तुझेच मी गीत गात आहे कलाकार

  1. ‘स्टार प्रवाह’वर पहिली संगीतमय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’
  2. 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत 'हा' लोकप्रिय अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
  3. Tujhech Mi Geet Gaat Aahe 300 Episodes Complete Urmilla Kothare Share Video On Social Media
  4. 'तुझेच मी गीत गात आहे'; 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचे मालिका विश्वात कमबॅक
  5. गॅरी आता होणार उर्मिलाचा नवरा; 'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये साकारणार आहे 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका


Download: तुझेच मी गीत गात आहे कलाकार
Size: 71.19 MB

‘स्टार प्रवाह’वर पहिली संगीतमय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २ मेपासून सुरू होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहेच, याशिवाय प्रोमोतील गाणीही विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मराठी वाहिनीवरील पहिलीच संगीतमय मालिका ठरणार असून खास या मालिकेसाठी १८ गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत. छोटय़ा स्वरावर चित्रित झालेलं ‘फुलपाखराच्या पंखावरचे म्या रंग मोजते सारे, मलेच ठाऊक गात गाणे येती हे कुठून वारे’ हे गाणं असो किंवा अभिजीत खांडकेकर म्हणजेच गायक मल्हार कामतवर चित्रित झालेलं ‘उडून ये फुलपाखरा, उडून ये माझ्या घरा’ ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली स्वरा आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे अशा सुप्रसिद्ध गायक मल्हारचा सांगीतिक प्रवास दाखवणारी ही मालिका आहे. त्यामुळे गाणं हा या मालिकेचा आत्मा आहे. या मालिकेसाठी एक दोन नाही तर आत्तापर्यंत तब्बल १८ गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा मानस आहे. त्यामुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, अविनाश – विश्वजित, निलेश मोहरीर, पंकज पडघन, रोहन – रोहन, चिनार – महेश या आघाडीच्या संगीतकारांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, स्वरा बनसोडे यांच्या स्वरांचा साज या गाण्यांवर चढला आहे. रोहिणी निनावे, कौशल इनामदार, अ...

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत 'हा' लोकप्रिय अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर येत्या 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Me Geet Gaat Aahe) मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) साकारणार आहे. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारेसुद्धा मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेच्या निमित्ताने ती तब्बल 12 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. उर्मिला आणि अभिजीत अशी नवी जोडी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बालकलाकार अवनी तायवाडेचीही यात भूमिका आहे. नागपूरच्या अवनीने मालिकेच्या प्रोमोंमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, ‘आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे. कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फुर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अश्या दोन्ही भावना आहेत. जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं हे आव्हानात्मक असतं. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका प्रेक्षक प्रेमाने पहात आहेत आण...

Tujhech Mi Geet Gaat Aahe 300 Episodes Complete Urmilla Kothare Share Video On Social Media

Tujhech Mi Geet Gaat Aahe :छोट्या पडद्यावरील 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्मिला कोठारेनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की ती म्हणते, 'आज आमच्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेचे 300 भाग पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सेटवर मोठं सेलिब्रेशन करण्यात येत आहे.आमरस पुरीचा बेत आहे.' या व्हिडीओला ऊर्मिलानं कॅप्शन दिलं, आज सादर होत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा ३०० वा भाग. या निमित्ताने मालिकेच्या सेटवर आज आमरस पुरीचा छान बेत करत मालिकेच्या टिमने सेलिब्रेशन केलं. पाहा व्हिडीओ: उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. उर्मिलाने 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. वैदेहीचा मालिकेत मृत्यू होतो. त्यानंतर या मालिकेत वैदेही सारख्या दिसणाऱ्या मंजुळाची एन्ट्री होते. मंजुळी ही भूमिका देखील उर्मिलाच साकारत आहे. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. इतर महत्वाच्या बातम्या: Published at : 09 Jun 2023 05:11 PM (IST) Tags:

'तुझेच मी गीत गात आहे'; 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचे मालिका विश्वात कमबॅक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच नवनवीन मालिका घेऊन प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा बहार आणत असते. त्यामुळे प्रत्येक मालिकेतील कलाकार हा प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबाचा एक भाग वाटू लागतो. यानंतर आता आणखी एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांना नवीन गोष्ट आणि नवे कलाकार भेटणार आहेत. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. पण या मालिकेत एक असा चेहरा आहे जो ओळखीचाही आहे आणि लोकप्रिय देखील आहे. हा चेहरा म्हणजे उर्मिला कानिटकर कोठारे. ही नवी मालिका येत्या २ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचे कथानक हे ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचे मराठी व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची हि गोष्ट आहे. त्यामुळे हि कथा प्रेक्षकांना अत्यंत भावणारी ठरेल असा निर्मात्यांचा विश्वास आहे. शिवाय सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर – कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आणि मालिका विश्वात कमबॅक करणार आहे. तिच्या पत्राचे नाव वैदेही असे असणार आहे आणि ती स्वराच्या आईची भूमिकेत दिसेल. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आपण साकारत असलेल्या वैदेही या भूमिकेविषयी बोलताना उर्मिला म्हणाली कि, “खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला मा...

गॅरी आता होणार उर्मिलाचा नवरा; 'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये साकारणार आहे 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात लवकरच स्टार प्रवाहवर (Star Pravah) 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या चर्चेत आहे. यामध्येच आता या मालिकेत उर्मिलासोबत गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) स्क्रीन शेअर करणार आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची कहाणी उलगडण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वरा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मात्र, स्वरा तिच्या आईसोबत राहात असून या माय-लेकींसोबत घरातील अन्य कोणतेही कुटुंबीय दिसत नाही. त्यामुळे स्वराचे वडील कोण? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. तसंच स्वरालादेखील तिच्या वडिलांविषयी काही माहित नाही. त्यामुळे या मालिकेत स्वराचे वडील हे एक गुढ असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे यामध्येच आता स्वराच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार यावरील पडदा दूर झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचं एक पोस्टर व्हायरल होत आहे. यामध्ये उर्मिलासह अभिजीत स्क्रीन शेअर करणार आहे. या मालिकेत तो स्वराच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तर, उर्मिला स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, या मालिकेत स्वराची भूमिका बालकलाकार अन्वी तायवडे साकारत आहे. अन्वीने यापूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्लसवरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साची ही भूमिका साकारली होती. तसंच सास बहू और साजीश , स्टोरी ९ मंथस की या मालिकामध्येही ती झळकली ...