मराठी अभंग लिस्ट

  1. अभंगगाथा


Download: मराठी अभंग लिस्ट
Size: 49.32 MB

अभंगगाथा

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग १) तुकोबांच्या अभंगगाथेची अनेक वैशिष्ट्ये आहेत- तुकोबांची गाथा चाळताना असे वाटले की काही अभंग चरण हे "वन लायनर" सारखे देखील मांडता येतील का ? कारण हे जे एक एक चरण आहेत ते इतके प्रभावी आहेत, यात जी एक गोडी आहे ती हे चरण असे नुसते मांडत गेलो तरी लक्षात येईलच ...... उदा. मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी-वाक्प्रचार आपण या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आणि हे अभंगांचे चरण मराठी भाषेचा एक अविभाज्य भागच बनून गेले आहेत. १] तुझे आहे तुजपाशी | परि तू जागा चुकलासी | २] लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा | ३] बोलाचीच कढी बोलाचाच भात | जेऊनिया तृप्त कोण झाला ४] नाही निर्मळ जीवन | काय करील साबण | हे व असेच अनेक वाक्प्रचार आपण नित्याच्या बोली भाषेत इतके सहज वापरत आहोत की कित्येकदा हे तुकोबांच्या अभंग गाथेतील आहे असे जर कोणी आपल्याला सांगितले तर आपण आश्चर्याने - अरेच्चा, हे तर माहितच नव्हतं की - असेच म्हणू !! तसेच बुवांचे जे अभंग आहेत त्याचे वर्गीकरण असेही करता येईल - १] काही उपदेशपर, २] काही परमार्थ - साधना विशद करणारे, ३] काही अभंगातून बुवांनी स्वतःबद्दल सांगितलंय ,४] या अभंग रचनेबद्दलही काही अभंग आहेत, ५] व्यावहारिक ज्ञान विशद करणारे अभंग, ६] नेमकी भक्त लक्षण सांगिणारे अभंग इ. या अभंग चरणांना स्वतःचा असा एक बाज आहे, सौंदर्य आहे, सहजता आहे... कधी हे अभंग-चरण आपल्याला अंतर्मुख करतात तर कधी आपलेच दोष असे दाखवतात की नकळत आपल्याला हसूही फुटते. जीवनाचे तत्वज्ञान बुवा सहजतेने या "एका" चरणात मांडतात तर समाजातील दोष मोठ्या मार्मिकतेने दाखवतात .... समाजाचे सूक्ष्म अवलोकन केलेला हा महापुरुष किती वेगवेगळ्या प्रकारे सामान्यांक...