तुझेच मी गीत गात आहे

  1. Tuzech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Latest Update Mama And Swara Conversation Promo Viral
  2. Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मोनिकामध्ये रंगणार जुगलबंदी; मालिका रंजक वळणावर
  3. मराठीतली पहिली म्युझिकल मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’


Download: तुझेच मी गीत गात आहे
Size: 9.77 MB

Tuzech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Latest Update Mama And Swara Conversation Promo Viral

Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निरंजन मामा हा स्वराजला समजावतो. तो म्हणतो, 'मंजुळा ही वहिनींसारखी दिसते हे मल्हार गुरुजींना सांगण्याची तुला खुप घाई झाली आहे का?' यावर स्वराज म्हणतो, 'मंजुळा ही माझ्या आईसारखी फक्त दिसत नाही तर ती माझी आईच आहे आणि मल्हार गुरुजी नाही माझे बाबा आहेत ते.' पाहा प्रोमो: काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते. त्यामुळे स्वराज हा मंजुळाला 'आई' म्हणत असतो. आता स्वराजला त्याच्या आईचं प्रेम परत मिळेल का? स्वराज उर्फ स्वरा ही मल्हारची मुलगी आहे, हे मल्हार आणि मोनिका यांना कळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे. इतर महत्वाच्या बातम्या: Published at : 14 Jun 2023 12:28 PM (IST) Tags:

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मोनिकामध्ये रंगणार जुगलबंदी; मालिका रंजक वळणावर

एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसेल. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं आहे. साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा अंदाज यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर मंजुळा हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना दिसतेय. एरव्ही उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोषाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मंजुळाच्या येण्याने मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका तुझेच मी गीत गात आहे रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

मराठीतली पहिली म्युझिकल मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’

स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेच्या प्रोमोना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोच आहे त्यासोबतच प्रोमोमध्ये वापरण्यात आलेली गाणी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. छोट्या स्वरावर चित्रित झालेलं ‘फुलपाखराच्या पंखावरचे म्या रंग मोजते सारे, मलेच ठाऊक गात गाणे येती हे कुठून वारे’ हे गाणं असो किंवा अभिजीत खांडकेकर म्हणजेच गायक मल्हार कामतवर चित्रीत झालेलं ‘उडून ये फुलपाखरा, उडून ये माझ्या घरा’ ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली स्वरा आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे असा सुप्रसिद्ध गायक मल्हारचा सांगितिक प्रवास दाखवणारी ही मालिका आहे. त्यामुळे गाणं हा या मालिकेचा आत्मा आहे. या मालिकेसाठी एक दोन नाही तर आत्तापर्यंत तब्बल १८ गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा मानस आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे. अवधूत गुप्ते,कौशल इनामदार, अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, पंकज पडघन, रोहन-रोहन, चिनार-महेश या आघाडीच्या संगीतकारांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, स्वरा बनसोडे यांच्या सुरांचा साज या गाण्यांवर चढला आहे. रोहिणी निनावे, कौशल इनामदार, अश्विनी शेंडे, श्रीपाद जोशी, दीप्ती सुर्वे, समीर सामंत या दिग्गज लेखकांच्या लेखणीतून ही गाणी साकारली आहेत.