तुकाराम महाराज पालखी सोहळा 2022

  1. Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखी रथाचा मान राजा व सोन्या यांच्या बैलजोडीला
  2. dehu palkhi schedule 2022 News in Marathi
  3. Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आषाढी वारीच्या तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू; इथे पहा थेट सोहळा (Watch Video)
  4. Pandharpur Wari 2022 palkhi time table
  5. ज्ञानेश्वर
  6. Ashadhi Wari 2022 Ashadhi Ekadashi Pandharpur Alandi Dehu Sant Tukaram Sant Dyaneshwar Maharaj Palkhi Latest Update Wari Schedule


Download: तुकाराम महाराज पालखी सोहळा 2022
Size: 13.68 MB

Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखी रथाचा मान राजा व सोन्या यांच्या बैलजोडीला

देहूगाव: श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचा पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार, पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या व चौघडा गाडीला जुंपण्याचा मान चिंबळी (ता. खेड) येथील सत्यवान जैद यांच्या राजा व सर्जा बैलजोडी मिळाला आहे. या निमित्ताने श्री संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने या तिनही कुटुंबांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या 33८ व्या पायी पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार, पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या व चौघडा गाडीला जुंपण्याचा मान मिळाला आहे. तर सत्यवान जैद यांच्या राजा - सर्जा बैलजोडीची निवड करण्याती आल्याची माहिती संस्थानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. या बैलांची निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांची पाहणी करून या निकषांनुसार बैल जोडींचे परिक्षण करण्यात आले. जी बैलजोडी पालखी रथाला शोभेल अशा दोन बैल जोडींची निवड आज जाहिर करण्यात आली. तर चौघडा गाडीला जुंपण्यासाठी सत्यवान जैद यांच्या राजा व सर्जा या बैलजोडीला मिळाला आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या 33८ व्या पायी पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पालखी रथाला जुंपण्यासाठी १८ बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते तर चौघड्याच्या गाडीसाठी चार बैलजोडी मालकांनी अर्ज केलेले होते. संस्थानने स्थानिक बैलजोडी मा...

dehu palkhi schedule 2022 News in Marathi

चैत्राली राजापूरकर, देहू : संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देहू देवस्थानने केली आहे. आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिर इथे अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे पाच वाजता अभिषेक महापुजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली..यावेळी विठ्ठल रूक्मिणीचं सुंदर मनमोहक रूपं दिसत होते.. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा 337 वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे. आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड़ आरती करून सुरुवात करण्यात आली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजे नंतर पालखी सोहळयाचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सोहळा असे असणार आजचे कार्यक्रम 1) सकाळी पाच वाजता महापूजा 2) सहा वाजता वैकुंठ मंदिरात पूजा . 3) सात वाजता नारायण महाराज यांच्या समाधीची विश्वस्तांच्या हस्ते महापूजा. 4) सकाळी नऊ ते अकरा संत तुकाराम महाराज यांच्या पादुका चे पूजन. 5) दहा ते बारा वाजता रमदास महाराज मोरे यांचे कीर्तन. 6) दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा. 7) पाच वाजता पालखी प्रदीक्षना . 8) स...

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आषाढी वारीच्या तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू; इथे पहा थेट सोहळा (Watch Video)

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आषाढी वारीच्या तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू; इथे पहा थेट सोहळा (Watch Video) तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 338 वं वर्ष आहे.19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. आषाढी वारीच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान सुरू झालं आहे. देहू नगरी आज भक्तिमय वातावरणात तल्लीन झाली आहे. ठिकठिकाणी आकर्षक फुलांची सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. टाळ,मृदुंगाचे नाद देखील घुमायला लागले आहेत. आज पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होणार आहे. पहा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Pandharpur Wari 2022 palkhi time table

पंढरपूर आषाढी वारी २०२२ वेळापत्रक कार्यक्रम संत तुकाराम पालखी कार्यक्रम १) पालखी प्रस्थान २० जून रोजी होणार आहे. २) पहिलं गोल रिंगण ३० जून रोजी बेलवंडी येथे होणार आहे. ३) दुसरं गोल रिंगण २ जुलै रोजी इंदापूर येथे होणार आहे. ४)तिसरं गोल रिंगण ५ जुलै रोजी अकलूज माने विद्यालय येथे होणार आहे. ५) पहिलं उभं रिंगण ६ जुलै रोजी माळीनगर येथे होणार आहे. ६) दुसरं उभं रिंगण ८ जुलै रोजी होणार आहे. ७) तिसरं उभं रिंगण ९ जुलै रोजी होणार आहे. ९) माळसिरस येथे ५ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. १०) वेळापूर येथे ६ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. ११) भंडीशेगाव येथे ७ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. १२) वाखरी येथे ८ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. १३) पंढरपूर येथे ९ जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. १४) १० जुलै रोजी आषाढी एकादशी वारी पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आषाढी वारी पारंपारिक पद्धतीने साजरी होत आहे. आषाढी वारीनिमित्त अनेक वारकरी बांधव पंढरपूरमध्ये येत आहे. त्यामुळे येणारी गर्दी विचारत घेता योग्य त्या उपाययोजना, खबरदारी, सुरक्षा, आरोग्य याबाबत आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

ज्ञानेश्वर

संत तुकाराम महाराज सन १६४९ मध्ये सदेह वैकुंठगमनाला गेले,श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती १४ टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता. तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवीत होते, पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांचेवर हळूहळू सोपवली. पुढे श्री कान्होबा यांचे निधनानंतर तर सर्वांना चुकल्या- चुकल्यासारखे होऊ लागले, दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी व काहीतरी समाधानाचा मार्ग काढण्याची जबाबदारी श्री नारायण महाराजांवर येऊन पडली, हा विचार होत असतानाच सन १६८० मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराज निवर्तले, दुःखाची एक नवी लाट आली पण सन १६८० च्या ज्येष्ठ महिन्यात देहू गावात श्रीनारायण बाबांनी टाळकरी व वारकरी यांच्यासमोर श्री तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन पंढरीची वारी करण्याची कल्पना मांडली व ती सर्व टाळकरी व वारकरी यांच्या मनाला भावली व या कल्पनेने नवचैतन्य निर्माण झाले. खऱ्या अर्थाने सन १६८० च्या ज्येष्ठ वद्य नवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून जो सोहळा सुरू झाला हाच खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याचा आरंभ होय. सन १६८० च्या ज्येष्ठ वद्य नवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून या पालखी समवेत सर्व टाळकरी आळंदीस आले, आळंदीला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्याही पादुका त्याच पालखीत ठेवून ही श्री ज्ञानेश्वर - तुकारामांची संयुक्त पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. अशाप्रकारे सन १६८० पासून सन१८३५ पर्यंत हा ज्ञानोबा तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालू राहिला. मधल्या काळात सन १८१८ च्या पु...

Ashadhi Wari 2022 Ashadhi Ekadashi Pandharpur Alandi Dehu Sant Tukaram Sant Dyaneshwar Maharaj Palkhi Latest Update Wari Schedule

देहू येथून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून उद्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकर्‍यांनी देहू आणि आळंदीच्या इंद्रायणी तीरावर गर्दी केली आहे. देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करणार असल्याने देहू गावांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं आहे. पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज शाळा मंदिर या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाई यांची महापूजा करण्यात आली तर सहा वाजता वैकुंठ अर्थाने ते संत तुकाराम महाराज यांची पूजा देखील करण्यात आली, तर दुसरीकडे सकाळी सात वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी येथे देव संस्थानचे अध्यक्ष पालखी प्रमुख विश्वस्त आणि वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते पूजा देखील करण्यात आली. सकाळी 10 ते 1 दरम्यान रामदास महाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळ्यात काल्याचे किर्तन होणार असून सकाळी नऊ ते अकरा या वेळेस इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराजांचे पादुका पूजन देखील केले जाणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभाग सेवा देणार असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचं मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाचं आज अलंकापुरीत आगमन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान होणार असून त्यासाठी माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बेळगावच्या अंकली येथील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींचे मानाचे हिरा आणि मोती हे दोन अश्व आज सायंकाळी ...