रयत माऊली गीत

  1. स्वावलंबी शिक्षण: कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य
  2. रयत सेवक: कर्मवीर भाऊराव पाटील
  3. * Welcome to New English School Korhale *: रयत गीत व रयत माऊली गीत


Download: रयत माऊली गीत
Size: 62.19 MB

स्वावलंबी शिक्षण: कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य

• • • अनिवासी गुरुकुल प्रकल्प • • • • • • • • • • • दहावी • • • • • • शाळेतील कार्यक्रम • • • • • • • • मराठी नाटके • • • • • • • • • • सामान्य ज्ञान • • • इयत्ता 1 ली • • • • इयत्ता 3 री • • • • शैक्षणिक धोरणे • • • • • • • • • रयत online स्कूल एज्युकेशन • • • • • • • विज्ञान • • • • • गणित • • • • PPT • • • • • • • • • • • • • • • • • • • परिपत्रके • • • • • • • DSM सराव पेपर • • • • • • 9 वी जलसुरक्षा • • • • • • • • • • • 10 वी जलसुरक्षा • • • • • • • • • • • TET सराव पेपर • • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९०९ मध्ये सांगली जिल्ह्यातील दूधगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२१ मध्ये नेर्ले ता. वाळवा या ठिकाणी वसतिगृह स्थापन करण्यात आले. पुढे १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालयाचे सातारा या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले व सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे मिश्र वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. आणि याच वसतिगृहाचे २५ फेब्रुवारी १९२७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते थोर समाज सुधारक ‘राजर्षी शाहू महाराज वसतिगृह’ असे नामकरण करण्यात आले. १९३२ साली उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी युनियन बोर्डिंग हाऊस ची स्थापना पुणे या ठिकाणी केली. ६ मे १९३५ साली रयत शिक्षण संस्थेचे‘द सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६०’ नुसार रजिस्ट्रेशन करण्यात केले. १९३६ साली सातारा येथे मा. रा.ब. काळे यांच्या नावाने पहिली मराठी शाळा सुरू केली. तसेच १९३८ मध्ये यवतेश्वर येथे रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवली जाणारी पहिली व्हालंटरीप्राथमिक शाळा सुरू करण्यात आ...

रयत सेवक: कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म त्यांच्या आजोळी कोल्हापूर संस्थानातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. ते ऐतवडे बुद्रुक येथील पाटील घराण्यातील होते. हे घराणे धार्मिक प्रवृत्तीचे व सुसंकृत होते. त्यांचे दोघे पूर्वज दिंगबर जैन मुनी बनले होते. भाऊराव परंपरागत अर्थाने धार्मिक नसले तरी धर्माचे मर्म ते जानीत होते. मानवधर्म त्यांनी आचरणात आणला आणि इतरांना शिकविला. भाऊरावांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचे धोतर व नेहरू शर्ट हा त्यांचा वेष. सुरुवातीला खांद्यावर घोंगडी असे. नंतरच्या काळात ती गेली आणि हातात काठी आली. झुणका-भाकर आणि ताक कण्या हे त्यांचे नेहमीचे जेवण. साधी राहणी , सार्वजनिक कार्याची आवड आणि कष्ट करून मालावर नंदनवन फुलविण्याची जिद्द त्यांनी स्वत:चे पणजोबा देवगौंडा यांचेपासून घेतली. स्वाभिमानाचा , करारी बाण्याचा आणि सेवाभावी वृतीचा वारसा त्यांना वडील पायगौंडा यांचेपासून मिळाला. कणखर शरीरयष्टी , सत्यनिष्ठा व अलौकिक धैर्य यांचा लाभ त्यांना मातोश्री गंगाबाई यांच्यापासून झाला. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण सुरुवातील आजोळी कुंभोज येथे झाले. कुंभोज सुटल्यानंतर वडिलांच्या सतत होणा-या बदल्यामुळे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची हेळसांड झाली. दहिवडी , विटे इत्यादी ठिकाणी शाळेच्या पटावर त्यांचे नाव असे. पण शाळेचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. हूडपणा व बंडखोरी यांतच त्यांचा वेळ जात असे. समवयस्काचे ते नेते होते. विटे येथे पाणी भरण्यास अस्पृश्यांना बंदी होती. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी रहाट मोडून विहिरीत टाकला. विद्यार्थीदशेपासूनच ते अन्याय व विषमता यांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. सन १९०२ ते १९०९ या कालावधीत भाऊराव हायस्कूल शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होते. ते जैन बोर्डिंगमध्...

* Welcome to New English School Korhale *: रयत गीत व रयत माऊली गीत

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे !!धृ !! कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ही ठरते आहे शाहूफुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे धर्म जातीच्या पार गांधीचे मूल्य मानवी जपतो आहे... १ गरीबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी वाहिनी ठरली आई कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे... २ दीन दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे... ३ जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंख लेवूनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगणी चढतो आहे... ४ कवी– विठ्ठल वाघ -: रयत माऊली गीत :- कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |धृ | प्रेम अर्पावे सर्वांना माय फक्त हेच जाणे दीन अनाथ लेकरा भरविले घास तिने भुकेजल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे सौभाग्याचा अलंकार तोही टाकिला विकून अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |१| कोणकोणाची ही मुले काय होते नाते तिचे ? लळा लाविला सर्वांना राज्य निर्मी ममतेचे इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे अभिमान आम्हा तिचा जीव टाकू ओवाळून अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |२| पती रयतेचा वाली सती रयत माऊली सरस्वतीला भेटाया जणू लक्ष्मी धावली भेद विसरूनी सारे बने सर्वांची सावली वावरली जन्मभरी छाया पतीची बनून अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन? |३| लाखलाख मुले आज माय वंदिताती तुला हेवा करावा देवांनी असे भाग्य लाभे तुला तुझ्या त्यागतुनी माते कर्मवीर जन्मा आला मूर्त तुझी ठेवू आम्ही हृदयात साठवून अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |४| कवी- प्रा. माधव थोरात