माझ्या नवऱ्याची बायको मालिका

  1. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून होणार 'या' अभिनेत्रीची एक्झिट?
  2. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील या मुख्य अभिनेत्रीची होणार एक्झिट?
  3. माझ्या नवऱ्याची बायको
  4. ‘माझ्या नवऱ्याची बायको’चा येणार सिक्वल, या फोटोमुळे जोरदार चर्चा
  5. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO
  6. Mazya Navryachi Bayako Will Come Now In Hindi Promo Out


Download: माझ्या नवऱ्याची बायको मालिका
Size: 5.70 MB

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून होणार 'या' अभिनेत्रीची एक्झिट?

मुंबई- छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका यातील काही खास पात्रांमुळे घराघरात पोहोचली. मग ती राधिका असो गुरु असो किंवा मग स्टायलिश शनाया. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रेक्षकांसाठी यात अनेकदा ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. असाच एक ट्विस्ट आता पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. चाहत्यांसाठी एक बातमी म्हणजे आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटलं जात आहे. मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारलं होतं. तिची भूमिका आणि स्टाईल प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली होती. त्यानंतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकारली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी प्रेक्षकांनी मात्र शनायाच्या एक्झिटविषयी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. तेव्हा शनाया हे पात्रंच निघून गेल्यानंतर मालिका कोणत्या वळणावर येऊन पोहोचणार हेच पाहायचंय.

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील या मुख्य अभिनेत्रीची होणार एक्झिट?

मुंबई, 20 डिसेंबर: माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) ही मालिका छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजपर्यंत या मालिकेत अनेक वेगळी वळणं प्रेक्षकांनी पाहिली आहेत. पण आता मालिकेतील एक महत्वाची अभिनेत्री सीरिअलपासून दूर जाणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आम्ही मालिकेत काम करणाऱ्या शनाया अर्थात रसिका सुनीलबद्दल (Rasika Sunil) बोलत आहोत. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र येत्या काही दिवसातच वगळलं जाणार आहे. सध्या शनाया रेडिओ जॉकी झालेली आहे असं दाखवण्यात आलं आहे. शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर.जे बिंदूराणीला कॉल करतो आणि त्यांची पुन्हा एकदा भेट होते. त्यानंतर शनाया त्याच्यासोबत परदेशी निघून जाते असं चित्र रंगवण्यात येणार आहे. त्यामुळे शनाया अर्थात रसिका सुनीलची मालिकेतून कायमचीच एक्झिट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रसिका सुनील ऐवजी इशा केसकर या मालिकेत शनायाची भूमिका साकारताना दिसली होती. रसिकाला खऱ्या आयुष्यात शिक्षणासाठी परदेशी जायचं असल्यामुळे तिच्या जागी इशा केसकरची वर्णी लागली होती. पण आता तिचं पात्रच या मालिकेतून वगळलं जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मालिकेत हा बदल नक्की कशामुळे केला जातोय हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे तुम्ही जर शनायाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही दु:खाची बातमी आहे.

माझ्या नवऱ्याची बायको

माझ्या नवऱ्याची बायको दिग्दर्शक केदार वैद्य निर्माता तेजेंद्र नेसवणकर निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन कलाकार आवाज देश भाषा वर्ष संख्या ४ एपिसोड संख्या १३५४ निर्मिती माहिती स्थळ प्रसारणाची वेळ * सोम ते शनि रात्री ८ वाजता • सोम ते शनि रात्री ९ वाजता (२ मार्च २०२० पासून) • सोम ते शनि संध्या. ६.३० वाजता (४ जानेवारी २०२१ पासून) प्रसारण माहिती वाहिनी पहिला भाग २२ ऑगस्ट २०१६ – २७ मार्च २०२० प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – ७ मार्च २०२१ अधिक माहिती माझ्या नवऱ्याची बायको ही कलाकार [ ] • • • • • रुचिरा जाधव = माया (सौमित्रची मैत्रीण) • आर्यन देवगिरी = अथर्व सौमित्र बनहट्टी (राधिकाचा मुलगा) • भारती पाटील = सरिता वसंत सुभेदार (गुरुनाथची आई) • देवेंद्र दोडके = वसंत सुभेदार (गुरुनाथचे बाबा) • • • सुहिता थत्ते = भारती रामचंद्र दामले (नानीजी) • शर्मिला शिंदे = जेनी आनंद शहा (ऑफिस कर्मचारी) • मिहीर राजदा = आनंद शहा (ऑफिस कर्मचारी) • अभिजीत गुरू = किशोर दास (केडी) • सुयोग गोऱ्हे = कुणाल कुलकर्णी (शनायाचा नवरा) • अदिती द्रविड = ईशा निंबाळकर (शनायाची मैत्रीण) • श्वेता मेहेंदळे = रेवती सुबोध गुप्ते (राधिकाची मैत्रीण) • सचिन देशपांडे = श्रेयस मधुकर कुलकर्णी (ऑफिस कर्मचारी) • यश प्रधान = सुबोध गुप्ते (रेवतीचा नवरा) • रोहिणी निनावे = केड्याची मावशी • प्रविण डाळिंबकर = रघू (नोकर) • विपुल साळुंखे = पंकज रामचंद्र दामले (नानांचा मुलगा) • प्राजक्ता दातार-गणपुले = समिधा पंकज दामले (पंकजची बायको) • किरण माने = शिरीष (राधिकाचा भाऊ) • चित्रा खरे = चित्रा (शिरीषची बायको) • • वंदना पंडित-शेठ = वसुंधरा यशवंत बनहट्टी (सौमित्रची आई) • कांचन गुप्ते = महाजनी काकू (शेजारी) • गौतम जोगळेकर = यशवंत बनहट्टी (सौमित...

‘माझ्या नवऱ्याची बायको’चा येणार सिक्वल, या फोटोमुळे जोरदार चर्चा

आता कुठे या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तोच पुन्हा एकदा ही मालिका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मालिकेचा शेवट ज्या पद्धतीने करण्यात आला. त्यानंतर मालिकेमध्ये झालेल्या अजून एका तिची म्हणजेच पती, पत्नी और वो (तिसरी) ची एंट्री ही चर्चेचा विषय ठरली. सध्या हा फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असून ही सिक्वलची तयारी असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हा फोटो आहे तरी काय आणि नेमकी ही मालिका सिक्वल रुपात येणार का नाही ते जाणून घेऊया. अधिकृत घोषणा नाही झी मराठीवर सध्या सगळ्या मालिकांचे सिक्वल येत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ‘अग्गंबाई सासुबाई’चा पुढचा भाग येत आहे. या मालिकांची अधिकृत घोषणा झाल्यामुळे टीआरपीच्या पहिल्या क्रमांकावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका देखील पुन्हा एकदा सुरु होईल असे अनेकांना वाटत आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागात श्रुती मराठेची ती अनोखी एंट्री आणि मालिकेचा शेवट बरेच काही सांगून जातो. गुरुनाथ आपल्या चुकांचा पाढा वाचत आपल्या बॅगा भरुन श्रुती सोबत निघून जातो.त्यामुळे ही मालिका अजून संपलेली नाही. असे दिसून येते. आता या मालिकेचा सिक्वल येऊही शकतो. पण या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या मालिकेवर आतापर्यंत अनेक मीम्स बनले आहेत. या मालिकेत आलेल्या काही स्थित्यंतरामुळे अनेकांना हसू आवरले नसेल. गुरुच्या आयुष्यात एकामागोमाग एक येणाऱ्या महिला आणि येणाऱ्या अडचणी पाहता प्रेक्षकांना फारच कंटाळा आला होता. ही मालिका कधी संपेल असे अनेकांना झाले होते.पण ही मालिका 2016 पासून प्राईम टाईममध्ये दाखव...

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

23 ऑगस्ट 2016 रोजी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता आणि बघता बघता ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मालिकेतील राधिका, शनाया, गुरूनाथ ही पात्रही तेवढीच लोकप्रिय झाली होती. आज इतक्या वर्षानंतरही ही मालिका आणि यातील कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत. गेल्यावर्षी ही मालिका बंद झाली होती. पण आता ही मालिका हिंदीमध्ये बघता येणार आहे. झी अनमोल या वाहिनीवर ही मालिका ‘मेरे साजन कि सहेली’ या नावानं पाहायला मिळणार आहे.

Mazya Navryachi Bayako Will Come Now In Hindi Promo Out

Mazya Navryachi Bayako : 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayako) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेचं हिंदी व्हर्जन सुरू होणार आहे. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांना आता ही मालिका पाहायला मिळणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका 'मेरे साजन की सहेली' या नावाने झी च्या हिंदी वाहिनीवर सुरू होणार आहे. छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही लोकप्रिय मालिका होती. ही मालिका आता हिंदीमध्ये डब करून हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिता दातेने राधिकाची भूमिका साकारली होती. तर तिच्या नवऱ्याची गुरुनाथची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकरने साकारली होती. तर गुरुनाथच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री रसिक सुनीलने साकारली होती. आता 'मेरे साजन की सहेली' मालिकेचा प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. संबंधित बातम्या LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, Published at : 03 Apr 2022 05:00 PM (IST) Tags: