जय जय महाराष्ट्र माझा लेखक

  1. जय जय महाराष्ट्र माझा
  2. जय जय महाराष्ट्र माझा ह्या कवितेचे लेखक कोण आहेत? » Jay Jay Maharashtra Majha Hya Kaviteche Lekhak Kon Ahet
  3. Maharashtra State Official Song: 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार
  4. deepaligavhane: जय जय महाराष्ट्र माझा


Download: जय जय महाराष्ट्र माझा लेखक
Size: 55.60 MB

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा गीत - संगीत - स्वर - राग - गीत प्रकार - टीप - • हे पद (या पदाची पहिली दोन कडवी) महाराष्ट्र राज्याचे 'राज्यगीत' म्हणून अंगिकरण्यात आले आहे. • राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते, तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. मात्र राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. • राज्यगीत १.४१ मिनिटात वाजवले अथवा गायले जावे. Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.

जय जय महाराष्ट्र माझा ह्या कवितेचे लेखक कोण आहेत? » Jay Jay Maharashtra Majha Hya Kaviteche Lekhak Kon Ahet

उत्तर Vokal App bridges the knowledge gap in India in Indian languages by getting the best minds to answer questions of the common man. The Vokal App is available in 11 Indian languages. Users ask questions on 100s of topics related to love, life, career, politics, religion, sports, personal care etc. We have 1000s of experts from different walks of life answering questions on the Vokal App. People can also ask questions directly to experts apart from posting a question to the entire answering community. If you are an expert or are great at something, we invite you to join this knowledge sharing revolution and help India grow. Download the Vokal App!

Maharashtra State Official Song: 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार

महाराष्ट्राला राज्याचे स्वतःचे राज्यगीत मिळाले आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 हे गीत अंगिकारण्यात येत आहे. शाहीर साबळे यांनी गायलेले 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राजा बढे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. महाराष्ट्राला मिळाले — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) व्हिडिओ पहा ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

deepaligavhane: जय जय महाराष्ट्र माझा

अर्थ- माझा महाराष्ट्र थोर आहे. त्याचा सदैव जयजयकार असो अशी गर्जना महाराष्ट्रतील लोक करतात. या महाराष्ट्राच्या भूमीरूपी घागरीत रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रावती, गोदावरी या नया आपले पवित्र पाणी एकतेने भरत आहे. या थोर महाराष्ट्राचे सैन्य भेट उत्तरेकडे जावून तट्टांना यमुनेचे पाणी पाजणार. असा हा महाराष्ट्र माझा आहे व त्याचा मला अभिमान आहे. अर्थ - आमच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या व विरोधात बोलणाऱ्यांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही. गडगडणारे ढग आम्हाला घाबरवू शकत नाही. यांना उत्तर देण्यासाठी आमच्या जिभाच पुरेशा आहेत. अशीच शिकवण सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवराय यांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्या शिकवणीच्या घोषणा दरीदरीतून घूमत आहेत. हा महाराष्ट्र माझा आहे. अर्थ - या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहेत. त्यांच्या या काळ्या छातीवर महाराष्ट्राविषयी असलेल्या अभिमानाची लेणी कोरली आहेत. त्यांची मनगटे पोलादी आहेत. त्यामुळे ते जीवावरचा खेळखेळण्यास मागेपुढे पहात नाही. महाराष्ट्रील लोक दारिद्र्याच्या उन्हात शिजतात, पण कष्ट करून ते निढळाचा घाम गाळतात. भरपर कष्ट करतात. पिढ्यानपिढ्या इथे देशगौरवासाठी लोक झिजले आहेत. दिल्लीच्या सिंहासनाचीही शान राखणारा असा महाराष्ट्र आहे.