जय जय रघुवीर समर्थ

  1. संतांची महती
  2. समर्थ रामदास
  3. मनाचे श्लोक


Download: जय जय रघुवीर समर्थ
Size: 77.72 MB

संतांची महती

आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अलौकिक अश्या संतांची परंपरा लाभलेली आहे. अश्या या आपल्या थोर संतांनी जनतेला त्यांच्या संतवाणीतून वेळोवेळी जीवन जगण्याचे मार्गसांगितले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या या अत्यंत महत्वाच्या अश्या व्यक्तीबद्दल व त्याच्या जीवनकार्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातील संतांनी माहिती व त्यांची कार्यें मराठीतून बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर - संत ज्ञानेश्वर हे इ. स.१३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत व कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला. आपेगाव हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. संत ज्ञानेश्वरांना इतरही भावंडे होती. त्यातील त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ व इतर लहान भावडांची नावे संत सोपानदेव व बहीण संत मुक्ताबाई अशी होती. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित " संत ज्ञानेश्वर " हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीतर्फे काढण्यात आलेला असून तो १८ मे १९४० रोजी मुंबई व पुण्यात एकाच वेळी प्रसिद्ध झाला होता. त्याचबरोबर " संत ज्ञानेश्वर" नावाचा एक हिंदी चित्रपट ही १९६४ मध्ये काढण्यात आला होता. संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला खूप चांगली आणि मौलाची शिकवण दिली व वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे इद्रायणी नदीच्या काठी जीवन समाधी घेतली. म्हणून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनाच्या या संजीवन समधीचा सोहळा कार्तिक वदय षष्टी ते आमावस्येपर्यंत साजरा केला जातो. संत मुक्ताबाई - संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहीण होत्या. त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी ...

समर्थ रामदास

II श्रीराम समर्थ II ।। श्रीरामनामावली।। 1 निर्गुणरूप जय जय राम 2 सगुणरुप जय जय राम 3 मत्स्यरूप जय जय राम 4 कूर्मरूप जय जय राम 5 वराहरूप जय जय राम 6 नरहरिरूप जय जय राम 7 वामनरूप जय जय राम 8 भार्गवरूप जय जय राम 9 रघुपतीरूप जय जय राम 10 रामकृष्णरूप जय जय राम 11 बौद्धरूप जय जय राम 12 कलंकीरूप जय जय राम 13 रघुपतीराघव जय जय राम 14 रविकुलमण्डन जय जय राम 15 दशरथनंदन जय जय राम 16 कौसल्यात्माज जय जय राम 17 जलदप्रभानिभ जय जय राम 18 राजीवलोचन जय जय राम 19 आजानुबाहू जय जय राम 20 अभयकरांबुज जय जय राम 21 कार्मुकपाणी जय जय राम 22 नरतनुधारी जय जय राम 23 सुरसाहकारी जय जय राम 24 धर्मसंस्थापक जय जय राम 25 करुणासागर जय जय राम 26 भक्तवत्सल जय जय राम 27 षड्रीपुभंजन जय जय राम 28 दीनदयानिधी जय जय राम 29 दोषनिवारण जय जय राम 30 पतितपावन जय जय राम 31 हृदयनिवासी जय जय राम 32 इंद्रियचालक जय जय राम 33 त्रैलोक्यपालक जय जय राम 34 भवभयहारक जय जय राम 35 भवविषशामक जय जय राम 36 निजसुखकारक जय जय राम 37 अखिलतीर्थाटन जय जय राम 38 वैराग्यवर्धक जय जय राम 39 गुरुपदरंजक जय जय राम 40 ज्ञानप्रकाशक जय जय राम 41 ऋषिमनतोषक जय जय राम 42 शस्त्रास्त्रग्राहक जय जय राम 43 ताटिकामर्दन जय जय राम 44 सुबाहुच्छेदक जय जय राम 45 मारिचत्रासक जय जय राम 46 गुरुमुखरक्षक जय जय राम 47 अहिल्योद्धारण जय जय राम 48 विदेहपावन जय जय राम 49 कोदंडभंजन जय जय राम 50 भूजावल्लभ जय जय राम 51 पराजितभार्गव जय जय राम 52 अयोध्यागामिन जय जय राम 53 पितृवचनांकित जय जय राम 54 राज्यत्यागिन जय जय राम 55 वल्कलाधारीन जय जय राम 56 गूहकपावन जय जय राम 57 जटाजूटशोभित जय जय राम 58 चित्रकूटवासिन जय जय राम 59 वायसपीडक जय जय राम 60 भरतकृपाकर जय जय राम 61 योगधारीन जय जय र...

मनाचे श्लोक

श्रीसमर्थ रामदासकृत मनाचे श्लोक ॥ जय जय रघुवीर Samartha || गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥ मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥ मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥ देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥ सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी। दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥ देहेदु:ख ते सूख मानीत जावे। विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥ __________________________________________________________ जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक च...