दैनिक ऐक्य

  1. पुढचा सुपरस्टार (दैनिक ऐक्य, सातारा) – Crickatha


Download: दैनिक ऐक्य
Size: 48.42 MB

पुढचा सुपरस्टार (दैनिक ऐक्य, सातारा) – Crickatha

तो सगळ्यात पहिल्यांदा नजरेत भरला २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात. तो विश्वचषक आपण जिंकला होता. त्यावेळी सगळ्यात जास्त हवा झाली ती आपल्या कर्णधाराची, आणि ते साहजिकच होतं. पण संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख फलंदाज म्हणून देखील त्याने छाप सोडली होती. ६ सामन्यात १२४ च्या सरासरीने ३७२ धावा, त्यात १ शतक आणि ३ अर्धशतके. शुभमन गिलने त्या स्पर्धेवर आपली छाप सोडली होती. पुढे रणजी ट्रॉफी, भारत ‘अ’ अश्या पायऱ्या चढत तो भारतीय संघात दाखल झाला. आणि आता तो ज्या प्रकारे खेळतो आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग करतो आहे ते पाहता शुभमन गिल हा ‘लंबी रेसका घोडा’ आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. तो केवळ २३ वर्षांचा आहे, पण आज त्याच्याकडे भारतीय फलंदाजीचं भविष्य म्हणून बघितलं जात आहे. खेळाच्या तीनही प्रकारात तो चमकतोय. गेल्या दोन महिन्यात पट्ठ्यानेतीनही प्रकारात शतकेठोकलीआहेत. १४ डिसेंबर ला बांगलादेश विरुद्ध कसोटीमध्ये ११०, १५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ११६, पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत २ शतकं – त्यात एक द्विशतक, आणि नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत परत एक खणखणीत शतक. शुभमन गिलचेग्रह जोरात आहेत. हे बोलणं कदाचित खूप धाडसाचे असेल, पण शुभमन हा विराट नंतरचा भारतीय क्रिकेट मधला सर्वात मोठा स्टार होऊ शकतो. शुभमन एका टिपिकल पंजाबी घरातला. जलालाबाद जवळच्या एका खेड्यात वाढलेला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण नशिबाने साथ दिली नाही. ते आपल्या गावात शेती करत राहिले. त्यांनी आपल्या मुलामध्येआपली स्वप्नं बघितली, आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. स्वतःच्या शेतात एक छोटंसं मैदान तयार करून शुभमनला तिथेच क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. योग्य वेळी ते त्याच्या क्रिकेटसाठी म...