नानासाहेबांचा वाडा कुठे आहे

  1. त्या घटनेनंतर बाजीराव पेशव्यांनी ठरवलं पुण्यात शनिवार वाडा बांधायचा.
  2. मामाचा वाडा चिरेबंदी
  3. माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तु प्रकार


Download: नानासाहेबांचा वाडा कुठे आहे
Size: 42.68 MB

त्या घटनेनंतर बाजीराव पेशव्यांनी ठरवलं पुण्यात शनिवार वाडा बांधायचा.

पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक.एकेकाळी “सात मजली कलसी बंगला” असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं. इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार पोहचली. आज या शनिवार वाड्याकडे पाहिलं तर बुलंद असा दिल्ली दरवाजा दिसतो पण आतमध्ये फक्त इतिहासाचे पडके भग्न अवशेष उरलेले आहेत. मराठी सत्तेची शान असणाऱ्या शनिवारवाड्याची अवस्था कशी झाली, या वैभवशाली वास्तूचे मालक पेशवे आता कुठे आहेत? हि गोष्ट “वैभवशाली इतिहास असणाऱ्या शनिवारवाड्याची.” बाळाजी विश्वनाथ भट हे साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी नेमलेले पहिले पेशवे. ते सासवडवरून राज्यकारभार सांभाळायचे. स्वराज्याची घडी बसवता बसवता त्यांच अकाली निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचा कर्तबगार मुलगा पहिला बाजीराव याच्या हाती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. अवघ्या वीस वर्षाच्या बाजीरावाला पेशवा बनवण्यास इतर सरदारांचा विरोध होता पण शाहू राजांना बाजीरावाची धडाडी माहित होती. श्रीमंत बाजीराव सुद्धा सासवडमध्ये बसून राज्य हाकू लागले. त्यावेळी सासवडला पाण्याचे दुर्भिक्ष होते. पेशव्यांना वंशपरंपरागत पुण्याची जहागीर चालत आली होती. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्याचे बाजीरावास आकर्षण होते. उत्तम हवामान, मुबलक पाणी, सासवड पेक्षा मोठे म्हणून आपली राजधानी पुण्याला हलवण्याचा निर्णय तरुण पेशव्याने घेतला. यासाठी आपले पुण्याचे कारभारी बापुजी श्रीपत यांना पत्र धाडले, “पुनियात राहावे लागते करिता राहते घर व सदर सोपा व कारकुनाचे घर कोटात तयार करावे.” शनिवार वाडयाची जागा कशी ठरली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. “पेशवा बाजीराव मुठानदीच्या काठी घोड्यावरून ज...

मामाचा वाडा चिरेबंदी

गोमू माहेरला आली हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा असं गाणं लहानपणापासून ऐकलं होतं. माझ्या आजीचं (आईच्या आईचं) गाव राजापूर. आईच्या वडलांचं गाव वेरळ. त्यामुळे मी आणि माझे आईवडील हाडाचे मुंबईकर असले तरी भावविश्वात कोकण यायचंच. कधी आईच्या मामाने आणलेला फणस, तर कधी मला न आवडणारं कुळथाचं पिठलं. लग्नकार्याच्या वेळी एकत्र जमलेल्या लोकांकडून ऐकलेल्या गप्पा, होणाऱ्या अतिशय जवळिकीच्या ( पक्षी खोदून खोदून होणाऱ्या - पैसे किती मिळतात, इतकी वर्षं झाली तरी मूल का नाही वगैरे) चौकशा व भुताखेतांच्या गोष्टी - इतपतच कोकणाची माहिती. त्यात कल्पनाविश्वात भर म्हणजे गारंबीचा बापू, पुलंचा अंतू बर्वा वगैरे. पण कोकणात जायची वेळ शाळेच्या गणपतीपुळ्याच्या ट्रिपपलिकडे कधी आली नव्हती. आई काही वेळा जाऊन आलेली आहे, पण त्यावेळी मी एकतर अभ्यासात मग्न होतो, किंवा अमेरिकेत होतो. तिला तिच्या घोवाला कोकण दाखवण्याची खूप इच्छा होती, पण प्रवास (तोही सासुरवाडी) या कल्पनेचाच तिटकारा असल्यामुळे ते कधी कोकणात गेले नाहीत. तिच्या सुदैवाने माझ्या बाबतीत, इतक्या उशीराने का होईना, पण तो योग या भारतवारीत जुळून आला. काही वर्षांपूर्वी माझ्या मामाने दापोलीला घर बांधलं. (मामा प्रत्यक्ष दापोली शहरात राहात नाही, अडीच किलोमीटरवर असलेल्या 'सबर्ब'मध्ये राहातो. त्या गावाचं नाव जालगाव .) तो मला नेहेमी म्हणायचा की एकदा येऊन जा. पण भारताच्या छोट्या ट्रिप्समध्ये सगळ्यांचंच दापोलीला जाणं जमलं नव्हतं. यावेळी मामा मामी जाणार होते, तर मीही जायचं ठरवलं. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया म्हणत झुकझुक आगीनगाडीने जाण्याचा काही योग नव्हता. प्रवास पुण्याहूनच सुरू होणार असल्यामुळे पर्याय फक्त बसचाच होता. बरेच लोक असते तर कार करून जाणं सोयीचं ठ...

माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तु प्रकार

चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा. त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे. काही मराठी संकल्पनांवर जालावर निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. किल्ले, दुर्ग यांचे फोटोज मिळतात पण निरनिराळे वाडे, गढी, वैगेरेंची माहिती मिळत नाही. आपल्याला काहीही माहिती असल्यास इथे टाकावी जेणेकरून सर्वांना उपलब्ध होईल. मराठा आर्किटेक्चर नामक एक पीडीएफ नुकतीच जालावरून उतरून घेतलीये. ती आर्काईव्ह.ऑर्ग वरती चढवतो अन तुम्हांला लिंक देतो. इन अ‍ॅडिषन, मराठा टाऊन प्लॅनिंग या नावाचा एक पीएचडी थेसिस इथे पाहता येईल. प्रत्येक चॅप्टरची वेगळी पीडीएफ आहे फ्री डौनलोडला. टीपः हे दोन्हीही मी वाचलेले नाही तस्मात नेमके सांगू शकत नाही. तरी पाहून सांगा काय कसे वाटते ते. शिवाय मंदा खांडगे यांनी लिहिलेले "वैभव पेशवेकालीन वाड्यांचे" हे पुस्तकही वाचनीय आहे, ते आप्पा बळवंत चौकात रसिक साहित्यमध्ये मिळून जावे. सरतेशेवटी एकदा विश्रामबागवाड्यात जाऊन येणे. तिथे मॉडेल ठेवले आहे वाड्याचे. शिवाय वाड्याच्या आतबाहेर फिरून पाहता येईल काय कसे आहे इ.इ. sidney toy नामक एका इंग्रजाने खास भारतीय मिलिटरी आर्किटेक्चरबद्दल काही पुस्तके लिहिलेली आहेत, उदा. द स्ट्राँगहोल्ड्स इन/ऑफ इंडिया, फोर्टिफाईड सिटीज़ इन इंडिया, इ.इ. ते मात्र कुठे जालावर उपलब्ध दिसत ना...