संत ज्ञानेश्वर महाराज अभंग pdf

  1. संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ ते ५९७
  2. श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
  3. Ashadhi Wari 2023 : संविधान अन् संत विचारांमध्ये नेमके साम्य काय माहितीये l Ashadhi Wari 2023 Samvidhan Samta Vihar And Sant Vichar Similarity
  4. ज्ञानेश्वरांचे अभंग – भावतरंग
  5. dnyaneshwari free


Download: संत ज्ञानेश्वर महाराज अभंग pdf
Size: 3.7 MB

संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ ते ५९७

संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ते५९७ विडिओ सहित संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ ते ५९७ ४०५ एक मूर्ख नेणती । नाम हरिचें न घेती । मुखें भलतेंचि जल्पती । तें पावती अध:पंथा ॥१॥ नामेंविण सुटका नाहीं । ऐसी वेदशस्त्रीं ग्वाही । जो वेद मस्तकीं पाहीं । ब्रह्मयानें वंदिला ॥२॥ नित्य नामाची माळा । जिव्हे घे तूं गळाळा । तो नर कर्मा वेगळा । ऐसें बोलती पुराणें ॥३॥ नयनीं श्रवणीं हरी । आणिक काम न करी । तो साधु भक्त निर्धारीं । हरिचा आवडता ॥४॥ ज्ञानदेवीं पाहिलें ।हरिनाम साधुनी घेतलें ।’ तें समाधिस केलें । पुष्पशयनीं आसन ॥५॥ अर्थ:- नामाचा महिमा न जाणल्याने मुर्ख नाम घेत नाहीत. जे तोंडाने भलतेच बोलतात त्यांचे अधःपतन निश्चित आहे. ह्या नामाविण सुटका नाही ह्याची वेदशास्त्र ग्वाही देतात.ब्रह्मदेवाने त्यामुळे वेदांचे महत्व ओळखुन मस्तकी धरले. हे जिव्हे तु नित्य नामाची गुळणी घे. असे करणारा तो नर कर्मावेगळा ठरतो असे पुराण सांगतात.ज्या डोळ्यासमोर व मुखात सतत हरि असतो दुसऱ्या कामात मन नसते तो साधु भक्त निर्धाराने हरिचा आवडता होतो.मी हरिनाम साधल्याने पुष्पासनाचे आसन घालुन मला समाधीस्त केले असे माऊली सांगतात. ४०६ नाममाळा घे पवित्र । अंतीं हेंचि शस्त्र । राम हा महामंत्र । सर्व बाधा निवारी ॥१॥ भवकर्मविख । रामनामी होय चोख । भवव्यथादु:ख । पुढें सुख उपजेल ॥२॥ माळा घाली हेचि गळां घे अमृताचा गळाळा । होईल वैकुंठीं सोहळा रामकृष्ण उच्चारणी ॥३॥ ज्ञानदेवीं माळा केली । सुखाची समाधि साधिली । जिव्हा उच्चारणी केली । अखंड हरिनाम ॥४॥ अर्थ:- नाम जपण्याची माला पवित्र असुन रामनाम हा महामंत्र आहे अंतकाळी हेच तुमचे शस्त्र आहे. सर्व बाधांचे निराकरण हे करते.भव कर्मांचे विष नाममंत्राने चोख( कर्म शुध्द होतात )बनते हेच नाम भव दुःख व व्यथा हरण करुन...

श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥१॥ तया आठविता महापुण्यराशी । नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥२॥ रूप पाहतां लोचनीं। सुख जालें वो साजणी॥१॥ तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी। म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू॥४॥ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटेवरी ठेवून या॥१॥ तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने॥४॥ ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी। तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी। वेदशास्त्र उभारी बाह्या सदा॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा। द्वारकेचा राणा पांडवांघरीं॥४॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता। वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥४॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी ॥ तीन॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं। अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी ॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति। बळेंवीण् शक्ति बोलं नय...

Ashadhi Wari 2023 : संविधान अन् संत विचारांमध्ये नेमके साम्य काय माहितीये l Ashadhi Wari 2023 Samvidhan Samta Vihar And Sant Vichar Similarity

Samvidhan Samta Vihar And Sant Vichar Similarity : भारतात लोकशाही प्रस्थापित होताना त्याचा पाया रोवणारा आणि आजवर देशाला शिस्तबद्धतेत चालवणारे संविधान संपूर्ण देशवासियांना पूजनीय आहे. याशिवाय लोकांना अजून एक गोष्टी पूजनीय आहे ती म्हणजे संत विचार. पण तुम्हाला माहितीये का, संविधान आणि संत विचारांमध्ये खूप साम्य आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी होऊन गेलेल्या संतांनी आपल्या अभंगांतून, दोह्यांमधून जन जागृतीसाठी व्यक्त केलेले विचार आणि आपल्या संविधान सांगितलेले आपले हक्क, कर्तव्य यात खूप साम्य आहे. आषाढी वारी शेकडो वर्षांपासून भक्तांचा मेळा पायी चालत तर पांडुरंगाच्या चरणाशी जातो. त्यांच्यात भक्ती, भावाचा पूर ओसंडत असतो. या वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. शेकडो किलोमीटर पायी कापताना अनेक गावे, शहरे पार करत ही वारी जात असते. त्यामुळे संत विचारांनी भारावलेल्या या भाविकांबरोबरच अनेकांपर्यंत प्रबोधनात्मक विचार पोहचवणे शक्य होते. म्हणूनच या वारीच्या निमित्ताने अनेक विचारी ग्रुप वारीत सहभागी होतात आणि प्रबोधनात्मक विचार लोकांपर्यंत पोहतवतात. या दिंडीत पथनाट्य, पोस्टर आणि एक दिवसाची वारी अशा उपक्रमांनी संविधान आणि संत विचार यातील साम्य जनतेला सांगितले जाते. याविषयी संयोजन मंडळाच्या सरस्वती शिंदे यांच्याशी सकाळने संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "संतांचे अभंग, दोहे यातून ते संविधानाशी कसे निगडीत आहेत ते सांगतो. जसे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.., यातून संत तुकारामांनी विज्ञानवादी होण्याचे धडे घातले आहेत. मूर्ती पूजक न होता लोकांमध्ये देव बघायला सांगितला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे... यात पर्यावरणाविषयी जागरुकता आणण्याचा प्रयत्न आहे. जो आपल्या संविधानात आपल्...

ज्ञानेश्वरांचे अभंग – भावतरंग

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥ पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥ वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥ पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥ या जगामध्ये कितीही प्रयत्‍न केला तरी प्रेमाशिवाय दुसरे काही दिसूनच येत नाही! आपल्या सर्वांचे अस्तित्व प्रेममयच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इथे काही सज्जन असे म्हणतील की हे खरे असेल तर आम्हास याची प्रचीती का येत नाही? या जगात सासू सुनेला, नवरा बायकोला तर छोटा मुलगा आपल्यापेक्षा लहानग्याला त्रास देत आहे ही वस्तिस्थिती प्रत्यक्ष दिसत असताना तुमचे म्हणणे आम्ही कसे योग्य मानू? या शंकेवर उत्तर म्हणजे प्रेम या शब्दाचा आपण फार संकुचित आणि सोज्वळ अर्थ मनात घेतो हा आहे. खरी गोष्ट अशी आहे की मनातील मिर्मळ, निर्गुण प्रेमाला आपण व्यवहारामध्ये जेव्हा वापरास आणतो तेव्हा आपल्या वैयक्‍तिक इच्छा-आकांक्षांच्या प्रदूषणांमुळे ती अतिपवित्र भावना कडूजहर हो‍उन येते आणि विपरीत दिसते. अहो, श्रीरामासारख्या भगवंतावरील प्रेमामुळे जर एखादा देश होरपळून निघत असेल तर स्वतःच्या सुंकुचित व्यक्‍तिमत्वावरील प्रेमाने आपले कुटुंबिय भरडून निघतील यात नवल ते काय? ज्याप्रमाणे विहिरीतील पाणी वरुन कचरा पडल्याने घाण झाले तरी मूळ पाण्याचा झऱ्यातील पाणी शुध्दच राहते त्याचप्रमाणे बाह्य संसारामध्ये विचित्र अवतारात प्रगट होण्यामुळे स्वतःमधील प्रेमाचे अस्तित्व अशुध्द होत नाही! कुठल्याही व्यक्‍तीच्या विचित्र वागण्यामागे तिच्या मनातील दुसऱ्या एखाद्या गोष्टीवरील प्रेमच दिसून येते. उदाहरणार्थ, सासूने सुन...

dnyaneshwari free

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ह्यांनी गीतेवर रचिलेली टीका. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी ह्याग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे तथापि संत नामदेवांनी ह्या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशीनावे पुढीलांनी रूढ केली असावीत. शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस एक कालनिदर्शक ओवी आहे : शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ (राजवाडे प्रत, १८११). तथापि ही ओवी ज्ञानेश्वरांची नसावी, अशी शंका अभ्यासकांनी उपस्थित केली आहे. ह्या शंकेमागची कारणे अशी : (१) ज्ञानेश्वर आपला उल्लेख सर्वत्र ज्ञानदेव असा करतात. असे असता, ह्या ओवीत मात्र ‘ज्ञानेश्वरें’ असा उल्लेख आढळतो. हे अपवादात्मक आहे. (२) त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथांत कालोल्लेख आढळत नाही. येथे मात्र तो आढळतो. (३) अठराव्या अध्यायात उपर्युक्त ओवीच्याच आधी ग्रंथ समाप्तीची एक ओवी येते, ती अशी : पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥ (राजवाडे प्रत, १८१०) ग्रंथसमाप्तीची ही ओवी झाल्यानंतर पुन्हा एक ओवी रचण्याचे प्रयोजन कळत नाही. ह्या शंकांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. ज्ञानेश्वरी लिहून घेणाऱ्या सच्चिदानंदबाबांनी ही ओवी लिहिली असण्याचा संभवआहे तथापि...