उद्धव ठाकरे दसरा मेळावा

  1. शिवेसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! उद्धव ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश
  2. Shivsena : दसरा मेळाव्याचा प्लॅन बी; उद्धव ठाकरे बाळासाहेबांची आयडिया वापरणार?
  3. Uddhav Thackeray Dasara Melava Live: शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी! उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष
  4. उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा
  5. शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच! : किशोरी पेडणेकर
  6. Shiv Sena Dussehra Rally 2020: मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला करत उद्धव ठाकरे राजकारणावर काय बोलणार? भाषणाबाबत उत्सुकता; शिवसेना दसरा मेळावा इथे पाहा LIVE


Download: उद्धव ठाकरे दसरा मेळावा
Size: 61.67 MB

शिवेसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! उद्धव ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश

विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवेसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत येतात. मात्र यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ सुरू आहे. असे असताना आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने जमा व्हा, असे आदेश दिले आहेत. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… शिवसेना पक्षप्रमुख हेही वाचा >> तसेच आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केले, याचीदेखील माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. आज उद्धव ठाकरे यांनी उपविभा गप्रमुख आणि विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाच्या दोन विषांयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये २१ तारखेला गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख यांचा मोळावा होणार आहे. या मेळाव्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे दोन्ही मेळावे चांगले व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहिजे. त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी, असे या बैठकीत सांगण्यात आले, अशी माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Shivsena : दसरा मेळाव्याचा प्लॅन बी; उद्धव ठाकरे बाळासाहेबांची आयडिया वापरणार?

Dasara Melava Controversy : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की शिवसेनाचा यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने दिलेले नाही. त्यामुळे हे मैदान कुणाला मिळणार याचा पेच कायम आहे. तर, दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून पर्यायी जागांचादेखील शोध घेतला जात आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर मेळावा घेता यावा यासाठीदेखीळ अर्ज करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये कोठेच परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची आयडिया वापरून यंदाचा दसरा मेळावा गाजवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. म्हणून मुंबई पालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. सध्या हा वाद सुप्रीम कोर्टात असून, यावर निर्णय येणे प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे निर्णय काहीही आला तरी शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर एकत्र जमा असे आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे जरी शिवाजी पार्क शिवसेनेला मिळाले नाही तरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने या परिसरात जमा होऊ शकतात. बाळासाहेबांची आयडिया काय? दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभा गाजलेल्या आहेत. हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी टॅक्सीवर उभं राहून भाषण केले होते असे सांगितले जाते. त्यामुळे जर शिवाजी पार्कवर कोणताही ठोस निर्णय न झाल्यास उद्धव ठाकरेदेखील अशाच पद्धतीने भाषण करू शकतात, अशी शक्यता आहे. तर, न्यायालयाची पायरी चढणार 'साम टीव्ही'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्कचा हा गोंधळ आणखी वाढला तर शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालय...

Uddhav Thackeray Dasara Melava Live: शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी! उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष

live Uddhav Thackeray Dasara Melava: हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून आपली शिवसेना पळवायला निघालेत -उद्धव ठाकरे Uddhav Thackeray Dasara Melava : शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर हा दसरा मेळावा होत असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या या मेळाव्याआधी शिंदे गटाकडून शिवसेनेतील आणखी 5 आमदार आणि 2 खासदरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना दसरा मेळावा- उद्धव ठाकरे Uddhav Thackeray Dasara Melava : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. रावणाने सन्यासाचा वेश घेऊन सीता पळवली तसे हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून आपली शिवसेना पळवायला निघालेत अशी असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला. स्वत:चे विचार नाहीत, म्हणून बाळासाहेबांचे फोटो लावताहेत, आनंद दिघे जाऊन 20 वर्षे झाली, आता दिघे आठवताहेत कारण आता आनंद दिघे बोलायला नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांच्यावर जाबाबदारी दिली ते कटप्पा बनले. त्यांनी कट करून गद्दारी केली अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला. Also Read: • • • भाजपवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींवर देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी टिकास्त्र सोडले. पुढे बोलताना ते म्हणाले आम्ही मोदींच्या मुलाखती आजही ऐकतोय, पाकव्याप्त काश्मीरमधील एक इंचही घेऊ शकला नाहीत, चीनने घेतलेली जमीन घेऊन दाखवा, तिकडे शेपटा घालयच्या आणि इंकडे येऊन पंजे दाखवता, हिंमत असेल तर चीन, पाकिस्ताने घेतलेली जमीन परत मिळवून दाखवा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशी शब्दात उद...

उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us मुंबई : आज मुंबईतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असल्याने शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा होता. कोरोनाचं सावट असल्याने यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा शिवतीर्थावरून न होता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडला. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून न बोलता शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्राला आपल्या दसरा मेळाव्यातून संबोधित केलं. वर्षभर मनात साचलेलं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बोलून दाखवलं... • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत, काही वेळातच शिवसैनिकांना संबोधित करणार • आपल्या संपूर्ण परिवारासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत • शिवाजी पार्कवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात जात उद्धव ठाकरे नतमस्तक • उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, सोबतच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल • उद्धव ठाकरे सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, ढोलताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत • शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा पहिल्यांदाच सभागृहात, कोरोनामुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचं संबोधन • उद्धव ठा...

ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील बंडाळी नंतर आज प्रथमच दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच २ दसरा मेळावा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानात होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारीही सुरु आहे. आपले राजकीय वजन सिद्ध करण्यासाठी आणि शिवसैनिक आपल्याकडे आहेत हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केला जात आहे. शिंदे आणि ठाकरेंसाठी आजचा दसरा मेळावा म्हणजे प्रतिष्ठेची लढाईच म्हणायला हवी. शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आमचीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. याशिवाय शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे खेचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे काही पुरावे द्यावे लागतात. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त गर्दी खेचून आपलीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शिंदे गट आणि ठाकरेंकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा दोघांसाठीही अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. खरं तर शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठीदोन्ही गट उत्सुक होते मात्र मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाने बीकेसी मैदानाची जागा निवडली. बीकेसी मैदान हे शिवाजी पार्क पेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठं आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका करत आपले इरादे स्पष...

शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच! : किशोरी पेडणेकर

मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा या दोन गोष्टींचं नातं गेली अनेक वर्ष टिकून आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी येत असतात. मात्र शिवसेनेत सुरु असलेल्या खडाजंगीमुळे यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच "दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल.", असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शनिवारी (२७ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलत असताना म्हणाल्या. "दरवर्षी साधारण पाच ते सहा कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. गेली ५६ वर्ष शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड कोणीही पुसू शकत नाही. शिवसेना कोणाची याबाबत कोर्टात सुरु असलेल्या लढ्याशी पालिकेचा काही संबंध नाही. त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली न येता पालिकेने याही वर्षी परवानगी दिलीच पाहिजे.", असे किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदार म्हणून सदा सरवणकर दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतात. मात्र यावेळी त्यासंबंधी कुठलेही पत्र त्यांनी अद्याप पाठवलेलं नाही. यावर "सदा सरवणकर यांनी यात आडकाठी घेऊ नये. त्यांनी अशाप्रकारचे कुठलेही दळभदरी काम करू नये ज्याने मुंबईकर नाराज होईल. ", अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आता पुढचा वारसदार कोण? अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.

Shiv Sena Dussehra Rally 2020: मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला करत उद्धव ठाकरे राजकारणावर काय बोलणार? भाषणाबाबत उत्सुकता; शिवसेना दसरा मेळावा इथे पाहा LIVE

Shiv Sena Dussehra Rally 2020: मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला करत उद्धव ठाकरे राजकारणावर काय बोलणार? भाषणाबाबत उत्सुकता; शिवसेना दसरा मेळावा इथे पाहा LIVE शिवसेना दसरा मेळाव्यास मोठी परंपरा आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा गेली अनेक वर्षे साजरा होत आला आहे. मात्र, यंदा ही परंपरा कोरोना व्हायस संकटामुळे खंडीत झाली आहे. यंदा हा मेळावा दादर येथील सावरकर स्मारकात केवळ 50 जणांच्या उपस्थित साजरा होणार आहे. मात्र हा संपूर्ण सोहळा सर्वांना ऑनलाईन पाहता येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आज पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना दसरा मेळाव्यात (Shiv Sena Dussehra Melava 2020) शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजता हे भाषण शिवसना सोशल मीडिया अधिकृत अकाऊंट्सवर पाहता येणार आहे. उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना ((Shiv Sena ) मोठ्या प्रमाणावर मवाळ धोरण स्वीकारताना पाहायला मिळाली आहे. दरम्यान गेल्या काही काळात महाराष्ट्र, मुंबई पोलीस, शिवसेना, महाविकासआघाडी सरकार, आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार आरोप करण्यात आले. याशिसोबतच अर्णब गोस्वामी, अभिनेत्रि कंगना रनौट, भाजप यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका केली. आक्षेपार्ह वक्तव्यं केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना दसरा मेळावा व्यासपीठावरुन काय बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना दसरा मेळाव्यास मोठी परंपरा आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा गेली अनेक वर्षे साजरा होत आला आहे. मात्र, यंदा ही परंपरा कोरोना व्हाय...