तुकाराम महाराजांचे बारा अभंग lyrics

  1. १०१. अभंग क्र. २७८४तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाही हिरा प्रकाशला ।।१।। तोंवरि तोंवरि शोभती दीपिका । नुगवता एक भास्करासी ।।२।। तोंवरि तोंवरि संताचिया गोष्टी । जंव नाही भेटी तुक्यासवे ।।३।। – गाथा परिवार


Download: तुकाराम महाराजांचे बारा अभंग lyrics
Size: 7.31 MB

१०१. अभंग क्र. २७८४तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाही हिरा प्रकाशला ।।१।। तोंवरि तोंवरि शोभती दीपिका । नुगवता एक भास्करासी ।।२।। तोंवरि तोंवरि संताचिया गोष्टी । जंव नाही भेटी तुक्यासवे ।।३।। – गाथा परिवार

जोवर हिरा प्रकाशत नाही तोवरच गारांचं अप्रूप वाटतं. जोवर सूर्य उगवत नाही तोवरच दिवे शोभतात. जोवर तुकाराम भेटत नाही तोवरच संतांच्या संतत्वाच्या कथा सांगा असं तुकाराम महाराज म्हणतात. तसा पाहिला तर हा आत्मस्तुती करणारा अभंग आहे असं वरवर विचार करता वाटू शकतं. तुकाराम महाराजांसारखा संत, सज्जन स्वत:ची स्तुती करतो हे प्रथमदर्शनी जरा विचित्र वाटू शकतं. पण तुकाराम महाराजांचा काळ आणि तत्कालिन परिस्थिती पहाता तुकाराम महाराज अशा अभंगांतून आत्मस्तुती करत नाहीत तर प्रखर आत्मभान प्रकट करतात. या शब्दांतून त्यांच्या आत्मबलाचं आणि आत्मसामर्थ्याचं दर्शन घडतं. *मी आघाताने फुटून जाणारी गारा नाही, तर ऐरणीवर ठेवून वरुन घणाचे घाव घातले तरी न फुटणारा अस्सल हिरा आहे. मी वा-याच्या झुळुकीने सहज विझून जाणारा क्षुल्लक दिवा नाही, तर ब्रह्मांड उजळून टाकणारा स्वयंप्रकाशी तारा आहे. मी बोलतो एक आणि करतो वेगळं असं वागणारा, पोषाखी, ढोंगी संत नाही, तर ‘बोले तैसा चाले’, या पठडीतला खरा संत आहे* याचं भान तुकाराम महाराजांना होतं आणि तेच त्यांनी या अभंगातून व्यक्त केलं आहे. तुकाराम महाराजांनी इतक्या स्पष्ट शब्दात स्वतःची ओळख आपल्या अभंगांतून करुन दिली असूनही कारस्थानी लोकांनी तुकाराम महाराजांची अतिशय चुकीची प्रतिमा निर्माण केली आणि समाजात रुजवली. *एक भोळाभाबडा, अव्यवहारी, कोणीही यावं आणि फसवून जावं असा विठ्ठलभक्त ही तुकारामांची प्रतिमा चुकीची आहे.* पण लेखणीचे ठेकेदार, ज्ञानाचे मक्तेदार असं करतील, असं करत आले आहेत, हे महान प्रज्ञावंत तुकाराम महाराजांना माहितीच असणार. *जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्म कुणबी जातीत झाला होता. त्यामुळे त्यांना आयुष्यभर शूद्र म्हणून हिणवलं गेलं. शूद्र असून काव्य करतो म्हणून त्यांचा गाथा ब...