संकल्प चित्र फोटो

  1. ऐतिहासिक फैजपूर अधिवेशन संकल्प चित्राला काटेरी झुडपासह अतिक्रमणाचा विळखा


Download: संकल्प चित्र फोटो
Size: 22.21 MB

ऐतिहासिक फैजपूर अधिवेशन संकल्प चित्राला काटेरी झुडपासह अतिक्रमणाचा विळखा

ऐतिहासिक फैजपूर अधिवेशन संकल्प चित्राला काटेरी झुडपासह अतिक्रमणाचा विळखा By December 28, 2019 07:33 PM 2019-12-28T19:33:10+5:30 2019-12-28T19:35:20+5:30 फैजपूर येथे १९३६ साली भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती जागृत करणारे संकल्पचित्र पालिकेने उभारले आहे. मात्र या संकल्प चित्राला अतिक्रमणाचा विळखा तर होताच आता गाजर गवताचाही विळखा पडला आहे. ऐतिहासिक फैजपूर अधिवेशन संकल्प चित्राला काटेरी झुडपासह अतिक्रमणाचा विळखा ठळक मुद्दे स्मृती जागृत करण्याच्या दिवशीही पालिकेला विस्मृती फैजपूर पालिकेने वेळीच उपाययोजना करण्याची गरज वासुदेव सरोदे २७, २८ व २९ डिसेंबर १९३६ दरम्यान हे अधिवेशन झाले होते. आज त्याचा स्मृती जागृत करणारा दिवस आहे. मात्र फैजपूर पालिकेला या संकल्प चित्राची साधी साफसफाई करण्याचाही विसर पडला आहे. शहरातील छत्री चौकात हे भव्य दिव्य संकल्पचित्र पालिकेने उभारले आहे. भावी तरुण पिढीला प्रेरणा देणारे व शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे हे संकल्प चित्र ठरेल, असे वाटत असताना या संकल्प चित्राकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचे एकत्र पुतळे असलेले एकमेव हे एकमेव संकल्प चित्र असावे. १९३६ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनामुळे फैजपूर शहराचे नाव जगाच्या नकाशावर झळकले होते. त्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने हे संकल्प चित्र तयार तयार केले आहे. या अधिवेशनाचे आयोजक स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी होते. या अधिवेशनाला म.गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, डॉ.राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, अब्दुल गफारखान ऊर्फ सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, साने गुरुज...