तुकाराम महाराज चे अभंग

  1. तुकोबांचे निवडक अभंग
  2. संत तुकाराम गाथा


Download: तुकाराम महाराज चे अभंग
Size: 38.41 MB

तुकोबांचे निवडक अभंग

|| पांडुरंग पांडुरंग || तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात ! ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता ! संपुर्ण तुकाराम गाथा विकिसोर्स वर ज्याने उपलब्ध करुन दिलीये त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत ! आता जसे आठवत जातील तसे अभंग खालील प्रतिसादात लिहुन ठेवता येतील ! ---- आपल्याला थोडाजरी नीरक्षीरविवेक असेल ना कि मग ते वाईटातुनही चांगलं सापडत जातं आपोआप. मिपावरील काही प्रतिसाद पाहताना संत तुकाराम चित्रपटात (म्हणजे आपल्या विष्णुपंत पागनीसबुवांच्या सात्विक चित्रपटात हं), वापरलेला अभंग अचानक मनात डोकवुन गेला - अहं म्हणे ब्रह्म | नेणे भक्तीचे ते वर्म | तुका म्हणे क्षण | नको तयाचे दर्शन || मग थोडीशी शोधाशोध केल्यावर संपुर्ण अभंग सापडला , अन त्यासारखाच अजुन एक अभंगही सापडला ! 2114 विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥ सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥ अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥4॥ तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥5॥ 2117 वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिनी ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥ हरिभक्तिविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥ तुका ह्मणे तेणें ।...

संत तुकाराम गाथा

१०१. आतां तरी पुढे हा चि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा॥ १ ॥॥ ध्रु. ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा॥ ध्रु.॥ हित तें करावें देवाचें चिंतन | करूनियां मन एकविध [पं. शुद्धभावें. ] ॥२॥ तुका ह्मणे लाभ [पं. हित] होय तो व्यापार करा काय फार शिकवावें॥ ३ ॥ १०२. भक्ताविण देवा। कैंचें रूप घडे सेवा॥ १ ॥॥ ध्रु. ॥ शोभविलें येर येरां। सोनें एके ठायीं हिरा॥ ६२ ॥ देवाविण भक्ता | कोण देता निष्कामता॥ २ ॥ तुका ह्मणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥ ३ ॥ १०३. विश्वाचा जनिता। ह्मणे यशोदेसि माता॥ १ ॥॥ ध्रु. ॥ ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ ध्रु.॥ निष्काम निराळा। गोपी लावियेल्या चाळा॥ २ ॥ तुका ह्मणे आलें। रूपा अव्यक्त चांगलें॥३ ॥ १०४. काय दिनकरा। केला कोंबड्यानें खरा॥ १ ॥॥ ध्रु. ॥ कां हो ऐसा संत ठेवा। भार माझे माथां देवा॥ ध्रु.॥ आडविलें दासीं। तरि कां मरती उपवासी॥ २ ॥ तुका ह्मणे हातीं। कळा सकळ अनंतीं॥ ३ ॥ १०५. जेवितां ही धरी। नाक हागतिया परी॥ १ ॥॥ ध्रु. ॥ ऐसियाचा [पं. करितां.] करी चाळा। आपुली च अवकळा॥ ध्रु.॥ सांडावें मांडावें। काय ऐसें नाहीं ठावें॥ २ ॥ तुका ह्मणे करी। ताका दुधा एक सरी॥ ३ ॥ १०६. हो का पुत्र पत्नी बंधु त्यांचा तोडावा संबंधु॥ १ ॥॥ध्रु. ॥ कळों आलें खट्याळसें। शिवों नये लिंपों दोषें॥ ध्रु.॥ फोडावें मडकें। मेलें लेखीं घायें एकें॥ २ ॥ तुका ह्मणे त्यागें। विण चुकीजेना भोगें॥ ३ ॥ १०७. व्याल्याविण करी शोभनतांतडी। चार ते गधडी करीतसे॥ १ ॥॥ ध्रु. ॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी। सांगतां नव्हे सुखी साखरेसि॥ ध्रु.॥ कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी रूप दावी [पं. कुष्टी.] कष्टी मळिण वरी॥२॥ तुका ह्मणे अरे वाचाळ हो ऐका। अनुभवेंविण नका वाव घेऊं॥ ३ ॥ १०८. जेणें घडे नारायणीं...