शहाजी बापू पाटील

  1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं भन्नाट ट्वीट, शहाजी बापूंचा डायलॉग मारत म्हणाले...
  2. नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटील यांची जहरी टीका
  3. नाना पटोलेंना कमी बुद्धी म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांवर काँग्रेसचा पलटवार
  4. “काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ”; शहाजीबापूंची खास शैलीत प्रतिक्रिया
  5. "संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका


Download: शहाजी बापू पाटील
Size: 5.23 MB

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं भन्नाट ट्वीट, शहाजी बापूंचा डायलॉग मारत म्हणाले...

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता येत्या काही तासांतच समोर येणार आहे. सर्वोच्च न्यायलयात याप्रकरणी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला होता. आता हा निकाल आज जाहीर होणार आहे. त्याआधीच अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले होते. सुरत, गुवाहाटी आणि मग गोव्यात या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, शहाजी बापू पाटील सुद्धा शिंदे गटात सामिल झाले. यावेळी त्यांचा एक डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. गुवाहाटीच्या निसर्गसौंदर्यासंदर्भातील त्यांचं हे वाक्य होतं. एका कार्यकर्त्याने त्यांच्या चौकशीकरता त्यांना फोन केला होता. त्यावेळी काय झाडी, काय डोंगार, सगळं ओक्के आहे, असं शहाजी बापू पाटील आपल्या कार्यकर्त्याला म्हणाले होते. त्यांचा हा ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाला. त्यांचा हा डायलॉग इतका गाजला की, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे त्यांना त्यानंतर तो डायलॉग अनेकवेळा उच्चारायलाही सांगितला. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा >> आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे असणार आहे. यासंदर्भात लाईव्ह लॉ या न्यायालयातील माहिती पुरवणाऱ्या संकेतस्थळाने माहिती दिली होती. त्यांचं हेच ट्वीट करत संजय राऊतांनी रिट्वीट केलं आहे. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!” असं काय झाडी ,काय डोंगर, काय ह...

नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटील यांची जहरी टीका

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चारही त्यांनी कर्नाटकाच्या सभेत केला होता. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस मी पुन्हा येईल म्हणाले होते. त्यानुसार ते परत आले आहेत. मुख्यमंत्री म्हणून परत येईल असं ते म्हणाले नव्हते. लबाड बोलू नका, अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी विरोधकाांना सुनावले आहे. येत्या 12 तारखेला राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. तो आमच्याच बाजूने लागेल, असंही त्यांनी सांगितलं. रोज सकाळी तेच बोलतं राज्यात स्फोट होणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत चार महिने झाले असचं म्हणतं आहे. रोज सकाळी तेच बोलत असतात. एकदा ते जोरदार आपटतील. तेव्हा त्यांना कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला. माझ्या टाचेचं कातडं निघालं यावेळी सांगोला महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यासाठी शहाजी बापू पाटील उपस्थित होते. तब्बल दहा वर्षानंतर शहाजी बापू पाटील हे शरद पवार यांना भेटले. यावेळी दोघेही स्टेजवर आजूबाजूलाच बसले होते. दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. शरद पवार शहाजी बापूंना काही तरी सांगताना दिसत होते. या भेटीवर शहाजी बापू यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि माझे भावनिक नाते आहे. साहेबांच्या मागे फिरून माझ्या टाचेचं कातडं निघालं. आज साहेबांना भेटलो. आपण भावनिक झालो. दहा वर्षाने आमची भेट झाली. पवार साहेबांच्या भेटीने ऊर्जा मिळते. जिद्द निर्माण होते. सांगोला जनता आणि पांडुरंगाच्या कृपेने पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो…अशी प्रार्थना करतो, असं शहाजी बापू म्हणाले.

नाना पटोलेंना कमी बुद्धी म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांवर काँग्रेसचा पलटवार

काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर देत म्हटले की, "मुळात शहाजी बापू पाटलांची नाना पटोले यांच्यावर बोलण्याची लायकी नाही, 'ज्याचं खावं मीठ, त्याला घोडा लावावा नीट' ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आमदार झालेले आज काँग्रेसच्या नेतृत्वावर टिका करत आहेत. ज्या शिवसेनेनी त्यांना तिकीट देत आमदार केल, त्या उद्धव ठाकरेंवर ही हे टिका करतात. ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारी करण्याची शहाजी बापू पाटलांची परंपरा जुनी आहे, आणि ते पुढे पाळत आहेत, असा पलटवार काँग्रेसने केलाय. तसेच, शहाजी बापू पाटलांची अवस्था तमाशामधील तुणतुण्यासारखी झाली आहे. या सरकारमधील ते तुणतुणे आहेत, असे म्हणत काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांवर बोचरी टीका केली. नाना पटोलेंवर काय केली टीका नाना पटोले म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी बोचरी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली होती. आता, शहाजी बापूंच्या या टीकेला काँग्रेस नेत्यानं उत्तर देताना जशास तसा टोला लगावला. नाना पटोलेंची शहाजी बापूंवर टीका नाना पटोले यांनी शहाजीबापूंच्या काय झाडी, काय डोंगर...या विधानांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर शरसंधान साधले होते. तसेच तुम्हाला काय झाडी, काय डोंगरवाला आमदार आणि असे राज्य सरकार पाहिजे की आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासारखा इमानदार माणूस हवा, असे नानांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी शहाजी बापूंची नक्कलही केली होती. तसेच, गणपतराव देशमुखांची आठवण काढत, त्यांच्यासारखा माणूस होणे नाही, असेही नानांनी सांगोल्यात म्हट...

“काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ”; शहाजीबापूंची खास शैलीत प्रतिक्रिया

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट, राज्यपालांवर ताशेरे ओढले मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत विधासभा अध्यक्ष निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारला धोका नसल्याचे सांगितले जात आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ सत्तासंघर्षाच्या निकालाआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक ट्विट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ… जय महाराष्ट्र!” असे संजय राऊत यांनी यात म्हटले होते. यावर, काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ, आता झिरवळ गेला झुरळ हुडकायला, संजय राऊत चालला आता गुवाहाटीच्या झाडांत बसायला, अशी खोचक प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली. Web Title: shahaji bapu patil taunt thackeray group mp sanjay raut over his tweet Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

"संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका

"संजय राऊत यांचं आडनाव आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यांचं नामांतर करुन संजय आगलावे असं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एका निष्पाप, प्रमाणिकपणे चांगलं काम करणाऱ्या तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदे यांच्यावर असे आरोप करत आहेत. असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊत यांनाच काय, तर कुणालाच शोभणारं नाही. बेभान झालेले संजय राऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील याचा काही नेम राहिलेला नाही", असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. संजय राऊतांनीही दिली प्रतिक्रिया शहाजी बापू पाटलांच्या या टीकेनंतर संजय राऊतांनी पलटवार केला आहे. शहाजीबापू पाटलांच्या टीकेबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, “हा कोण शहाजी? हा खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय.”