Live tv9 marathi news

  1. India vs Australia WTC Final 2023 Highlight


Download: Live tv9 marathi news
Size: 18.16 MB

India vs Australia WTC Final 2023 Highlight

India vs Australia Live Score, WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाचे फलंदाज झटपट बाद करण्याचं आव्हान, आज ठरणार सामन्याचा निकाल मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून टीम इंडियाला विजयासाठी 280 धावा आवश्यकता आहे. भारताने रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा हे आघाडीचे फलंदाज गमावले असून 7 गड्यांना हा स्कोअर गाठायचं आहे. लक्ष्य कठीण असलं तरी भारतीय फलंदाजांकडे टी 20 चा अनुभव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली तर विजय सोपा होऊ शकतो. त्यामुळे हार न पत्काराता विजयासाठीच लढत दिली पाहीजे. भारताने चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांची खेळी केली आहे. अजूनही भारताला विजयासाठी 280 धावांची आवश्यकता आहे. पण यासाठी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना संयमी खेळी करावी लागेल. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ उरला असून 7 गडी हातात आहेत. करो या मरोच्या लढाईत टी 20 सारखी रणनिती अवलंबली तरी विजय खेचून आणू शकतो. यासाठी उरलेल्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळणं गरजेचं आहे. • टीम इंडियाने 444 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पहिली विकेट गमावली आहे. बॉलंडने शुबमन गिल याला कॅप्टन कॅमरुन ग्रीन याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 18 धावांची खेळी केली. दरम्यान पहिली विकेट गमावल्यानंतर टी ब्रेक झाला आहे. टीम इंडियाने 7.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 41 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 403 धावांची गरज आहे. • टीम इंडियाच्या दुसऱ्या आणि सामन्यातील चौथ्या डावाची सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 173 धावांच्या आघाडीसह दुसरा डाव हा 270 धावांवर घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं मजबूत आव्हान मिळालंय. या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला रोहित शर्मा आणि शु...