तुम्ही संत मायबाप कृपावंत अभंग

  1. निवडक अभंग संग्रह


Download: तुम्ही संत मायबाप कृपावंत अभंग
Size: 16.65 MB

निवडक अभंग संग्रह

आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऎसा संतांचा महिमा । झाली बोलायची सीमा ॥२॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांणें सकळ ॥३॥ तुका म्हणॆ देवा । त्याची केली पावे सेवा ॥४॥ * ऎसा ज्याचा अनुभव । विश्‍वदेव सत्यत्वें ॥१॥ देव तयाजवळी असे । पाप नासे दर्शनें ॥२॥ काम क्रोधा नाहीं चाली । भूतीं झाली समाता ॥३॥ तुका म्हणॆ भेदा-भेद । गेला वाद खंडोनी ॥४॥ * उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ संतदर्शनें हा लाभ । पाद्मनाभ जोडला ॥२॥ संपुष्ट हे ह्रुदयपेटीं । करुनि पोटीं सांठवूं ॥३॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥ * काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥१॥ थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे शिवों कैसें लोखंडासी ॥२॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारें ॥३॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥४॥ तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्त्रवतसे ॥५॥ * काय सांगो आतां संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीवा थोडा ॥२॥ सहज बोलणें हीत उपदेश । करुनि सायास शिकविती ॥३॥ तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्तीं । तैसे मज येती साभाळीत ॥४॥ * कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जिहीं द्वंद्वंदिक दुराविलें ॥१॥ ऎसी वर्मे मज दावीं नारायणा । अंतरींच्या खुणा प्रकटोनी ॥२॥ बहु अवघड असे संत भेटी । तरी जगजेठी करुणा केली ॥३॥ तुका म्हणे मग नये वृत्तीवरीं । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥४॥ * जे कां रंजले गांजलें । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥३॥ ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो ह्रुदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥...