तुकडोजी महाराज भजन संग्रह lyrics

  1. ग्रामविकास व राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे व राष्ट्रसंत तुकडोजी, लिहिली ‘ग्रामगीता
  2. हिंदी भजन संग्रह 500+ bhajan pdf likhit bhajan sangrah
  3. tukdoji maharaj
  4. तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) – मराठी विश्वकोश


Download: तुकडोजी महाराज भजन संग्रह lyrics
Size: 10.26 MB

ग्रामविकास व राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे व राष्ट्रसंत तुकडोजी, लिहिली ‘ग्रामगीता

महाराष्ट्रातील एक आधुनिक संत,भक्त,कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. १९०९ मध्ये वैशाख शुद्ध सप्तमीला तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सुमारे ५० ग्रंथांची निर्मिती केली असून,त्यांचे अप्रकाशित वाङ्मयही बरेच आहे. जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा.. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान,भजन,पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरू महाराजांनी त्यांना 'तुकड्या'म्हणून हाक मारली.'तुकड्या म्हणे',असे म्हणत जा,असे सांगितले. 'तुकड्या म्हणे'या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना करणाऱ्या तुकडोजी मह...

हिंदी भजन संग्रह 500+ bhajan pdf likhit bhajan sangrah

हिंदी भजन संग्रह 500+ pdf likhit bhajan sangrah • गोविन्द दामोदर स्तोत्र- करार विन्दे • भजे व्रजैकमण्डनं • अधरं मधुरं वदनं मधुरं, • गोपी गीत लिरिक्स • रुद्राष्टकम- नमामीशमीशान • दारिद्र्य दहन शिव स्तोत्र- विश्वेश्वराय नरकार्ण • • • • नित्य कर्म के साथ बोले जाने वाले श्लोक • गणेश वन्दना- गाइये गणपति जगवंदन • गुरु महिमा- काहू सौं न रोष तोष • मेरे सतगुरु दीनदयाल काग से हंस बनाते हैं • हे मेरे गुरुदेव करुणा,सिंधु करुणा कीजिए • बांके बिहारी रे दूर करो दुःख मेरा, • तेरी अंखिया हैं जादू भरी • श्री राम जी हमारे सब काम कर रहे है • आओ मेरी सखियो मुझे मेहँदी लगा दो • तेरी मर्ज़ी का में हूँ गुलाम • दाता तेरा मेरा प्यार कभी न बदले, • आज अयोध्या की गलियों में • मेरा आपकी दया से सब काम हो रहा है • मुरली बजा के मोहना क्यों • फूलों में सज रहे है • मेरा गोपाल गिरधारी • मेरी लगी श्याम संग प्रीत • मतवारी प्यारी चाल मेरो यशोदा को लाल • ना मैं मीरा ना मैं राधा • मैं नहीं, मेरा नहीं यह तन किसी का • किसी के काम जो आये, उसे इन्सान कहते हैं • सुना है तारे है तुमने लाखों • नंदलाल प्यारे, यशुदा दुलारे, नैनो के तारे • जय जय राधा रमन हरी बोल • जिस देश में जिस वेश में • कृष्ण कहने से तर जायेगा • • राम का नाम लेकर जो मर जायेंगे • न तो रूप है न तो रंग है • संतन के संग लाग रे • थाली भरकर ल्याइै रै खीचड़ौ • मोहे आन मिलो घनश्याम • हो गए भव से पार लेकर नाम तेरा • भाव का भूखा हूँ मैं • छोटी से किशोरी मेरे अंगना में डोले रे • उठ जाग मुसाफिर भोर भई • तेरी बन जैहैं गोविन्द गुण गायेसे • राम नाम के साबुन से जो • राम नाम के हीरे मोती • राजा दशरथ जी के द्वार नौबत बाजि रही • सीता राम सीता राम सीताराम कहिये • भगवान के ...

Menu

शिर्डीत बंधु माझा, म्हणे आडकोजी दुजा भाऊ शेगावांत, नांदतो अजी // धृ. // तिजा ताजुद्दिन ! अमुचा मित्र जीव भाव साचा / मुंगसाजी ! बंधु चवथा आमुच्या भुजी ! // १ // साईखेडचा ही दादा आमुचाची बंधुराजा / खटेश्वराची ! माझी संगती गुजी // २ // मायबाई ! माता माझी सर्वाभूती पान्हा पाजी / म्हणे दास तुकड्या यांची भक्ती ना दुजी // ३ // पहाता काय लोकांनो जवळ ही, लाभली काशी / साक्षात गुणराशी पहाता काय लोकांनो जवळ ही, लाभली काशी / कशाला धावुनी जाता उभा हा खास अविनाशी // धृ. // तिथे पाषाण शोधावा इथे प्रत्यक्ष ओलावा / दोन्ही ही पावती भावा अनुभवा येत सकळासी // १ // संत हा प्रगट शेगांवी हजारो लोक गाताती / चला जाऊ तया शरण चुके चौऱ्यांशिची फाशी // २ // कसोटी उतरला भक्ता गजानन ! संत योगी हा / लाभला किर्तीचा साचा सांगती दास आणि दासी // ३ // समाधी भासतो जागा दिसे जागेपणी विरला / म्हणे तुकड्या धरा ग्यानी दिसे साक्षात गुणराशी // ४ // अतर्क्य गुण नांदले धन्य धन्य श्रीसंत गजानन ! शेगांवी प्रगटले | अनुभवे येती जगाला भले || धृ. || देही असुनी विदेह स्थितिचे दाखवती दाखले | पाहता जन नेत्री चांगले || अपूर्व योगी परमहंस हा पाहता मन रंगले | सोडू ना वाटतसे पाउले || ( चाल ) शेगांव नगर दुमदुमे जशी पंढरी | जन अफाट येती भाविक बारी करी | राजे महाराजे लोळति चरणावरी | नग्न दिगंबर योगीराज ! हे सद्‌भक्ता पावले | अनुभवे येति जगाला भले || १ || लहर ज्यावरी झाली कृपेची सुदैव त्या लाभले | अवकृपे वंश नाश पावले || तीर्थ-प्रसादे मरणोन्मुख जे ते रोगी उठविले | औषधीविना सिध्दि पावले || शब्दमुखांतुनि निघे जणूं ते दैवि बाण सोडले | सत्यची होति न कधिंही ढळे | ( चाल ) सामर्थ्य जयाचे अगाध वाटे किती | अग्नीविण चिलिमीमधीं धूर काढिती | जन अस...

tukdoji maharaj

rashtrasant tukdoji maharaj information in marathi राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा(tukdoji maharaj) जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निघुन गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते. इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।” संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचाव?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन....

तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) – मराठी विश्वकोश

तुकडोजी महाराज : (३० एप्रिल १९०९—११ ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म बंडोजी व मंजुळामाता (वंशायाती ठाकूर, ब्रह्मभाट) या दांपत्यापोटी विदर्भातील यावली शहीद (जि. अमरावती) येथे झाला. भक्तीसंपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर. बालमाणिकाला आई-वडिलांनी वरखेडचे सिद्धपुरुष परमहंस श्रीसमर्थ आडकोजी महाराज यांच्या दर्शनाला नेले असता त्यांनी माणिकाला पोटाशी धरून जवळच्या ताटातील भाकरीचा लहानसा तुकडा त्याच्या ओठाला लावला व ‘तुकड्या-तुकड्या’ असा घोष सुरू केला. पुढे जन्मनाव माणिकऐवजी ‘तुकड्यादास’ हेच नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. लेखनकार्यात मग्न असलेले तुकडोजी महाराज बालमाणिकाला एकांती ध्यान, लोकांती भजन, गायन या गोष्टींची आवड होती. पोहणे, अश्वारोहण, योगासने आदी नव्या कला तो निर्भयपणे आत्मसात करत होता. वरखेड येथे मराठीत चवथीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्याने शाळा सोडली. समर्थ आडकोजी महाराजांच्या सेवेत असताना बालमाणिकाचे अंतरंग गुरूकृपेने, अध्यात्मशक्तीने फुलले. तेथे तुकड्यादास पंचपदीनंतर रोज अनेक संतांची भजने-अभंग गात असत. असाच एके दिवशी आडकोजी महाराजांजवळ बसून तो तुकोबारायांचे ‘तुका म्हणे, गुण चंदनाचे अंगी’ असे गात असताना आडकोजी महाराज म्हणाले, “तुका म्हणे, तू…का म्हणे? आता ‘तुकड्या म्हणे’ म्हण!” ही सद्गुरूंची आज्ञा मानून तुकड्यादास स्वकाव्य करू लागले व त्यातूनच पुढे असंख्य अभंग, भजने त्यांनी रचली. ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती, राष्ट्र-उन्नती, सर्वधर्मसमभाव, उद्योगशीलता इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून, भाषण-प्रवचनांतून प्रखरतेने मांडले. ...