Tukaram maharaj palkhi prasthan 2022

  1. तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ; विठुरायाच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली


Download: Tukaram maharaj palkhi prasthan 2022
Size: 67.38 MB

तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ; विठुरायाच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

पंढरीच्या वाटेकडे नेणारा पालखी प्रस्थान सोहळा लक्षावधी वारकऱ्यांइतकाच सर्वसामान्य भाविकांनाही आकर्षून घेणारा असतो. याचीच साक्ष शनिवारी दुपारी श्रीक्षेत्र देहू येथे मिळत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी देहू येथून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. प्रस्थानाचा प्रारंभ शनिवारी देहू येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा उद्या आळंदीतून प्रस्थान ठेवत आहे. त्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झालेत. महापूजा बांधली श्रीक्षेत्र देहू संस्थान कमिटीच्या वतीने आज पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तुकोबांचे मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा बांधण्यात आल्या. परंपरेनुसार तपोनिधी नारायण महाराजांच्या पूजनानंतर काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारानंतर महाप्रसाद आणि महानैवेद्य दाखविल्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली. शिळा मंदिरात आणल्या तुकोबांच्या पादुका वाजत गाजत मिरवत शिळा मंदिरात आणण्यात आल्या. मंदिरात पादुकांची महापूजा झाली. मान्यवर अतिथी, विश्वस्त, संस्थानचे पदाधिकारी, मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. मानकरी आणि सेवेकऱ्यांनी तुकोबांच्या पादुका मस्तकी धारण करून मंदिर प्रदक्षिणा केली. त्यानंतर कीर्तनसेवा होऊन, अभंगांच्या गजरात दर्शनबारीला सुरुवात झाली. भक्तिमय वातावरण पांढरीशुभ्र बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा, भाळी टिळा, हातात वीणा आणि टाळ आणि मुखी विठुरायाचा आणि तुकोबांच्या जयघोष…अशा मंगलमय वातावरणात देहूनगरीमध्ये तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा उत्साही पण भक्तिमय वातावरणात सुरू आहे. इनामदार वाड्यात विसावा प्रस्थान सोहळ्यानंतर तुकोबांच...