चंद्रपूरहून 125 किलोमीटर, बीडहून 130 किलोमीटर, नांदेडहून 190 किमी, धुळ्याहून 160 किलोमीटर आणि जळगावहून 190 किलोमीटर हा महामार्ग जाणाराय. आता जर तुम्हाला समृद्धी महामार्गावरुन तुमच्या जिल्ह्यात जायचं असेल. तर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी एक्झिट पाँईट आहेत. म्हणजे कुठून तुम्हाला समृद्धी महामार्ग पकडता किंवा सोडता येईल. समजा...