विठ्ठलाचे नवीन अभंग

  1. Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
  2. मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग
  3. vitthal dandi, aashadhi ekadashi pandharpur
  4. Kartiki Ekadashi 2022 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचे खास मराठी अभंग, पाहा व्हिडीओ
  5. श्री संत सेना महाराज यांची संपूर्ण माहिती
  6. Sant Kanhopatra Information


Download: विठ्ठलाचे नवीन अभंग
Size: 71.63 MB

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळया ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते. यांचे कुटुंबीय 'काळेश्वर' या ग्राम देवतांचे उपासक होते. त्यांचे आई वडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांचे वडील गावात संत माधव बुवा म्हणून ओळखले जायचे. त्यांना आठ अपत्ये झाली पण दुर्देवाने ते फार काळ जगली नाही.आपल्या आठही मुलांना त्याने दारुण हृदयाने पुरले. पण ईश्वराची किमयाच वेगळी पांडुरंग साक्षात माधवबुवांच्या घरी ब्राह्मणाचे वेष घेऊन आले आणि त्यांना दुखी होण्याचं कारण विचारले. त्यावर माझ्या मुलांना मी माझ्या हाताने पुरले आहे आणि माझे आठही मुलं देवाने नेले. असे सांगितल्यावर पांडुरंगाने माधवबुवांना ज्या जागी मुलांचे मृतदेह पुरले आहे तेदाखवण्यास सांगितले आणि प्रेत बाहेर काढण्यास सांगितली. पांडुरंगाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रेत काढले आणि पांडुरंगाने त्या सात ही मुलांना जिवंत केले आणि स्वर्गात पाठवणी केली. नंतर त्यांनी आठव्या मुलाला देखील जिवंत केला आणि तो देखील स्वर्गाकडे जायला निघाला तेवढ्यात पांडुरंगाने त्यांना थांबविले आणि माधवबुवा आणि रखुमाईच्या हातात दिले आणि म्हणाले गोरीतून काढल्यामुळे ह्याचे नाव गोरोबा असेल.अशी आख्यायिका आहे. संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत,भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात.त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवयास सांगून पाणी आणवयास गेली असता,श...

मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती करणारे भक्तशिरोमणि संत नामदेव महाराज ! त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंढरपूर येथील त्यांच्या वाड्यांतील विठ्ठलाच्या मूर्तींचे भावपूर्ण दर्शन घेऊया. खूप लहान असतांना संत नामदेव यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले ‘आज तू देवाला प्रसाद दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही, तर देवापुढे वाट बघत बसले की, केव्हा हा खाईल ! बाल नामदेवाच्या भोळ्या भावाला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’, या ओवीतून संत नामदेव यांच्या भक्तीभावाचा स्तर लक्षात येतो. एकदा एका कुत्र्याने पोळी पळवली. त्याला ती कोरडी खावी लागू नये, म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे गेले. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असणार्‍या संत नामदेवांना त्या कुत्र्यातही विठ्ठलाचे दर्शन झाले होते. संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना (अनुमाने १२५ पदे) केली. त्यातील साधारण ६२ अभंग ‘नामदेवजी की मुखबानी’ या शीख पंथाच्या ‘गुरुग्रंथ साहेब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्‍वर यांचे चरित्र सांगितले आहे. शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥ एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं ...

vitthal dandi, aashadhi ekadashi pandharpur

वास्तविक पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंडरी अशी नावे वेगवेगळ्या काळात देण्यात आली. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामधील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. MH GOVT नामदेवांच्या अभंगातही कानडेपणाचा उल्लेख येतो. कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी || इतकेच नव्हे तर नामदेव त्याच्या भाषेचाही उल्लेख करतात विठ्ठल कानडे बोलू जाणे | त्याची भाषा पुंडलिक नेणे || रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर हे अनुक्रमे पुंडरीकपूर व पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द उत्पन्न झाला असे मानतात. चौ-याऐंशीच्या शिलालेखात (1273) पंढरपूरास फागनिपूर व विठोबास विठठ्ल किंवा विठल म्हटले आहे. 1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. 1258 च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचिरते ग्रंथात पंढरपूर, विठठ्ल मंदिर व तेथील गरूड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रूक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच...

Kartiki Ekadashi 2022 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचे खास मराठी अभंग, पाहा व्हिडीओ

Kartiki Ekadashi 2022 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी जवळी आली आहे. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. कार्तिकी एकादशीचे ही आषाढी एकादशी इतके महत्व आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने अवघ्या देशभरातून वारकरी मंडळी पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने येतात. अनेक वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पायी दिंडी काढतात. विठ्ठलाच्या नावाचा गजर आणि त्याला टाळ, मृदुंगाची साथ अशा भक्तीमय वातावरणात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. वारकरी विठ्ठल नावाचा जयघोष करत असतात आणि विठ्ठलच्या गजराने आसमंत दुमदुमतो. विठूरायाचे खास अभंग गात वारकरी तल्लीन होतात. विठ्ठुरायाचे अभंग ऐकल्यानंतर वेगळीच उर्जा निर्माण होते. विठ्ठलाची आरती, अभंग ऐकल्यानंतर छान वाटते. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी विठ्ठलाचे काही खास अभंग घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया, पाहा खास अभंगाचे व्हिडीओ पाहा व्हिडीओ

श्री संत सेना महाराज यांची संपूर्ण माहिती

श्री संत सेना महाराज यांची संपूर्ण माहिती सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले. जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या ...

Sant Kanhopatra Information

पंढरपूर पासून १४ ते १५ मैलावर मंगळवेढा हे गाव आहे. त्या गावामध्ये शामा नावाची एक सुंदर वैश्या राहत होती. शामा कडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते. अनेक मुस्लिम सरदारांना, अमिर उमरावांना खुश करण्याचे काम ही शामा करीत असे. शामा ला एक मुलगी होती ती शामा पेक्षा नव्हे तर एका अप्सरेपेक्षा ही खूप सुंदर होती, तिचे नाव कान्होपात्रा. व्यवसायासाठी शामा ने कान्होपात्रेला नाचणे व गाणे या दोन्ही कला शिकवल्या. लावण्यवती असली तरी समाजात त्यांना काही स्थान नव्हते. तरी शामा ला तिची मुलगी राजवाड्यात राहण्या योग्य आहे असे वाटत होते. शामा ने तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावर कान्होपात्राने सांगितले माझ्यापेक्षा गुणवान आणि राजबिंड्या मुलालाच मी पसंद करेन. मला माझ्या योग्यतेचा कोणताच पुरुष दिसत नाही. कान्होपात्रेने शामा च्या निर्णयाला नकार दिला. एके दिवशी कान्होपात्रेच्या दारावरून वारकऱ्यांची दिंडी ताल मृदूंगाच्या तालावर राम कृष्ण हरी च्या गजरात विठ्ठलाचे भजन करीत चालली होती. कान्होपात्रेने त्यांना विचारले "तुम्ही एवढे तल्लीन होऊन कोणाचे भजन कीर्तन करत आहात." त्यावर वारकरी कान्होपात्रेला म्हणाले "आम्ही वैकुंठाचा राजा, सावळ्या सुंदर अश्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी चाललो आहोत." विठ्ठलाच्या रूप गुणाचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने वारकर्यांना विचारले "तुम्ही वर्णन केलेला ऋषी माझा अंगीकार करेल का?" "का नाही आमचा विठोबा तुझा अंगीकार नक्कीच करेल. तू एकदा त्याला पहिले तर तू त्याचीच होशील" असे वारकऱ्यांचे बोलणे ऐकून कान्होपात्रा वारकऱ्यांसोबत पंढरपूरला निघाली. राम कृष्ण हरी विठ्ठलनामाचा गजर करीत कान्होपात्रा पंढरीला आली. मंदिरात जेव्हा तिला विठ्ठलाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे...