ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा

  1. Sanjeevan Samadhi Sohala : माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा प्रारंभ 7 लाख भाविक येण्याची शक्यता, dnyaneshwar maharaj sanjeevan samadhi sohala seven lakhs devotees likely to come
  2. Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2022: संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त Quotes, WhatsApp Status द्वारा शेअर करा माऊलींचे विचार
  3. समाधी साधन, संजीवन नाम!
  4. Padharpur Wari 2023 : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून ११ जून ला प्रस्थान
  5. पैठणः ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती, किरणोत्सवाचा देखणा सोहळा
  6. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी होणार प्रस्थान; लाखो वारकरी आळंदीत दाखल


Download: ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा
Size: 77.71 MB

Sanjeevan Samadhi Sohala : माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा प्रारंभ 7 लाख भाविक येण्याची शक्यता, dnyaneshwar maharaj sanjeevan samadhi sohala seven lakhs devotees likely to come

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा ( Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi sohala ) , कार्तिकी यात्रेला गुरुवारी सकाळी 7 महाद्वारातील गुरु हैबत बाबाच्या पायरी पूजनाने प्रारंभ होणार आहे. एकादशीची मुख्य पुजा रविवारी तर माऊलीचा संजीवन सोहळा कार्तिक वैद्य त्रयोदशीला पार पडणार आहे. संजीवन समाधी सोहळा सात लाख भाविक दाखल होण्याची शक्यता : देवस्थानच्यावतीने प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष ॲड विकास ढगे यांनी दिली आहे. आळंदीमध्ये दोन वर्षाच्या निर्बंधानंतर हा सोहळा होणार आहे. त्यामुळे सात लाख भाविक आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. आजपासूनच भाविक आळंदीत सहभागी होत आहेत. असेही अध्यक्ष यांनी सांगितलेला आहे. संस्थांच्या वतीने, आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने, राहण्याच्या दृष्टीने,संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून. या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आल्याचं संस्थांचे अध्यक्ष विकास ढगे यांनी सांगितलेला आहे. नमामि इंद्रायणी प्रोजेक्ट राबवण्याची मागणी : संस्थेच्या वतीने राज्य शासनाकडे नमामिगंगेच्या धर्तीवर नमामि इंद्रायणी हा प्रोजेक्ट राबववा अशी मागणी करण्यात आलेली ( Namami Indrayani project Demand ) आहे. त्यातून आरोग्याचा जो प्रश्न आहे वारकऱ्यांचा तो सुटेल. वारकरी पवित्र स्नान म्हणून इंद्रायणी नदीत स्नान करतात. त्या ठिकाणी काही कारखाने, काही लोक घाण पाणी सोडून नदी अस्वच्छ झाली आहे. ती स्वच्छ व्हावी ,पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई देखील करावी. अशी मागणी सुद्धा संस्थांनी प्रशासनाक...

Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2022: संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त Quotes, WhatsApp Status द्वारा शेअर करा माऊलींचे विचार

Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2022: संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त Quotes, WhatsApp Status द्वारा शेअर करा माऊलींचे विचार वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. त्यांची रचना देखील ज्ञानेश्वर महाराजांची आहे. महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा आहे. यामधील संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली (Sant Dnyaneshwar) यांचं योगदान आजही जगाला दिशादर्शक आहे. वयाच्या 21 व्या वर्षी समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळा हा कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी पाळला जातो. यंदा हा दिवस 22 नोव्हेंबर दिवशी आहे. यानिमित्त आळंदीला संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळ्याच्या (Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala) निमित्ताने खास कार्यक्रम असतात. मग या दिवशी तुम्ही देखील स्मरण करून त्यांच्या विचारांचा वसा पुढील पिढीला देण्यासाठी माऊलींचेच काही खास विचार शेअर करून हा दिवस त्यांच्या नामस्मरणामध्ये घालवू शकतात. कोरोना नंतर यंदा पहिल्यांदाच हा संजीवन समाधी सोहळा निर्बंधमुक्त वातावरणामध्ये होणार आहे. त्यामुळे ज्ञानोबा दर्शनाला अनेक भाविक गर्दी करण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्वर यांचे विचार संत ज्ञानेश्वर । File image संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा श्री गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो.कार्तिकी अष्टमीला संजीव समाधी सोहळ्याला सुरुवात होते. तेथून कार्तिक अमावस्येपर्यंत या सोहळ्यात विविध कार्यक्रम असतात. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. त...

समाधी साधन, संजीवन नाम!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक कृष्ण त्रयोदशी (मंगळवार ता. २२ नोव्हेंबर) आहे. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी समाधी घेणे असे नाही, तर चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत त्याठिकाणी ब्रह्मभावाने स्थिर राहावे, असा बोध आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी ही श्री क्षेत्र आळंदी येथे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नेमक्या कोणत्या स्वरूपाची आहे, अशी आशंका अनेकांच्या मनी निर्माण होते. यासाठी प्रथमतः समाधी म्हणजे काय याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘समधीयते अनेन इति समाधी।’ ज्याच्याद्वारे अंतःकरणाचे समाधान केले जाते त्यास समाधी म्हणतात. समाधी या शब्दामध्ये ‘चिंतायाम्।’ हा मूळ धातू आहे म्हणजे. ज्या साधनाद्वारे भगवंताचे चिंतन केले जाते, त्यास समाधी असे म्हणतात. या प्रकारे समाधीचे शब्दमर्यादेत चिंतन आहे. समाधीचा विचार प्रामुख्याने योग आणि वेदांत शास्त्रात केला आहे. वेदांत शास्त्रामध्ये निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीसाठी निदिध्यासन नावाचे साधन प्रतिपादन केले आहे. या साधनात अनात्माकार वृतीचा परित्याग करून वृत्तीचा आत्माकार प्रवाह अखंड सुरू ठेवावा लागतो. हे निदिध्यासन परिपक्व होते त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात. योग शास्त्राचे सूत्रकार भगवान पंतजलींनी अष्टांग योगातील एक महत्त्वाचे अंग समाधी आहे. तिचे विवरण करण्यासाठी योग सूत्रातील समाधीपाद नावाचा एक विभाग खर्ची घातला आहे. त्यात योगशास्त्राच्या दृष्टीने समाधी म्हणजे काय त्याचे स्वरूप काय याचा अतीव सूक्ष्म विचार केला आहे. त्यात निर्बीज समाधीचा विचार सांगताना श्री पंतजली मुनी समाधीपादाच्या अखेरीस सांगतात, तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः॥१.५१॥ ऋतंभरा प्रज्ञा जन्य संस्कार न...

Padharpur Wari 2023 : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून ११ जून ला प्रस्थान

Ashadhi Padharpur wari 2023 :महाराष्ट्रातील वारवारी संप्रदायाच्या दृष्टीने आषाढी वारीला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यातील वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागलेली असते त्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर आता ज्ञानेश्वर माऊलींच्याआषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे११जूनला पंढरपूरकडेप्रस्थान होणार आहे. १४जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल.१४व१५जूनला सासवड मुक्काम,१६जूनला जेजुरीकडे प्रस्थान,१७जूनला जेजुरी मुक्काम,१८जूनला लोणंद येथे सोहळा मुक्काम.१९जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि२०जूनला तरडगाव,२१जूनला फलटणकडे प्रस्थान आणि२२जूनला फलटण मुक्काम,२३ला नातेपुते,२४जूनला माळशिरस मुक्काम,२५जूनला वेळापूर,२६जूनला भंडी शेगाव,२७जूनला वाखरी,२८जूनला पंढरपूर, २९जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.३जुलै पौर्णिमेपर्यंत माऊली पालखी सोहळा पांढरी नगरीत विसावेल.

पैठणः ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती, किरणोत्सवाचा देखणा सोहळा

पैठणः तालुक्यातील आपेगाव येथे गुरुवारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा (Paithan Dyaneshwar Mauli) समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते, त्यामुळे माऊलींच्या मुखावर पडणारा किरणोत्सव अनुभवता येईल की नाही, अशी चिंता भाविकांना होती. मात्र दुपारी सूर्यदर्शन झाले आणि भाविकांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 735 व्या संजीवन समाधी (Sanjeevan Samadhi Sohala) सोहळ्याची ज्ञानोबा माऊलींच्या गजरात भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवारी दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून कार्तिकी काल्याची सांगता झाली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखकमलावर पडलेली सूर्यकिरणे पहाटेपासून गोदातीरावर भाविकांचा समुदाय आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात गुरुवारी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. वारऱ्यांनी सकाळपासूनच किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात मिळेल तिथे जागा धरली होती. दुपारी ठिक 12.52 वाजता सूर्यदर्शन झाले आणि माऊलींच्या तेजोमय मूर्तीवर काही काळ सूर्यकिरणे पडली. माऊलींच्या दर्शनासाठी सूर्यदेवही आला. हा विलक्षण सोहळा भाविकांनी याचि देही याचि डोळा अनुभवला. माऊलींच्या मंदिरात फुलांची आरास ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. गोदा काठावर गुरुवारी भल्या पहाटेपासूनच भाविकांनी स्नान करत महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले. नंतर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी होणार प्रस्थान; लाखो वारकरी आळंदीत दाखल

बेळगावजवळच्या अंकली येथून माऊलींचे मानाचे अश्व आळंदी मुक्कामी पोचले आहेत. माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आली आहे. वारकऱ्यांची गजबज दोन दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गजबज सुरू झाली आहे. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आळंदीकडे येत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी जादा फेऱ्या करण्यात येत आहेत. स्वच्छतागृहांची सोय आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, वीणेकरी, टाळकरी यांचे आगमन अलंकापुरीत झाले आहे. आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवण्याचा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरीक, सर्वसामान्य भाविकांचीही गर्दी जमू लागली आहे. प्रशासनाच्या वतीने आळंदीमध्ये विविध यंत्रणा सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. वीज वितरणविभाग, पाणीपुरवठा विभाग, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभागाची विविध पथके कार्यान्वित झाली आहेत. मोठ्या संख्येने फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. आजोळघरी मुक्काम चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरवात होणार असून, पहिल्या दिवशी माऊलींचा पालखी सोहळा आजोळघरी आळंदी येथेच विसाव्यासाठी मुक्कामी असेल. सोमवारी (१२ जून) सकाळी माऊलींचा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू करेल. प्रस्थान सोहळा - पहाटे पाचपासून धार्मिक विधींना प्रारंभ. - सात वाजल्यापासून दर्शनबारी खुली. - बारा वाजता महानैवेद्य. - काल्याचे कीर्तन. - माऊलींच्या पादुकांची प्रदक्षिणा. - समाधी मंदिरात महापूजा. - सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात.