Sant dnyaneshwar

  1. Pandharpur Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार


Download: Sant dnyaneshwar
Size: 14.31 MB

Pandharpur Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार

Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat) अभंगवाणीचा गजर करत मजलदरमजल करत टाळ मृदंगाच्या तालावर माउली..माउली..हा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी पायीवारी (Ashadhi Wari) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. पुण्यात दोन दिवस मुक्काम करून पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत दिवे (ashadi vari in dive ghat) घाटातून आज जाणार आहेत. माऊली.. माऊलीचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दंग होऊन लाखो वारकरी (Warkari)आज सासवडमध्ये विसावणार आहेत. (Dive Ghat) तुकोबांची पालखी सोहळा तरदुसरीकडे हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराज पालखीही (Sant Tukaram palkhi) पण मार्गस्थ झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून लोणीकडे मार्गस्थ झाली. निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात विठू नामाचा गजराने दुमदुमला होता. तुकोबांची पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे (Baramati) बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. (pandharpur ashadhi wari 2023 sant dnyaneshwar mauli palkhi from diveghat towards pandhari and Sant Tukaram palkhi) मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान पाऊले हळू हळू चाला, मुखाने हरिनाम बोला, पांडुरंग हरी, वासुदेव हरी असा विठुनामाचा गजर करत मुक्ताईनगरमधून संत मुक्ताईच्या पालखीनं प्र...