पांडुरंगाचे अभंग lyrics

  1. नव्हे आराणूक परि
  2. संत तुकाराम महाराज: जन्मकथा, बालपण, कार्य.
  3. भजन साहित्य खजिना Bhajan Sahitya Khajina: चला हो पंढरी जाऊ । अभंग Chala Ho Pandhari Jau
  4. पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/13
  5. ऐक रे जना


Download: पांडुरंगाचे अभंग lyrics
Size: 25.80 MB

नव्हे आराणूक परि

नव्हे आराणूक परि – नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥ पंढरीसि जावें उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥ नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥ तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाठी ॥३॥ अर्थ प्रपंचात राहून समाधानी राहतो, जो पांडुरंगाचे चिंतन करतो,त्याला पांडुरंगच साह्य करतो.पंढरीला जावे असे जो मनात ठरवतो,त्याला पांडुरंग भेटल्या शिवाय राहत नाही.जरी देहात बळ नसले,देह पराधीन असला तरी पांडुरंगाचे चिंतन कधीही सोडू नये.तुकाराम महाराज म्हणतात चिंतन करता करता देह पडला तरी त्याची परवा करू नये.परत पांडुरंगाची भक्ती करण्या साठी मनुष्य जन्म मिळतो. अभंग विडिओ स्वरूपात पहा . नव्हे आराणूक परि – संत तुकाराम अभंग संत तुकाराम अँप डाउनलोड Post navigation

संत तुकाराम महाराज: जन्मकथा, बालपण, कार्य.

संत तुकारामांचे वडील बोल्होबायांची गोष्ट थोडक्यात सांगत आहे. संत तुकारामांचे वडील बोल्होबा पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे, की मला मी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ द्या. बोल्होबा त्याचे ऐकत नसत. अशी अकरा वर्षे गेली बाराव्या वर्षे ते पंढरपूरला जाण्यास निघाले . तेव्हा ही माऊली काही ऐकेच ना तेव्हा ती म्हणाली की जरी या वेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही, तरी मी तुमच्या मागून येणारच. बोल्होबाचा नाईलाज झाला. कारण स्रि आणि बालहट्ट टाळता येत नाही ना! ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईल पण मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही. माऊली आनंदी झाली. तिने सांगितले की मी काहीच मागणार नाही. पती-पत्नी पंढरपुरास निघाले. तिथे पोहोचल्यानंतर काही माऊली मनाशी विचार करीत चालली होती. आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूर येथे यात्रेतले बांगड्यांचे, खेळण्यांची दुकाने, हरखून पाहता येतील .कनकाबई त्यांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांमधे अंतर पडले. बोल्होबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाचे मान वर होती, ती खाली झोपली आणि रखुमाई ने पांडुरंगा विचारले ,की इतर लोक दर्शनाला येतात, तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली खाली झुकते? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले. बोल्होबा दर्शनाला आलेला आहे. तो सावकार आहे त्याचे आपण देणेकरी आहोत आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा बोल्होबा हा माणूस असून पांडुरंगाला सुद्धा त...

भजन साहित्य खजिना Bhajan Sahitya Khajina: चला हो पंढरी जाऊ । अभंग Chala Ho Pandhari Jau

चला हो पंढरी जाऊ । जीवाच्या जीवलगा पाहू।। संत महंत होतील भेटी। आनंदे नाचु वाळवंटी।। हे तिर्थांचे माहेर । सर्व सुखाचे भांडार ।। जन्म नाही रे आणिक । तुका म्हणे माझी भाक ।। Abhang Chala Ho Pandhari Jau | Jivachya Jivalaga Pahu || Sant Mahant Hotil Bheti | Aanande Nachu Valavanti || He Tirthanche Maher | Sarva Sukhache Bhandar || Janm Nahi Re Aanik | Tuka Mhane Mazi Bhak || For video =>

पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/13

५ (कुलवृत्त) पुण्यापासून आठ कोसांवर इंद्रायणी नदीच्या तिरी देहू गांव आहे. त्या गांवीं तुकारामाचे पूर्वज राहत असत. पंढरीची वारी व नित्य भजन हा त्यांचा परंपरागत कुलाचारच. यांचे पूर्वज सातवे पुरुष विश्वंभर बुवा हे पांडुरंगाचे येवढे निःसीम भक्त होते की, ते दर एकादशीस पंढरीची वारी करीत असत. पुढे त्यांना साक्षात्कार होऊन त्यांनी देहूस श्री पांडुरंगाचे देवालय बांधले. तुकारामाचे वडील बोल्होबा हे किराणा विक्रीचा धंदा करीत. पंढरीची वारी व नित्य भजन हा त्यांचा क्रम अबाधित चालू होता. तुकारामाची आई कनकाई ही महान् साध्वी स्त्री असून नवऱ्याप्रमाणें परम भगवद्भक्त होती. त्यांना पुष्कळ वर्षे संतती न झाल्यामुळे ती उभयतां उद्विग्न असत. ईश्वरकृपेने पुढे त्यांना सावजी, तुकाराम आणि कान्होबा असे तीन मुलगे झाले. (बालपण) तुकारामांच्या जन्म तिथीचा नक्की शोध लागत नाहीं. तरी त्यांचा जन्म शके १५३०-३१ ( सन १६०८-०९ ) साली झाला असावा, असे अनुमान आहे. त्यांच्या बालपणाचीही विशेष हकिगत उपलब्ध नाहीं. तरी पण उनाड, खेळाडू आईबापांचे न ऐकतां स्वैर वागणारा असा तुकाराम खास नव्हता. 'मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आम्ही लागलों ध्यानी' असे त्यांनी एके ठिकाणी ह्मटले आहे. त्यावरून बालवयांत बापाबरोबर भजन करण्याचा यांना सहवास असून ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ इत्यादि कवींच्या कांहीं कविता यांना मुखोद्गत झाल्या होत्या. बालपणापासूनच यांना भक्तीचे बाळकडू मिळाले होते. यांच्यापुढे यांच्या आईबापांचा अनुकरणीय कित्ता होता. सावजी हा उदासीन वृत्तीचा असून संसारांत तो फारसे लक्ष घालीत नसे. तुकाराम संसारांतील कामे मोठ्या उत्सुकतेने व दक्षतेने करू लागल्यामुळे बोल्होबास तो फार आवडू लागला.

ऐक रे जना

ऐक रे जना – ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ अर्थ हे लोकांनो तुमच्या स्वहिताची खूण तुम्हांला जाणायाची असेल तर त्या पांडुरंगाचे मनात स्मरण करत राहा.वाचेने तुम्ही जर कायम नारायणाचे गुणगान करात राहाल तर मग तुम्हाला कसले बंधन आले.भवसागर हा पैलतीरालाच नाहीसा होईल.सर्व काळी काळ तुमचे दास्यत्व करेल.मायाजळाचे तुमचे बंधन तुटेल,आणि रिद्धी सिद्धी तुमचे दास्यत्व करेल.विठ्ठलाचे नामस्मरण हे सर्व शास्त्रांचे सार आहे,आणि पुराणे देखील या नामस्मरणाचेच गुणगान गातात.नामस्मरण करण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो.मग तो ब्राम्हण असो,क्षत्रिय असो,वैश्य असो,शुद्र असो,चांडाळ किंवा बालक असो,नर असो,नारी असो एवढेच नाही वेश्यांना देखील या नामस्मरणाचा अधिकार आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आलेला अनुभव आम्ही तुम्हांला सांगत आहे,आणि जो कोणी दैववान भाग्यवान भाविक आहे तोच या नामस्मरणाचे सुख घेईल. अभंग विडिओ स्वरूपात पहा . ऐक रे जना – संत तुकाराम अभंग संत तुकाराम अँप डाउनलोड Post navigation