विठ्ठलाचे अभंग

  1. Ashadhi Wari 2023 Blog By Mayur Borse On Maharashtra Ashadhi Wari
  2. Sant Janabai Information, Abhang
  3. सार्थ तुकाराम गाथा 1001 ते 1100
  4. Kartiki Ekadashi 2020: विठ्ठलाचे नामस्मरण, मुखी तुकोबांचे अभंग, साजरी करा कार्तिकी एकादशी; होऊन जा भजन


Download: विठ्ठलाचे अभंग
Size: 10.54 MB

Ashadhi Wari 2023 Blog By Mayur Borse On Maharashtra Ashadhi Wari

आज 10 जून 2023 पासून वारकरी संप्रदायातील असंख्य वारकरी केवळ ज्या क्षणांसाठी जिवंत असतात तो सोहळा सुरू होत आहे. आज श्री क्षेत्र देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पालख्या यापूर्वीच आपल्या परमप्रिय पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेल्या आहेत. पालख्यांबरोबर हजारो वारकरीही विठ्ठलाचा नामघोष करत पंढरपूरकडे निघालेले आहेत. त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने तसेच खान्देशातील मुक्ताईनगरहून मुक्ताईच्या पालखीने यापूर्वीच प्रस्थान ठेवले आहे. विदर्भातून रूख्मिणीच्या पालखीनेही त्याही आधी प्रस्थान ठेवले आहे. शेगावहून गजानन महाराजही पांडुरंगाच्या भेटीला निघालेले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच नरसी नामदेवहून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभर भागवत धर्माचा प्रचार, प्रसार करणाऱ्या संत नामदेव महाराज यांचीही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. पैठणहून संत एकनाथ महाराज देखील पांडुरंगाच्या भेटीसाठी आपल्या वारकऱ्यांसह निघालेले आहेत. आज आणि उद्या पांडुरंगाचे दोन लाडके संत आपल्या पालखीचे प्रस्थान ठेवतील. त्यांना वाटेत अनेक संत आपल्या हजारो नव्हे नव्हे लाखो वारकऱ्यांसह भेटतील आणि या आनंद सोहळ्याचे सौंदर्य दिवसागणिक द्विगुणित करतील. आपणही या आनंद सोहळ्यात आहोत तिथूनच सहभागी होत अप्रत्यक्ष का होईना वारी केल्याची अनुभूती घेऊ. 'ठायीच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा' या ज्ञानेश्वरांच्या शब्दांनुसार तुम्ही रोज आमच्या वेबसाईटवर दाखल व्हा. वारीतील प्रत्यक्ष अनुभवांचे उत्कट वर्णन करून आम्ही शब्दांच्या, छायाचित्रांच्या किंवा अगदीच चलचित्रांच्या माध्यमातून आपल्याला वारी घडवण्याचा प्रयत्न करू. वारी सुरू करण्यापूर्वी वारकरी संप्रदाय त...

Sant Janabai Information, Abhang

संत जनाबाई यांचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. संत जनाबाई यांचा एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे संत जनाबाई यांचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलंनी संत जनाबाईला संत नामदेव यांच्या सहवासात संत जनाबाई यांनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेव यांच्यामुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी म्हटले आहे. गौर्‍या-शेण्या वेचतांना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. संत जनाबाई यांच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाई यांच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्...

सार्थ तुकाराम गाथा 1001 ते 1100

अभंग – १००१ आणिकांसी तारी ऐसा नाहीं सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥ ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥२॥ एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥३॥ तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥४॥ अर्थ या जगामध्ये अनेकांना तारणारा असा कोण आहे तर कोणीही नाही या उलट एखादा ढोंगी मनुष्य चांगल्या मनुष्याला वाईट मार्गाला नेतो. आपल्याजवळ शुद्ध सोनेच असते पण आपण ते सोनाराकडे घेउन जातो व तो सोनार त्या सोन्याला डाग देऊन त्याचा अलंकार तयार करतो त्यामुळे सोन्याचा कस कमी होतो. जमिन पेरणी युक्त झाली चांगली झाली आणि त्यामध्ये एखाद्या मुर्खाने काळे जिरे पेरले तर त्याला जे पिक अपेक्षित आहे ते पिक त्याला कसे मिळेल. एखादी सुगरण स्त्री असेल तर तिला गव्हाचे अनेक प्रकार करता येतात गव्हाचा सांजा दिवसे गव्हाची खीर तयार करता येते. तुकाराम महाराज म्हणतात चांगल्या स्त्रीला विशापासुनही गोडी कशी तयार करवी हे समजते परंतु एखाद्या मूर्ख स्त्रीला नवनीता पासूनही चांगला पदार्थ तयार करता येत नाही याउलट ती त्याचा नास करते. अभंग – १००२ वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥ काय मानुनियां राहिले निंश्चिती । काय जाब देती यमदूतां ॥२॥ कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥ काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥ तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरती ॥७॥ अर्थ मला या लोकांचे फार आश...

Kartiki Ekadashi 2020: विठ्ठलाचे नामस्मरण, मुखी तुकोबांचे अभंग, साजरी करा कार्तिकी एकादशी; होऊन जा भजन

Kartiki Ekadashi 2020: विठ्ठलाचे नामस्मरण, मुखी तुकोबांचे अभंग, साजरी करा कार्तिकी एकादशी; होऊन जा भजन-किर्तनात दंग कार्तिकी शुद्ध एकादशी (Kartiki Ekadashi 2020) किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी यंदा 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून ओळखली जाते. कार्तिकी शुद्ध एकादशी (Kartiki Ekadashi 2020) किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी यंदा 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे, त्या दिवशी देव झोपी जातात. तसेच कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून हिंदू धर्मीयांमध्ये या दोन्ही एकादशींचे अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिकी एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते, असे सांगितले जाते. तर असा हा व्रताचा, भजन-कीर्तनाचा, विठ्ठलाची महापूजा करण्याचा दिवस खास तुकोबांचे अभंग, विठ्ठलाचे भजन ऐकून व्यतीत करा. (हेही वाचा: यंदा कार्तिकी एकादशी 24 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री, 2.43 सुरु होत असून, 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस एकादशी असेल. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.10 वाजता एकादशी संपेल. दरवर्षी कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा यावर...