विठ्ठलाची आरती

  1. Shri Vitthalachi Aarti
  2. श्री विठ्ठल आरती
  3. विठ्ठलाची आरती


Download: विठ्ठलाची आरती
Size: 40.52 MB

Shri Vitthalachi Aarti

श्री विठ्ठलाची आरती युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।। तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी ।गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।१।। धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।२।। ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।३।। आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।। दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।४।।

श्री विठ्ठल आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।। तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।। 2।। धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव ।।3।। ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।। जय देव ।।3।। ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।4।। आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।। दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव ।।5।।

विठ्ठलाची आरती

विठ्ठल पूजेच्या वेळी किंवा पूजेत नैवेद्यादी समर्पणाचा उपचार पूर्ण झाल्यानंतर शेवटी आरती, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. आरतीमध्ये देवतेचे माहात्म्यवर्णन आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते. भक्तीमार्गात आरतीला महत्त्वाचे स्थान आहे. विठोबाची आरती युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।। धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।। ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।। आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती । दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।। – संत नामदेव अन्वय, अर्थ आणि भावार्थ विठ्ठल अठ्ठावीस युगांपासून पंढरपूरला विटेवर उभा आहे । (त्याच्या) वामांगी (डावीकडे) रखुमाई (रुक्मिणी) (उभी असून) दिसे दिव्य शोभा (त्याचे रूप अत्यंत शोभायमान आहे) । परब्रह्म (विठ्ठल) पुंडलिकासाठी (पुंडलिकाच्या मिषाने सार्‍या भक्तांसाठी) पंढरीला येऊन राहिले आहे । त्याच्या चरणाशी भीमा (चंद्रभागा) वहात असून तीही भक्तगणांचा उद्धार करत आहे ।। १ ।। हे देवा पांडुरंगा, तुझा जयजयकार असो ! हे रखुमाई आणि राई यांच्या वल्लभा (पती), (हे) जिवलगा (प्राणाहून प्रिय असलेल्या) (मला) पाव (प...